Sheshrao Yelekar

Inspirational

3  

Sheshrao Yelekar

Inspirational

शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी

शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी

2 mins
16.5K


विद्यार्थी हा ज्ञान प्रवाहातील माध्यम असुन तो भविष्याला सुंदर रूप देण्याचा कलात्मक साधन आहे.

ज्ञान हे वापरल्यानं वाढतं व ज्ञानाची भगीरथ गंगा वाहण्याच एकमेव साधन म्हणजे विद्यार्थी. तेव्हा या ज्ञान गंगेला वाहून नेणारा विद्यार्थी सक्षम असायला हवा.आणि या साठी पालक, शाळा,शिक्षक व समाज हे मुलभूत घटक आहेत.आणि यांच्या सहयोगातून विद्यार्थी सक्षमता पुर्णपणे अवलंबून आहे.

ज्ञानाचा मुख्य दुवा विद्यार्थी असुन, अनेक शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षण पद्धती हि विद्यार्थी केंद्रीत सांगितली आहे.महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोरांनी कार्यशिक्षण व मुल्यशिक्षण वर भर आहे.यात स्वामी विवेकानंद यांचा समावेश करता येईल.स्वामी विवेकानंदानी मानसिक एकाग्रतेला विशेष महत्त्व दिले आहे.चालता बोलता शिक्षण, निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाकडून शिक्षण ही टागोरांची शैक्षणिक विचारधारा आपल्याला माहीत आहे.

आजपर्यंत शैक्षणिक उद्धारासाठी विविध तज्ञ व आयोग निर्माण झाले खडूफळा मोहीम, शैक्षणिक पोषण आहार व असंख्य मोहीमा हाती घेण्यात आल्या तरीपण आजही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमतेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात.

विविध परीस्थिती व विद्यार्थी हा घटक केंद्रस्थानी ठेवून विचार केला तर मुख्य जळेपर्यंत पोहचता येते.

१. पालक हा घटक स्वत स्वतची जबाबदारी पासून दूर पळताना दिसतो . अनेक पालक अशिक्षीत तर ज्यास्तीत ज्यास्त आर्थिक विवंचनेत फसलेले असतात.तर काही घरचा वातावरण मुलांच्या प्रगतीत मुख्य अडचण बनलेली असते.

२. शाळा हा घटक विद्यार्थ्यांना कमाईचे साधन समजू लागला आहे.हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, विविध उपक्रमांची जाहिरात करून भरमसाठ फीस उखळणे , विद्यार्थीचा सर्वांगीण विकास सोडून फक्त ज्ञानात्म विकास घडवून आणला जातो.

३ . शिक्षक हा घटक स्वत: विवेचनेत पडलेला आहे शासकीय कामे व भ्रष्टाचाराला बळी पडला आहे.गुणवत्ता असुन स्वत: पैसे देऊन शिक्षक बनलेला आहे.कोण्त्या माणसीकतेत तो विद्या ज्ञान करीत आहे.हे देव जाणो.

४. समाज हा घटक विद्यार्थ्यांना ज्ञानोपयोगी संसाधनात मदतीचा मुख्य स्त्रोत आहे.पण वस्तुस्थिती उलट आहे. शाळेच्या आसपास नसेची दुकानं , शारिरीक अक्षम विद्यार्थ्यांला टिंगलटवाळीचं साधन बनतांना आपण दररोज अनुभवत असतो.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही उनीवा/अडचणी जरी असतील तर त्या दूर करण्यासाठी आज सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारवयास हवी.

ज्ञानग्रहणात येणाऱ्या अडचणींचे सर्वोपरी अभ्यास करून त्या अडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत.

समस्येच्या मुळापर्यंत जाऊन तिचे निवारण करता येते, विद्यार्थीची भावना त्यांच बालमन समजून घेणे, बुद्धीची कुवत ओळखून भावनीक स्थिरता निर्माण करणे.विद्यार्थीनींनी सक्षमता आणण्यास मदत करेल


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational