Priyanka Shinde

Inspirational Others Children

3.5  

Priyanka Shinde

Inspirational Others Children

झाडे लावा, झाडे जगवा...

झाडे लावा, झाडे जगवा...

2 mins
195


झाड... झाड म्हणजे प्रत्येक जीवसृष्टी चा श्वास. हो... मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल कि या झाडांचा उपयोग किटकांना किंवा पशु - पक्षांना होतो. कारण पक्षी आपली घरटी ही झाडांवर बांधतात, आणि गंमत म्हणजे जी घरटी या झाडांवर बांधलेेेली असतात ती घरटी सुुुद्धा या झाडांच्या फांंद्यांना ज्या काड्या असतात त्या काड्यांपासून विणली जातात. 


  कित्येक हिंस्त्र प्राणीदेखील जंगलातील झाडाझुडपांनाच आपला आसरा बनवतात.आणि गायी - म्हशीसारखे पाळीव प्राणी ह्या झाडांचा पाला, गवत आणि चारा खाऊन आपली उपजीविका भागवितात. फुलपाखरांसारखे किटक ही झाडांवरील फुलांचा मधुररस ग्रहण करतात. पण तरीसुद्धा झाडे ही माणसांसाठी अतिशय महत्त्वाची असतात. कारण माणसांना लागणार्या बर्याच गोष्टी या झाडांंपासूनच मिळतात. 


पूर्वी माणसं राहण्यासाठी लाकडी तंबू व वाळलेल्या गवती काड्यांच्या झोपड्या बनवित असत. आणि आता ही बर्याच ठिकाणी झाडांंच्या लाकडांपासुुन, वाळलेल्या गवतांपासुन तंंबु व झोपड्या बनवल्या जातात. आता माणसांच्या सुख - सुविधा वाढल्यात. माणसांना लागणारे फर्निचर (अर्थात टेबल, खुर्ची, पलंग.इ.) हे देेेखील झाडांच्या लाकडांपासुन तयार केले जातेे आणि या सगळ्यामुळे आपले खूप जास्त नुकसान होत आहे कारण माणसांच्या वाढत्या सुख - सुविधांंमूळे झाडांची तोड - फोड होत आहे जेणेेेेकरून आपली झाडं ही कमी होत आहेेत किंबहुना एक वेळ अशी येईल कि आपली सगळी झाडं नष्ट होतील आणि आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागेेेल.


कारण माणसांना फक्त झाडांचे लाकूडच उपयुक्त नाहीए तर त्या व्यतिरिक्त झाडांची फुलं - फळं, कंदमुळं, भाजीपाला व गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखे पिष्टमय पदार्थ, मूग - मटकी यांसारखी कडधान्य, तुर - मसुुुर यांसारख्या डाळी अर्थात अन्नधान्य आणि अन्न म्हणजेच माणसाची पहिली गरज होय. कारण जगण्यासाठी माणसांना अन्नाची गरज असतेच.माणसाच्या शरीराला या अन्नधान्यातुन पोषक तत्व तर मिळतातच पण याच अन्नधान्यामुळे माणसं आपली भूक भागवतात. शिवाय मित्रांनो माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन ची नितांंत गरज असते आणि या ऑक्सिजन चा पुरवठा देेखील या झाडांमुुुळेच होतो.


कारण झाडे दिवसा कार्बन-डाय-ऑक्साईड आत घेऊन ऑक्सिजन बाहेर टाकतात जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनची उणीव भासत नाही. अशी ही झाडे जी फक्त आपल्याला देतात आणि आपल्याकडून घेत मात्र काहीच नाहीत... पण आपण त्यांना त्या बदल्यात काय देेतो..? काहीच नाही... उलट आपण झाडे तोडून आपण निसर्गाचं आणि आपलचं नुुुकसान करून घेत आहोत... 


झाडे ही माणसाला व निसर्गाला मिळालेली खूप मोठी नैसर्गिक देणगीच होय आणि म्हणूनच मित्रांंनो झाडे तोडण्याऐवजी झाडे लावा आणि झाडे जगवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational