झाकोळ
झाकोळ
मंद मंद ये समीर,
जागवीत आठवणी.
विकसित मधू गंध बहर.
स्वर्ग सुखाच्या लहरी...नेहा आई मालती सोबत भैरव राग गात होती.दोघी माय लेकी तल्लीन होऊन गात होत्या. गाणं संपल तसे नेहा ने टाईम बघितला,आई सात वाजले मला आवरायचे आहे,आज कॉलेज मध्ये प्रेझेंटेशन आहे.तो खडूस राकेश प्रोजेक्ट बघण्याच्या बहान्याणे जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो.मला तर त्याचा खूप राग येतो. नेहा म्हणाली.राकेश हा त्यांचा प्रोफेसर होता .
नेहा मग त्या राकेश पासून दूर रहा.जास्त त्याच्या मागे पुढे नको करुस.त्याची तक्रार का नाही करत तुम्ही मुली?
आई मी एकटी काय तक्रार करणार आणि तसा काही पुरावा ही नाही माझ्या कडे.मुली उगाच घाबरतात पण तू
काळजी करू नकोस.अस ही हे वर्ष संपत आले पुढच्या वर्षी तो राकेश आम्हाला शिकवायला नसेल.
बरे झाले,तरी तू सांभाळून रहा नेहा.
हो आई ,मी येते आवरून इतकं बोलून नेहा रूम कडे गेली.
नेहा आता कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती बीएस्सी मध्ये.ती आठ वर्षाची होती तेव्हा तिचे बाबा मालती ला सोडून निघून गेले होते.तेव्हा पासून मालती नेहाची आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडत होती.नेहा ही आई चे सगळे ऐकत असायची.आई ला कधी ती दुखवत नसे. मालती च्या डोळ्यात दिसणार दुःख,वेदना समजण्या इतकी नेहा मोठी होती.बरेचदा तिने आई ला हताश होऊन रडताना पाहिले होते.अनेक दुख, कष्ट घेवून मालती ने नेहा ला मोठे केले होते.मालती एका शाळेत संगीत शिक्षिका होती ,थोडे दिवस नोकरी केली त्या नंतर आता घरीच ती संगीताचे क्लासेस घेत होती.नेहा ने मालती ला बाबा का आपल्याला सोडून गेले,ते कुठे आहेत? अस कधीच विचारले नव्हते.
नेहा आवरून नाष्टा करायला आली.तिने एक सिवलेस टॉप आणि जिन्स घातली होती.
नेहा,आज प्रेझेंटेशन आहे ना मग असेल कपडे कशाला,जा बदलून ये.मालती म्हणाली.
ठीक आहे आई म्हणत नेहा चेंज करून आली, तिने एक लांब हाताचा कुर्ता त्या जिन्स वर घातला.
आई चा निरोप घेवून नेहा बाहेर पडली.
कॉलेज मध्ये प्रेझेन्टेशन झाले.नेहा आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत थांबल्या होत्या.इतक्यात तिथे त्यांच्याच क्लास मधला चेतन आला.हाय नेहा ,मी घरी चाललो आहे तू येतेस का,तुला ड्रॉप करतो.चेतन नेहा च्या घरा पासून जरा पुढे राहत होता.
ओके चल येते मी.म्हणत नेहा ने मैत्रिणी ना बाय केले.
चेतन सोबत नेहा त्याच्या बाईक वर बसून निघाली. चेतन तिचा मित्र होता.आज च्या प्रेझेन्टेशन बद्दल बोलत दोघे नेहा च्या घरा जवळ आले चेतन ने गाडी थांबवली, थँक्यु चेतन.नेहा गाडी वरून उतरत म्हणाली.
इट्स ओके बाय सी यू चेतन ने तिला शेक हॅण्ड केला.नेहा ला त्याच्या स्पर्शात वेगळं अस काही नाही वाटले.चेतन चा स्पर्श सहज होता. प्रो.राकेश मात्र मुद्दाम हून हाताला स्पर्श करत असे ते जाणवत असे सगळ्या मुलींना.राकेश कोणालाच आवडत नव्हता.पण चेतन चा स्पर्श नेहा ला छान वाटला.मैत्री पूर्ण असा.
चेतन पुढे गेला.नेहा घरात आली.
आई कॉफी तयार कर, मी आलेच आवरून.नेहा रूम कडे गेली.
कॉफी चे दोन मग घेवून मालती आली.नेहा आता तू कोणा सोबत घरी आलीस? कोण होता तो? मालती ने एक मग नेहा च्या हातात देत विचारले.
आई अग तो चेतन,माझा क्लासमेट आहे,चांगला आहे .
नेहा , कोणी किती ही चांगले असो पण अस कोणाच्या हातात हात वैगेरे देवू नकोस लोक चांगली नसतात.
आई मला तुझी काळजी समजते,मी सांभाळून राहीन ओके.
