STORYMIRROR

Priyanka Shinde

Others

2  

Priyanka Shinde

Others

कोरोना लसीकरण

कोरोना लसीकरण

1 min
129

        आता सध्या सगळीकडे कोविड -19 चे वातावरण आहे. कोविड - 19 म्हणजे कोरोना विषाणू मुळे पसरलेला एक संसर्गजन्य आजार ज्यामुळे कित्येक लोक, कित्येक माणसं आपला जीव सुद्धा गमावत आहेत.


      अशातच याच्यावर काहीही उपचार नसताना अवघे दहा महिन्यातच याच्यावर उपचारादाखल लस तयार करण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जनमानसात या लसीकरणाबाबत अनेक शंका आहेत त्यामुळे या लसीकरणा विषयी अनेक समज - गैैरसमज निर्माण झाले आहेत. कोविड - 19 वर साधारणतः प्रामुख्याने कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड अशा दोन लशी उपलब्ध झाल्या आहेत.

      

कोविशिल्ड ही लस घेतल्यानंतर पहिल्या दिवशी थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सुज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो. कोविडची लस घेेतल्यामुळेे कोरोना होऊ शकतो का...??? तर नाही. कोविड लस घेतल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता नाही. पण कोविड लस घेण्यापूर्वी जर कोरोना झाला असेल आणि त्याची लक्षणे दिसत नसतील तर लस घेतल्या नंतर त्याची लक्षणे दिसू लागतात.


    कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लशी मेलेल्या कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेेऊन तयार करण्यात आल्यात. पण त्यामुळे कोरोनाचा संंसर्ग होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून बचाव होतो.


Rate this content
Log in