Vgshjsksldv Gshshshs

Drama

1.0  

Vgshjsksldv Gshshshs

Drama

जादूची छत्री

जादूची छत्री

9 mins
9.6K


आयुष्याची जादू मला कधीच कळली नाही. एका क्षणात आपल्यासोबत काहीपण होऊ शकत, चांगलपण आणि वाईटपण.मी जे भेटेल ते हसत हसत स्वीकारायच अस ठरवल होत. पण तरी कधी कधी भिती वाटतेच ना ?
तस त्या रविवारच्या दिवशी मी घराबाहेर पडलो चांगला सुर्यप्रकाश पडत होता, बोललो फिरुया. म्हणून मित्राला भेटायला त्याच्या घरी जायाच ठरल. पण पावसाने बरोबर मी घर सोडल्यावर पडायला सुरवात केली कसाबसा अर्धा भिजत मी बेलापूर स्टेशनला पोहचलो, कारण छत्री घेतली कि पाऊस पडत नाही पण छत्री नाय घेतली कि तो १००% पडणारच. तिथून मी पनवेल तिकीट काढून पनवेल लोकलला बसलो आणि तिथच माझ्या पायावर काय तरी पडल आणि मी दचकलो. आणि हळूच खाली पाहिल तर चक्क एक छत्री माझ्या पायावर पडली होती. ती मी बाहेर काढून आजूबाजूला विचारल ही छत्री कोणाची तर सर्वांनी आमची नाही अशीच उत्तर दिली.
मी पनवेल स्थानकांवर उतरलो पण पाऊस वाढलाच होता थांबायच नावच घेत नव्हता. चला देवाने पाऊसासोबत छत्री मोफत दिली अस समजून मी कव्हरमधून छत्री बाहेर काढली, तर ती एक लाल रंगाची लेडीज छत्री होती. बापरे डोक्यात विचार चालू झाले आता लेडीज छत्री घेऊन चाललो कि सर्व जण हसणार.
पण हिंमत केली आणि मी छत्री उघडली. जशी छत्री उघडली तशी माझ्या अंगावर फुल पडली. थोडी कोमजलेली पण सुंदर आणि सुगंधी अशी ती फुल होती जी पडल्यावर मन प्रसन्नच झाल. माझ लक्ष अचानक छत्रीच्या आतल्या बाजूला गेल तर तिथे एक कागद लटकत होता. त्या कागदावर लिहिलं होत.
मुग्धा गोडबोले
२४ नंबर बंगलो, मीराबाई चाळ जवळ, टी. जे. रोड विरार पूर्व.
आणि मोबाईल नंबर होता.
पत्ता वाचल्यावर मन मे लड्डू फुटा. कोणत्यातरी मुलीची छत्री मला पत्त्यासकट सापडली होती.
पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा मुलीला इंप्रेस करायची पहिलीच संधी मला मिळाली होती. मला काय करु आणि काय नको असच वाटत होत.
मी फोन लावला
कॉलर ट्युन वाजली
पाहिले न मी तुला तुला मला न पाहिले
फोन रिसिव्ह झाला
मीः मुग्धा गोडबोले का ?
फोनवरुनः हो मी मुग्धाच बोलतेय बोला आपण कोण ?
परत आवाज येण जाण बंद झाल, पाहिल तर मोबाईल स्वीच अॉफ झाला होता.
काय माझ नशीब. मोबाईल अशा वेळी आपटावासाच वाटतो. पण मुग्धाच्या आवाजाने मोबाईल वाचला होता. परत विचार केला डायरेक्ट जाऊया तिच्या घरी.
मनात एक निर्णय निश्चित झाला मित्र काय कधी पण भेटेलच पण ही संधी काय परत भेटणार नाही.
पनवेलवरुन सरळ वसई लोकल पकडायच ठरल पण माझ नशीबच खराब मेघाब्लॉकमुळे लोकल बंद. तरी प्रयत्न सोडायचा नाही अस ठरवून मी
पनवेल ते कुर्ला
कुर्ला ते दादर
दादर ते विरार
अस जायचं ठरवल.
छत्री होती तशीच त्या छत्रीच्या कव्हर मध्ये टाकली आणि माझी स्वारी निघाली विरारला.

पहिली लोकल पकडली
कुर्ला येईपर्यत विचार सुरु झाले
कशी असेल मुग्धा ?
आवाज इतका मजुंळ होता की मन प्रसन्न झाल, नावाप्रमाणेच मन मंत्रमुग्ध करणारी आणि गोड असावी. छत्रीवरुन वाटत होत जुन्या विचारांची असावी. छत्री दोन तीन ठिकाणी फाटली होती ती शिवली होती म्हणजे ती काटकसर करणारी असावी. बंगल्यात राहून सुध्दा साधी सरळ असावी, अशी मुलगी जीच्याशी लग्न करुन संसार थाटावा वाटत होत.

