Priyanka Shinde

Others

3.5  

Priyanka Shinde

Others

चक्रीवादळ

चक्रीवादळ

2 mins
190


        ही सद्यस्थितीचीच गोष्ट... अगदी अवघे कालपासून आजपर्यंत घडलेली ही घटना...साधारणतः परवा संध्याकाळ पासूनच थेंंब - थेंंब पाऊस यायला सुरुवात झालीच होती. तसं पाऊस म्हटलं कि आल्हाददायक वातावरणाची सुरुवात असते आणि त्यात पहिला पाऊस म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा...


      पण कालची गोष्टच काही निराळी होती... परवा जो थेंब - थेंब पाऊस येत होता तो पाऊस दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात येणारा आल्हाददायक पाऊस नव्हता, ज्या पावसाची आपण सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतो हा तो पाऊस नव्हता.


      ह्या थेंब - थेंब पावसाचं स्वरूप एका रात्रीत पूर्णतः बदललं आणि हा पाऊस जोरदार - मुसळधार या स्वरूपाचा झाला अर्थात हा पाऊस नुसता पाऊस नसुन ही चाहूल होती एका भयानक वादळाची आणि हे भयानक वादळ म्हणजे चक्रीवादळ...


     चक्रीवादळ हे एकप्रकारचे विध्वंसक वादळ होय. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोल - गोल फिरणाऱ्या हवेेेेमुळे बनते. या एकाएकी अचानकपणे आलेेल्या चक्रीवादळाने प्रत्येक जीवसृष्टी ला खुप मोठा धक्का दिला...या वादळामुळे झाडे - झुडपे मुळासकट खाली कोसळली. पक्षांची ही धांंदल उडाली. पक्षी ना आपल्या घरट्यात सुुखरूप राहू शकत होते ना घरट्याच्या बाहेर सुखरूप राहू शकत होते... आणि माणसांची नेहमीची कामं सुद्धा खोळंबली, प्रत्येक माणसाचं घरातुुन बाहेर पडणंं ही अवघड झालं होतं पण तरीही आपल्यावर आलेेलं हे संकट थोडक्यात टळलं म्हणुनच आता आपण या निसर्गालाच प्रार्थना करूया की आता इथून पुढे कुठलही संकट या जीवसृष्टीवर येऊच नये आणि असं कोणतही संकट आपल्या समोर उभं येऊन ठेपलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ ही आपल्यात येवो ही निसर्गचरणी प्रार्थना...


Rate this content
Log in