STORYMIRROR

Priyanka Shinde

Inspirational Others

3  

Priyanka Shinde

Inspirational Others

गरीबी...

गरीबी...

2 mins
225

    ही गोष्ट आहे माझ्या लहानपणीची. मी जेमतेम पाचवी ते सातवीत असेल तेव्हाची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे माझी शाळा सुुटली. पण आज बर्याच दिवसानंतर माझी आई मला घ्यायला आली होती. मी माझ्या आजीला आई म्हणत असेे. आई जेव्हा पण मला शाळेत घ्यायला यायची तेव्हा ती बांद्र्याचा गुरूनानक हॉस्पिटल च्या जवळ असलेला शेवटचा बसस्टॉप सोडून पुढल्या बसस्टॉपवर घेेऊन जात असे.


     त्या बसस्टॉपच्या समोरचं एक खानावळ असायची.तिथे वडापाव, भजीपाव, समोसा, इडली, डोसा आणि वडा सांंभर असे निरनिराळे खाण्याचे पदार्थ मिळत असे. त्या दिवशी आई नेहमीप्रमाणे या बसस्टॉपवर घेऊन आली. समोरच खानावळ असल्याने मी सहजच आईला म्हटलं चल आपण वडापाव खाऊया तशी आई मला घेऊन त्या खानावळी जवळ गेली आणि दोन वडापाव घेऊन एक वडापाव मला दिला आणि मी खायला सुरुवात ही केली. आई मात्र पैसेेेच देत होती.       


इतक्यात तिथे एक माणूस आला आणि त्याने अगदी सहज ओळख नसताना ही मला भुक लागली, काहीतरी खायला द्या असं म्हटलं. खरं तर त्या माणसाला बघूून माझी धांदल उडाली आणि थोडी भीती ही वाटली. कारण त्या दिवशी जे काही पाहिलं होतं ते याआधी कधीच माझ्या पाहण्यात आलं नव्हतंं. असो, नंतर त्या माणसाला भुक लागलीय त्याला थोडे पैसे देतेस का..? असं त्या माणसाकडेे बोट दाखवून मी घाबरलेल्या आणि शहारलेल्या अवस्थेत आईला विचारलं.


आई इथे - तिथे बघत होती पण तिच्या लक्षातच येईना मी नक्की कुणाविषयी बोलतेय. मग मी त्या माणसाच्या थोडं जवळ गेले आणि आईला म्हटलं अगं आई इथे थोडं खाली बघ तसं आईने त्या माणसाला बघितलं आणि आईने त्या माणसाची अवस्था बघताक्षणी आईने कुठलाही विचार न करता त्या गरीब, अपंग आणि भुुकेल्या माणसाला वडापाव घेऊन दिला.

     

त्या माणसाची अवस्था खूपच वाईट होती. त्याला दोन्ही पाय नव्हते शिवाय एक हात ही नव्हता आणि तो लाकडी फळी च्या चाकांच्या आधारे एक हात जमीनीवर टेकवून खुरडत असे. इतकी त्याची दुुर्दशा आणि परवडं... आणि मायेेनं पााठीवर हात फिरवणारंं किंवा स्वतःचे दुुःख व्यक्त करण्यासाठी कुुुणी हक्काचं माणूस नाही की स्वतःचं नातलग नाही कि घर - परिवार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational