STORYMIRROR

Priyanka Shinde

Inspirational Others Children

2  

Priyanka Shinde

Inspirational Others Children

आई... (Prompt - 9)

आई... (Prompt - 9)

2 mins
203

'आ' म्हणजे आत्मा व 'ई' म्हणजे ईश्वर..."आत्मा आणि ईश्वर" या दोघांचे जेव्हा मिलन होते तेेव्हा "आई" हा शब्द तयार होतो. आई म्हटलं की, आईचं ओरडणं किंंवा आईचं मारणं आठवतं...पण खरचं इतकी वाईट असते का हो आई...??? खरचं आपल्याला आई उगाच मारत असते का...??? उगाच ओरडत असते का हो...??? तर  नाही... मुळीच नाही... आईच्या मारण्यात, तिच्या ओरडण्यातही तिचं प्रेमचं दडलेेेलं असतं. आपल्या मुलांना शिस्तीचे व संस्कारांचे पाठ ती शिकवित असते.


     आई ही आपल्या मुुलाच्या जन्मापासूूनच त्याची पहिली शिक्षिका होते. आई आपल्या मुलाला जन्माच्या आधी नऊ महिने, नऊ दिवस आपल्या उदरात वाढवत असते. मुलाला जन्म देतेवेळी ती अनंत कळा सोसत असते. आई आपल्या चिल्यापिल्यांसाठी पदराची झोळी करते. त्यांना बोलण्यापासून ते चालण्यापर्यंतच प्रशिक्षण हे आपल्या मुलांना आईच देत असते शिवाय आपल्या मुलांना घडवण्यात, त्यांंना चांंगले संंस्कार देण्यात ती कधीच कुुुुठेही कमी पडत नाही... वेळेनुसार आपल्या चिल्या-पिल्यांना ती योग्य ते मार्गदर्शन करत असते. मुलं चुुकत असेेल तर वेळ प्रसंगी ती मुलाला ओरडते, मारते कधी - कधी तर ती काठीने बदडायला देखील कमी करत नाही.   


    पण हे असं वागताना आईला काहीच वाईट वाटत नसेल का...??? हे सगळं करण्यामागे तिचा काही वाईट हेतु असतो का...??? नाही... नक्कीच नाही... मग तिचा काही स्वार्थ असतो का...?? आई ही स्वार्थी असते का...??? हो... आई स्वार्थीचं असते. पण तिचा हा स्वार्थ नक्की कशासाठी असतो...??? आपल्या मुलांसाठी... आपल्या मुलाच्या प्रत्येक इच्छा - आकांक्षा पुर्ण व्हाव्यात या अट्टाहासापायी...  


   आई आपल्या मुलांसाठी खुप मेहनत करत असते. अपार कष्ट करत असते तिला सतत असंं वाटत असतं आपण केलेल्या कष्टाचं चीज व्हावं आणि आपल्या कष्टाची फळं आपल्या मुलांना चाखता यावीत. आपल्या मुलाच्या शैैक्षणिक आयुष्यात कुठलाही व्यत्यय येऊ नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असते. मुलाने खुप-खुप शिकावं, खुप - खुप मोठं व्हावं. या जगात वावरताना आपल्या मुुुुलांनी मान - सन्मानाने जगावं आणि त्याहीपेेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मुलगा जनसामान्यात एक आदर्श ठरावा आणि एक चांगलंं व्यक्तिमत्व म्हणुन तो ओळखला जावा... हाच काय तो तिचा स्वार्थ आणि हिच काय ती तिची माफक इच्छा...           

          जगातली कोणतीही आई फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच काही करत नसते, तिचं जगणच मुळात तिच्या बाळांसाठी, तिच्या चिल्या-पिल्यांसाठी असतं, बाळ कितीही मोठं झालं तरी ते प्रत्येक आईला ते लहानच असतं. आपल्या मुलांच्या प्रत्येक चूका आई स्वतःच्या पोटात तर ठेवतेच पण आपल्या मुलाच्या प्रत्येक चुकीला तिच्या जवळ क्षमा असते आणि तरीसुद्धा आपल्या मुलांच्या प्रत्येक चूका सुधारण्याची क्षमता सुद्धा आईतच असते... आणि हे सगळं ती आपल्या मायेने, आपल्या अथांग प्रेमाने करत असते... 


      आणि म्हणूनच कि काय...??? पण असं म्हटलं जात "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी"  


आई म्हणजे मायेचा झरा,

आई म्हणजे वात्ससल्याची मूर्ती, 

तिच्याविना नाही 

उभ्या विश्वात मोठी किर्ती


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational