STORYMIRROR

Pakija Attar

Inspirational

3  

Pakija Attar

Inspirational

जिगर

जिगर

2 mins
1.4K


आज चाचा लवकर उठले. झोप लागत नवहती. मुले येणार होती. चाचा खूप प्रेमळ होते. सगल्यांचे लाडके चाचा. त्यांना तिन मुले होती. रहमत, रहमान वह उस्मान. तिघे ही खूप गुणी होती. देशाच्या रक्षणासाठी आरमीत होती. आज घरी परत येणार होती.त्यांना घे घेणयसाठी स्टाण्डवर उभे राहिले होते. सर्वानां सांगत," आज आर्मी ऑफिसर ‌येणार आहेत". हे सांगताना छाती गर्वाने फुलून जाई. तेवढयात एस.टी. आली. ऊंच गोरेपान, आर्मी वेशात असणारे मुलं उतरली. तसे चाचा पळतच पोरांना मिठी मारली. त्याच्यां डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्यां हातात मोठंया पेट्याहोत्या. आर्मी जवान पेक्षा चाचा ऐटीत चालत होते. आईने तर अग माझी लेकरं असे म्हणत तिने त्यांना कुशीत घेतलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. 

"उस्मान मी एक मुलगी पाहिली आहे. आम्हाला आवडली. तू एकदा पाहून घे. म्हणजे लवकर लग्न उरकून घेऊ." चाचा म्हणाले. तुम्ही पाहिलीत ना मुलगी. तुमच्या पुढे मी जाणार नाही."

लग्न धुमधडाक्यात पार पड ले. जायला एक आठवडा शिल्लक होता. नवीन नवरी घरात होती. घरात सुंदरशी नाजूक नवरी सगळ्यांना हवं नको ते पाहत होती. आवडणारे खाद्य पदार्थ बनवता बनवता दिवस कधी निघून गेले कळलेच नाही. जाण्याचा दिवस आला. मुले जाण्याची तयारी करू लागले. चाचानाही मनातून दुःख वाटत होते. पण ते दाखवत नव्हते. आम्मी गुमसुम झाली होती. मुले जायला निघाली. तसे आम्मीचे डोळे पाणावले. 

"अगं रडतेस काय, तुल

ा तर गर्व झाला पाहिजे. तुझी मुलं देशाचे संरक्षण करण्यासाठी जातात. देशात त्यांचा किती नाव आहे." चाचा म्हणाले. 

"अहो ते अगदी बरोबर आहे. शेवटी आई चे मन आहे." आई म्हणाली. सगळं गाव सोडायला आला होता. सगळे रडत होते. चाचांची तीन मुले चालले होते. घर सुन्न सुन्न झालं होतं. नवरी ही उदास झाली होती. 

"तू काळजी करू नकोस. सहा महिन्याने येथील ते. तुला जर करमत नसेल तर तू माहेरी जाऊन ये. थोड्या दिवसात विसरलं तर पुन्हा घरी ये. तुझंच घर आहे." चाचा म्हणाले. 

काही दिवस गेले. पाकिस्तान भारत युद्ध पुकारले गेले. रेडिओवरून बातम्या येऊ लागल्या. आपले जवान शहीद होऊ लागले. तसे चाचांचा जीव वरखाली होऊ लागला. त्यांच्या मनात अनेक विचार येउ लागले. वैरी न चिंती ते मन चिंती तसे झाले होते. रहमानला गोळी लागली. तो खाली पडला. म्हणाला," दुश्मनाचा खात्मा करा, सोडू नका." गोळी छातीत लागली होती. रक्त खूप वाहत होते. तेवढ्यात रहीमला ही गोळी लागली. तो धारातीर्थी पडला. चाचा चे दोन लाडके जिगर धारातीर्थी पडले होते. ते कान देऊन न्यूज ऐकत होते. तेवढ्यात रेडिओवर रहीम रहीमान चे नाव आले. तशी आई चक्कर येऊन पडली. चाचाचे हृदय धडधडू लागले. सगळा गाव हळहळला. चाच्यांना दिल्लीला बोलावले गेले. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते शवपेटी सलामी दिली गेली. शवपेटी तिरंगा झेंड्यात गुंडाळले होते. चाचा सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होते. डोळ्यात भरून घेत होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational