व्यथा निसर्गाची
व्यथा निसर्गाची


मी निसर्ग,तुम्ही जिथं जगता,राहता,बाळगता तिथे सर्वांकडे माझीच सत्ता.
या सृष्टीतील प्रत्येक जीव हा माझाच अंश माझेच एक रुप.
नितळ, निरपेक्ष प्रेम अगदी हृदयातील काळजावर करावं तसं प्रेम मी तुम्हावर करतो.माझ्याजवळ जे आहे शेवटी ते तुमचेच.परंतू तुमच्या हातून सतत जी माझी हेळसांड होत आहे त्यामुळे मी खुप दुःखी आहे.
सर्व स्वत: जवळील रहस्य उघडी करुन ही,तुम्ही अतृप्त ,स्वत: च्या मर्जीने कसही वागता.
मी तुमचा नसल्या सारखं सुड उगवता.ही सृष्टी नियोजन बद्ध चालावी म्हणून मी केलेल्या नियमांना सर्ररास पायी तुडवता.आणि संकटांना स्वत: हून आमंत्रण देवून त्याच ही खापर शेवटी माझ्याच माथेवर.
अरे बाबांनो ही झाडे तुम्हाला सावली, पाऊस आणि तुमची भूक भागवितात आणि तुम्ही मात्र त्यांना कापून सिमेंटची जंगल तयार केली.पहाडांना फोडून येथील दगडांपासून रस्ते, इमारती उभ्या केल्या.आता समुद्र कडून येणारी हवा पाहाडांना न अडता तुमच्या शहराच्या जंगलातील इमारती कडून अडवली जाते व जिथे पडणारा पाऊस तिथं न पडता येथील भागाला दुष्काळात,ओसाड बनवत चालला आहे.
मानवाने जिकडे तिकडे घान पसरवली.पण ती घान पहिले पृथ्वी च्या वरच्या पृष्ठ भागावरच होती परंतु आता घरोंघरी संडास खोदून तर पृथ्वीचा अंतरंग सुद्धा दुशीत केला.येवढं करुनही समाधान नाही मिळाल्या सारखं शुद्ध वाहणाऱ्या नद्यांना सुद्धा कलुशित केलं.
अरे मानवा विज्ञानात ऐवढी प्रगती केल्यानंतरही तुला हे कसं कळलं नाही की सर्व सांडपाणी मल मूत्र विसर्जन न करता त्याचं बायोगॅस, उत्तंम सोन खत तयार करता आल असतं.शहरात डंपिंग ग्राउंड तयार करण्यापेक्षा कचरा सडवून इथिनाल निर्मिती करता येते हे सोडून तुम्ही पूर्ण डोकं राजकारण आणि खुर्ची मिळविण्यासाठी वापरता याचं मला दुःख आहे.
मी जो तुम्हा सोबत प्रत्येक क्षणी सुख दुःखात सहभागी असतो.मी सात्त्विक असून मात्र तुम्ही मला काळं फासण्यात कुठलीच कसर सोडली नाही.मी परोपकारी परंतु तुम्हाला परोपकार करण्यासाठी जात आणि धर्म लागतो.व भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्हाला मुर्दे सुद्धा कमी पडतात.अरे ज्या स्त्री तत्वाने ही सृष्टी उभी आहे.तिलाच उपभोग्य वस्तू समजता तर शेवटी तुमच्या कडून काय अपेक्षा करता येतील.
माझ्या सत्तेतील प्रत्येक वस्तू ही तुमची असली तरी तिचा अपव्यय करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही.आज तुम्ही आमंत्रित केलेले पाहूणे प्रदुषण,भुजल पातळीत पाण्यातील घट,अवर्षण, अतिवृष्टी, तापमान वाढ,भकास वातावरण या सर्वांमुळे माझं स्वास घेणं मुश्किल केलं आहे.
अरे मी निसर्ग बाप, पालनकर्ता म्हणून शेवटी तुम्हाला दंड न देता आपली व्यथा मांडु शकतो.तेव्हा लेकरांनो आताही वेळ गेलेली नाही.आपली वर्तवणूक सुधारा नाहीतर तो दिवस दूर नाही जिथे माझ्या सत्तेच्या ऱ्हासा बरोबर तुमचा सर्वथा विनाश होईल.