नेहा ला आई चा स्वभाव माहित होता,मालती तिला जास्त अंग प्रदर्शन करणारे शॉर्ट कपडे,भडक मेकअप करू देत नसे,मुलांशी ही चार हात लांबच रहा अस सांगत असे.नेहा आई च सगळ ऐकत असे.पण आई अशी का घाबरते हे तिला अजून समजले नव्हते. लोकांवर तिचा विश्वास नव्हता.सगळ्यांना एकाच नजरेने बघत असे.
नेहा तिच्या रूम मध्ये गेली.ती चेतन चा विचार करत होती,तिला चेतन आवडत होता आणि त्याच्या नजरेत ही तिला तसचं काहीसे दिसत होते,चेतन ला ही नेहा आवडत होती.पण आई ला ही गोष्ट कशी सांगायची हा मोठा प्रश्न होता नेहा समोर,आई ला हे असल प्रेम वैगेरे संकल्पना पटण्या सारखी नव्हती.अंधार पडू लागला तेव्हा नेहा तिच्या विचारातून बाहेर आली.ती हॉल मध्ये आली तर आई ने अजून दिवे ही लावले नव्हते,अस आई कधी करत नाही,आज काय झाले मग? असा विचार करत नेहा आई च्या रूम कडे आली,मालती खुर्ची वर डोळे बंद करून बसली होती,नेहा रूम मध्ये आली हे ही तिला समजले नाही.नेहा मालती समोर येऊन तिने मालती ला हात लावून हलवले..आई ये आई..नेहा ने आवाज दिला,तसे घाबरून मालती ओरडली,नको प्लीज मला हात नका लावू.
आई मी नेहा..अग काय झाले तुला ? का घाबरलीस?
मालती ने डोळे उघडले,रडून रडून ते सुजले होते.
आई तू ठीक आहेस ना? काय झाले तुला? नेहा ने विचारले.
नेहा,आज ही माझा भूतकाळ माझा पिच्छा सोडत नाही ग,म्हणून तुला सांभाळून रहा म्हणत असते,जे माझ्या बाबतीत घडले ते तुझ्या बाबतीत नको घडायला.
आई सांग मला काय झाले होते? नेहा ने आई चा हात हातात घेत विचारले.
नेहा,मी माझे आई बाबा आम्ही खूप आनंदात रहात होतो.सगळ कस छान चालू होते तेव्हा मी सातवीत होते,शाळेला जात होते.दिसायला अशीच तुझ्या सारखी नाजूक,हुशार त्यात गोड गळा लाभलेली.आई बाबांना माझं खूप कौतुक वाटायचे.एक दिवस बाबा एकदम टेन्शन मध्ये घरी आले,बाबांचे स्टेशनरी चे दुकान होते त्याचे कर्जाचे हफ्ते थकले होते म्हणून बँके कडून दुकान सिल करण्यात आले ,काही ठिकाणा हून बाबांनी कर्ज घेतले होते ते फेडण्या साठी राहते घर ही विकावे लागले.आम्हाला कोणाचा ही आधार राहिला नव्हता,तेव्हा माझ्या बाबांचे मोठे भाऊ त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी राहायला बोलवले.थोडे दिवस काकांच्या घरी राहू मग आपल्या घराचे बघू अस बाबांनी ठरवले.
आई बाबा आणि मी आम्ही तिघे जण काका कडे राहू लागलो. काकांना मुलंबाळं नव्हते म्हणून ते माझे लाड करत असायचे.मी ही त्या घरात छान रुळले होते.हळू हळू काका माझ्याशी गैर वर्तन करू लागले ,मी एकटी आहे अस बघून मला जवळ घ्यायचे,मला नको तिथे स्पर्श करायचे. मी नको म्हणत असायचे तरी काका ऐकत नसायचे.
नेहा मध्येच बोलली.आई अग मग हे सगळ तू आजी ला का नाही सांगितलेस?
नेहा,मी आई ला सांगितले पण आई ने मलाच गप्प राहायला सांगितले.आपण तुझ्या काकांच्या उपकारावर इथे राहत आहोत तेव्हा कोणा लाही याबाबत बोलू नकोस अस सांगून आई ने मलाच गप्प केले. काकांना बघितले तरी मला धडकी भरत असे.कसे बसे वर्ष भर आम्ही तिथे राहिलो नंतर बाबांनी एक भाड्याने घर बघितले.पण काका नी जे माझ्या सोबत केले ते मी कधी ही विसरू शकले नाही आज ही त्यांचा तो स्पर्श आठवला की मला किळस येते.आज ही अंगावर काटा उभा राहतो.
आई ,आता मी आहे ना तुझ्या सोबत तेव्हा नको त्या आठवणी आठवत बसू. तो तुझा भूतकाळ होता.
नेहा,आज तुला सांगते की तुझे बाबा आपल्याला का सोडून गेले.
आई तुला कंफर्टेबल वाटत असेल तर सांग नाहीतर मला काही ही जाणून नाही घ्यायचे.
नेहा,आज बोलू दे मला, तेवढंच माझं मन हलक होईल.
