Sheshrao Yelekar

Others

2  

Sheshrao Yelekar

Others

अंधाराची वाट

अंधाराची वाट

1 min
4.1K


युवराज नावात दम आहे. निर्व्यसनी,तल्लख बुद्धीचा तो एकुलता एक मुलगा आणि पाटीलकी वारसातला. चांगली बुध्दी, शिक्षण आणि अनुकूल वातावरण. सर्वांचा लाडका, लहानांना उपदेश देणारा. ऐन तरुण वयात आज मात्र खोल अंधारात चाचपडत बसला आहे स्वत:ला शोधत. मरावं की जगावं, जगावं तरी कशाला, एक मार्ग भुललेला वाटसरू. एकदा आत्महत्येचा प्रयत्न करुन, आता पुन्हा विचारत आहे. जगावं की मरावं.

आता प्रश्न होता हा प्रश्न कितीकांच्या नशीबी आला.

आलाही असेल समाज बांधवाला, जीवलग भाऊ, मित्र किंवा परिवारातील सदस्यांना. पण तेव्हा मी सामाजिक प्राणी काय करत होतो. चला तेव्हा मी व्यस्त होतो. आरुषीसाठी मेणबत्ती जाळत होतो. आसारामला शिव्या देत होतो, राजकीय विचार प्रकर्षाने मांडत होतो शेवटी सामाजिक प्राणी म्हणून ते माझं कर्तव्य होतं.

सर्व सुरळीत पण आपल्यातील एक खोल अंधार दरीत जात आहे. त्यात तो एकटा की समाज म्हणून आपण सर्व जबाबदार यावर विचार करायला कुणालाच थोडीही फुरसत/वेळ नाही ही आपली शोकांतिका .

सामाजिक सहभागात एकादा व्यक्ती असफल होण्याला कारणीभूत घटक आपण म्हणजे समाजचं आहे. असं कसं? आपला तोंडबोल्या स्वभाव, समाज शिक्षणाचा अभाव. आपल्यातील नाकर्तेपणा. असहकारात्मक विचार व वृत्ती.

आज आपण मुकबधीर वृत्तीने जे पाहत आहोत उद्या चालून ते आपल्याच अंगवळणी पडणार आहे. तेव्हा एकदाच देवाला नमस्कार करण्याचं विसरलात तरी चालेल पण समाजात सकारात्मक विचार पसरायला विसरु नका. सामाजिक सहकारात सहकार्य करुन, सतर्कतेची जबाबदारी आवर्जून पाळली गेली पाहिजे.


Rate this content
Log in