डॉक्टर्स आणि नर्सेस
डॉक्टर्स आणि नर्सेस
कोरोनाचं आव्हान समोर असताना आपल्यासाठी दिवसरात्र सेवा करून डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफबद्दल आणि आपल्यासारख्या जनसमुदयास आरोग्य सेवा देण्यार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाचं हवी. कोरानाचा काळ हा इतका कठीण आहे कि इथे प्रत्येकाने स्वतःची तर काळजी ही घ्यायलाच हवी पण त्याबरोबरच इतरांची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे.
पण हा काळचं असा आहे कि एक जरी व्यक्ती कोरोना बाधीत झाला तर पूर्ण घर - परिवार आणि शिवाय आपल्या आजूबाजूचा परिसर ही कोरोना बाधीत व्हायला फारसा वेळ लागत नाही शिवाय कोरोना बाधीतांच्या मृत्युची संख्या ही खूपच जास्त आहे आणि अशा परिस्थितीत ही कित्येक डॉक्टर्स आणि नर्सेस अशा कोरोना बाधीतांना मदतीचा हात देत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता कित्येकांंची सेवा करत आहेत शिवाय त्यांना मानसिक आधार देत आहेत.
असे असूनही त्यांना मात्र सोयी सुविधांचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय. हॅजमॅट सुट पुरेेेसे उपलब्ध नाहीत त्यामुळे मास्क किंवा रेस्पिरेटर, गॉगल्स, गाउन, ग्लोव्ज आणि शू कव्हरचा तुटवडा भासत आहेत आणि तरीसुद्धा जितके शक्य असेल तितके आपआपल्या परीने कोरोना बाधीतांंना वाचवण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सेस यांंचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच आपणही कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.
