शक्तीरुपा
शक्तीरुपा


मानवाच्या जातीत माणूस एकटा होताच, एक सहारा शोधतो किंवा तो व्यसनी नाहीतर पागल होतो. पण त्याऐवजी स्त्री कशी ध्ययवेडी असते तिची ही कथा.
कोबंड आरवण्या अगोदर शांताबाई कंबर कसून सडा टाकत होती. तीच्या हातपंपाच्या आवाजाने दुसऱ्या बाया दिवसाकडे टवकारुन पाहत, पुटपुटत अंथरूणाला पुन्हा ओढून झोपी जात होते. शांताबाई पूर्ण जोमात काम आवरत होती कारण आज पुन्हा कालपेक्षा जास्त धानाचा गुत्ता कापायचं होतं.
शांताबाईला मुलबाळे होत नव्हते, वांझोटी म्हणून नवऱ्याकडून उपेक्षित पाटलाची बायको होती.
गावात मान पाटलींचा पण पोट जगविण्यासाठी लोकांची मोलमजुरी करत होती.
ध्येय वेडी कामाची
गुण सुंदरी होती
पोटासाठी कष्टासी
जुळवत होती नाती
' एकटा जीव सदाशिव 'पण कष्ट आनंद मानणारी रिकाम टेकळ्यासाठी ती टिंगलटवाळी बनली होती.
तशी ती विदुषक, कुणासाठी राब राब राबत मरत होती हे तिलाच माहीत.
तिच्या सरणावर रडणारा कोणी नव्हता.
सकाळ सांज मनात एकच विचार हाती घेतलेला हुंडा/ काम वेळेअगोदर पुर्ण करुन पुन्हा दुसरा कामाला कसं लागिनं. तशी ती काबाडकष्टासाठी वाघीण.
मानसाला लाजवेल
बाजूत वाघीणचे बळ
शक्तीस्वरुपा मर्दणीला
पाहता आळश काढे पळ
शांताबाईच्या कामात चिकाटी पुर्ण चोखट/ सुव्यवस्थीतपणा होता.
तिचा श्वास कर्तेपणाचा दरवळणारा सुगंध होता.
शेवटी काय, कष्टाचं मुलमंत्र समाजासाठी सोडून पुर्ण आयुष्याची जमापुंजी इथंच सोडून एकदाची मुक्त झाली.
परंतु मरुनसुद्धा वरुन खाली पाहत, मरणाचा भात तावात खाणाऱ्यांसाठी दोन अश्रू ढाळत होती. कमावलेल्या पैशाला अखा गाव शिवतांना मोह टाकत मोक्षाच्या मार्गाला लागली होती.