मालती ने मग आपले अश्रू पुसले आणि पुढे बोलू लागली
तुझ्या बाबा सोबत माझं लग्न ठरंल,आई बाबा खूप खुश होते पण मी मनातून घाबरले होते,लग्न होणार आणि कोणी अनोळखी पुरुष माझ्या आयुष्यात येणार ही कल्पनाच मला घाबरून सोडत होती.मी कस पुढे सगळ्या गोष्टींना तोंड देणार होते ,मला काहीच माहीत नव्हते.ठरल्या प्रमाणे माझं लग्न अनिकेतशी झाले.आई च्या गळ्यात पडून खूप रडले.अनिकेत च्या घरी आले ,मला खूप अस्वस्थ वाटत होते.लग्नाचे सगळे विधी पूजा वैगेरे झाली आणि आमची पहिली रात्र आली,मी घाबरून रूम मध्ये बसले होते.
अनिकेत ने मला ना जाणून घेतले ना समजून काही सांगितले.
तरी मी बोलले की मला थोडा वेळ हवा आहे,मी कंफर्टेबल नाही आहे.पण अनिकेत म्हणाला की,अस प्रत्येक मुलीला वाटत असते यात काही नवीन नाही.माझं काहीच न ऐकता अनिकेत ने माझ्यावर जबरदस्ती केली,हो ती जबरदस्तीच होती.मी मात्र या गोष्टीला तयार नव्हते.माझ्या मनाचा विचार तुझ्या बाबांनी कधीच केला नाही.त्यांना वाटायचे की माझं दुसऱ्या कोणा सोबत अफेयर होते आणि त्यांच्याशी माझं जबरदस्ती लग्न झाले आहे.त्यामुळे त्यांनी कधी मला समजून घेतलेच नाही.तुझा जन्म झाला आणि मी तुझ्या बाबा पासून दूर राहू लागले मला त्यांचा स्पर्श माझ्या बालपणीच्या त्या कडू आठ्वणी पुन्हा आठवण करून देत असायचा.माझी लग्न करायची इच्छा नव्हती पण आई बाबा ना कसे सांगणार होते मी की मला पुरुषाच्या स्पर्शाची भीती वाटते ते.मग एक दिवस अनिकेत आपल्या दोघींना सोडून निघून गेला कायमचा.थोड्या दिवसांनी त्यांनी मला घटस्फोटाचे पेपर्स पाठवून दिले .तुझ्या बाबांनी मला कधीच समजून नाही घेतले,माझ्या मनात काय सलते आहे,हे ही जाणून नाही घेतले.
आई ,आता जे झाले ते मागे टाक सगळ,आता त्या आठवणी मधून बाहेर ये.नेहा म्हणाली.
नेहा,तुला वाटत असेल ना की मी तुझ्यावर खूप बंधने घातली,माझ्या धाकात तुला वाढवले पण या मागे माझी भीतीच आहे नेहा,की जे माझ्या बाबतीत झाले ते तुझ्या सोबत नको व्हायला,लोक खूप वाईट आहेत ,कोण कधी आपला फायदा घेईल नाही सांगता येत .
आई जगात वाईट लोक आहेत तशी चांगली लोक सुद्धा आहेत.तू माझी काळजी नको करू आणि मी तितकी समर्थ आहे की कोणी माझा गैर फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिकार करू शकते.मी गप्प बसून अत्याचार सहन नाही करणार.
हो नेहा तू माझ्या सारखी दुबळी नको बनुस,लोकांचे स्पर्श ओळखायला शिक, गैर फायदा घेवू देवू नकोस.
आई तुझ्या बालपणात घडलेली घटना त्याचा तुझ्या मना वर इतका पगडा होता ना की तू त्यातून बाहेर आलीच नाहीस ना बाबांनी कधी तुला जाणून घेतले.पण आता त्या कडू आठ्वणी मनातून पुसून टाक.चल मी देवा जवळ दिवा लावते,तू कॉफी बनव दोघी साठी. आई ला थोड्या दिवसांनी चेतन बद्दल सांगुया असा विचार नेहा ने केला कारण आता या बद्दल काहीच बोलणे योग्य नव्हते.
मालती मग प्रसन्न मनाने उठून किचन कडे गेली. कॉफी बनवून बाहेर आली ,नेहा ने तिच्या कडून कॉफी घेतली,आई आता आपण दोघी मिळून गावू.
नेहा ने तोपर्यंत हार्मोनियम जवळ घेतले,आता तिला आई सोबत रियाज करावासा वाटत होता,जेणे करून आई चे मन आनंदी होईल.
संध्याकाळ आता रात्री कडे झेप घेत होती,मालती आणि नेहा यमन राग गात होत्या..
"तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी...
मालती चे डोळे भरून आले होते आणि गाण्या सोबत ते वाहू लागले.आज मालती चे मन जुन्या कडू आठ्वणी मधून बाहेर आले होते. नेहा सोबत सगळ मनातल
बोलून तिला खूप बर वाटत होते.
(समाप्त)
