Priyanka Shinde

Children Stories Fantasy Children

4.0  

Priyanka Shinde

Children Stories Fantasy Children

जादूचा दिवा

जादूचा दिवा

2 mins
183


   फार - फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट... एकदा एक मुलगा आपल्या आई - बाबांसोबत गावी जात होता. त्या मुलाचे नाव शान होते. त्याचे गाव हे एक जंगल पार केल्यानंतर त्या जंगलापासून चार ते पाच मैल दुर होते. पण गावी जाण्याचा रस्ता मात्र त्या जंगलातूनच होता. ते एक जंगल असल्याने तिथे हिंंस्त्र श्वापदांची खूप भीती असायाची. शिवाय त्या जंगलाच्या आसपास जी वस्ती होती त्या वस्तीतील बरेच लोक त्या जंगलातील जादू विषयी बोलत असत.


   शान आपल्या आई - बाबांसोबत गावी जात असताना अचानक त्याची वाट बदलते आणि तो त्याचा रस्ता चुकतो आणि त्या जंगलात तो हरवतो. त्याचे आई - वडिल त्याला खुप शोधतात. पण तो काही भेटत नाही. एवढ्या मोठ्या जंगलात आपल्या मुलाला आता कुठे - कुठे शोधायचं असं म्हणत तेे खचून जातात.आणि शानचे मात्र आपल्या आई - वडिलांना शोधण्यासाठीचे प्रयत्न चालूच असतात.


   तो त्या भयानक जंंगलात चालत राहतो. असचं त्या जंगलात चालत असताना तिथे एक छोटंसं तळं लागत. त्या तळ्यावर पाणी पिऊन तिथे थोडा वेळ विसाव्यासाठी म्हणून थांबला. शान तिथे थांबला असताना त्याला निरनिराळे आवाज ऐकु येवू लागले.आणि अचानक पणे तिथे अंधार झाला.हा अचानक झालेला अंधार आणि निरनिराळे ऐकु येणारे आवाज यामुळे शानला भीती वाटू लागली.


    अशातच त्याच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं... आता काय होणार...??? आपण घरी कसं परतणार...??? असा विचार करत असताना अचानक त्याचं लक्ष तळ्याच्या पलीकडच्या काठावर जातं. त्या काठावर लख्ख आणि प्रकाशमय एक धातु चकाकतो.

तो धातु नेमकं काय आहे आणि इतक्या अंंधारातही लख्ख चकाकतोय म्हणुन तो धातु हातात घेेऊन पाहतो. तो कुठलाही धातु नसुन एक दिवा असतो.


    तो दिवा आपल्या सोबत ठेवला तर या अंधारातही आपल्याला त्या दिव्याची मदतच होईल असा विचार करून तो दिवा स्वतःजवळच ठेवतो आणि तो दिवा साफ करताना त्या दिव्यातून एक जादूई जीन बाहेर येतो आणि तुला काय हवं आहे ते सांग असं तो जीन शानला विचारतो. त्यावर तो शान आश्चर्य व्यक्त करतो आणि आपल्या हरवलेल्या आई - वडिलांना शोधुन आपल्या घरी परत जाण्याची इच्छा व्यक्त करतो तशी त्याची ही इच्छा पूर्ण होते आणि तो सुुखरूपपणे आपल्या आई - वडिलांसोबत घरी पोहोचतो.


Rate this content
Log in