प्रेमाचं त्रिकूट
प्रेमाचं त्रिकूट
ही नुकतीच घडलेली काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट...
नेहाने नुकतीच दहावीची परीक्षा पास होऊन कॉलेजमध्ये पदार्पण केले होते. तशी नेहा दिसायला सुंंदर, सुुुशील आणि स्वभावाने खुप मनमिळाऊ होती. ती स्वभावाने मनमिळाऊ असली तरीही चटकन अशी कुुुणावर ही विश्वास ठेवणार्यातली नव्हती. कुणाशी ही पटकन मैत्री करणं, किंवा सहजासहजी कुणाशी ही बोलणं हे तिच्या मुुळ स्वभावातच नव्हतं. पण तरीही तिच्या डोळ्यांत एक वेेेगळीच चमक होती. तिचे स्वप्न, तिचे ध्येय हे इतरांपेक्षा खुप वेगळे होते. तिला एक ठराविक उंची गाठूून स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या ध्येयाला एक नवी दिशा द्यायची होती.
अशातच तिची मैत्री एका सोज्वळ आणि प्रामाणिक मुुुुलीशी झाली. तिच नाव होतं सौम्या. सौम्या तशी दिसायला फार अशी सुंदर नव्हती पण तरीही नाकी-डोळी नीटस होती. आणि चेहरा तजेलदार, टवटवीत, प्रसन्न आणि हसमुख असायचा. शिवाय तिचा स्वभाव ही तसा बोलका होता. त्यामुुळे तिची अगदी सहजच एखाद्याशी मैत्री व्हायची. आणि त्यामुळेच की काय तिच्या आयुष्यात वेद आला होता. वेेद म्हणजे तिचा खुुप जुना मित्र. नुुुसतंं मित्र म्हणण्यापेक्षा त्यांच नातं हे मैत्री पलीकडचं होतं. त्यांची मैैैत्री ही कॉलेेेज मध्ये बर्याचदा चर्चेेेचा विषय असायची.
वेद हा दिसायला देखणा होता पण मनाने तो खुप चंचल असायचा. त्याचा स्वभाव गंमतीदार असायचा. त्याला मजा, मस्ती व विनोद करायला खूप आवडत असे. त्याच्या या मजा, मस्ती आणि विनोदी स्वभावामुळेच सौम्याला वेद आवडत असे पण तरीही तिने आपल्या मनातल्या भावना कधीही त्याच्यापर्यंत पोहचू दिल्या नाहीत.आणि म्हणूनच कि काय पण सौम्याच्या आयुष्यात अचानक पणे एक वादळ आलं.
जेव्हा वेद ने नेेेहाला बघितले तेव्हा पहिल्याचं नजरेेत ती त्याच्या मनात बसली. त्याने हळू-हळू तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्याला नेेेहाशी मैैैत्री करण्यात यश तर मिळालं पण नेहाला मात्र तिची स्वप्न, तिची ध्येय या सगळ्याचा विचार करता तिला थोडा संंकोच वाटत होता पण तरीही नेेेहाला ही वेेदची मैत्री आवडू लागली आणि या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला फारसा वेेळ लागला नाही आणि वेेद खुुुल्या मनाने भावुक होऊन तिच्यासमोर व्यक्त झाला व त्याने अगदी सहजतेने आपल्या प्रेमाचा पाठपुरावा दिला.
आणि हे सगळं घडत असताना सौम्या मात्र भान हरपून बसली. ती पूर्णपणे एकटी पडली. तिच्या आयुष्यातलं तिचं पहिलं प्रेम हे तिच्या उघड्या डोळ्यांनी कुण्या दुसर्याचं होताना तिने पाहिलं. ती हळूवारपणे वेद आणि नेहाच्या आयुष्यातून कायमच निघूून गेली पण तिच्या मनातल्या भावना या मनातच कोलमडूून राहिल्या.