दुसरी लोकल पकडली
दादर येईपर्यत परत विचार सुरु झाले
तीला मी आवडेन का?
नावावरुन ब्राम्हण वाटतेय पण घरातले स्वीकारतील का?
जीन्स घालणारी असली तर आईला आवडेल का?

तिसरी लोकल पकडली
विरार येईपर्यत परत विचार सुरु झाले.
बंगल्यात नोकर असतात तर तिला जेवण बनवता येत असेल का?
माझा आदर नाही केला तरी चालेल पण आईबाबांचा आदर करेल का?
नोकरी करणारी असली तर घरात काम करेल का?
माझे विचार पटले नाहीत किंवा जास्त वाद झाले तर मला घटस्फोट तर देणार नाही ना ?

असु दे मी सकारात्मक विचार करायच ठरवल होत. मुलगी भेटण्याची आधीच लग्नानंतरचे विचार सुरु झाले होते
.
भेटल्या भेटल्या विचारुनच टाकू, आर नाही तर पार. काय होईल; झाल तर नाहीच बोलेल ना.
अभ्यास झालाच नाही; म्हणून परिक्षेला बसायच नाही का ?
बघू बसून एखाद्यावेळेस पेपर सोपा आला किंवा बाजूच्याने दाखवल तर काटावर पास पण होईन.

सकारात्मक विचार करायचा.

विरारला उतरुन मस्त एक पांढरा ३०० रुपयाचा शर्ट घेतला. स्टेशनच्या बाजूला असलेल्या मॉल मध्ये घुसून बाशरुममध्ये टीशर्ट शर्टाच्या बँगेत टाकला. शर्ट घातला, तोंड धुतल, दुकानातून आणलेल्या कंगव्याने केस विंचरली. नंतर मॉलमध्येच फुकटचा सेंट मारला, पावडर लावली आणि टकाटक हिरो झालो. ६० रुपयाचा रस्त्यावरचा एक चेष्मा घेतला. बंगल्यात राहणारी माणस अशीच राहत असावीत. जसा हिरो बनून बाहेर पडलो तसा पाऊस सुरु झाला. छत्री काढणारच होतो पण एक हिरो लेडीज छत्री वापरली तर कसा दिसेल. मग ती तशीच ठेवली आणि तसच भिजत एका रिक्षावाल्याला पत्ता विचारला.

मीः काका टी. जे. रोड कुठे आहे ?

रिक्षावालाः १० मिनटाच्या अंतरावरच आहे.

मी पळत पळत निघालो. १५ मिनट झाली तरी पत्ता काय येत नाही. परत दुकानातल्या काकांना विचारल

मीः काका टी जे रोड कुठे आहे ?

दुकानातले काकाः हा पी. जे. रोड आहे, टी. जे. रोड इथून डाव्या बाजूला २० मिनटाच्या अंतरावर आहे.

मीः बापरे आत्ता रिक्षा शोधावी लागणार.

दुकानातले काकाः रिक्षा, बस टाईमावर भेटणार नाही. चालत जावा की एक दिवस. चालण्यात पण मज्जा असती.

३० मिनिटे चालल्यावर टी. जे. रोड आला. तिथे एकाला विचारल.

मीः हा टी. जे. रोडच आहे ना?

रिक्षावाले आजोबाः हो, तुम्हाला कुठे जायाच आहे ?

मीः मीराबाई चाळ कुठाय ?

रिक्षावाले आजोबाः साहेब १५ मिनटाच्या अंतरावर आहे पण पहिल्यांदा डाव्या बाजूला जा. परत तिसऱ्या उजव्या बाजूने सरळ जा मग पहिल्या डाव्या बाजूला साईबाबा मंदिरासमोरच मीराबाई चाळ. मी सोडल असत पण आता जेवायची वेळ आहे माझी.

२० मिनटे शोधून एकही मंदिर सापडल नाही. परत एकाला विचारल

मीः दादा साईबाबांच मंदिर कुठेय ?

दादाः तुम्ही चुकीच आलाय इथून बाहेर निघा आणि पहिला डावा नंतर परत एक डाव वळण घ्या तिथेच साईबाबा मंदिर आहे.

१० मिनटाने मी कसाबसा मीराबाई चाळीजवळ पोहचलो.तिथे सेक्युरिटी गार्डना विचारलं

मीः काका इथ २४ नंबरचा बंगला कोणता ?

सेक्युरिटी गार्डः या लाईनने जा ही ११ ते ३० बंगल्याची लाईन आहे.

१० मिनटांनी मी मनाच समाधान मानून २४ नंबर बंगल्याची बेल वाजवली आणि एका पैलवान मुलाने दरवाजा उघडला

मुलगाः कोण पाहिजे ?

मीः मुग्धा गोडबोले इथेच राहतात का?

मुलगाः नाही

त्याच नाही उत्तर ऐकून चक्कर आल्यासारखी झाल.

एका उभ्या असलेल्या दोन चाकी गाडीवर बसलो परत ती छत्री उघडली आणि पत्ता नीट पाहिला तर ते २४ नंबर नव्हत ते १४ नंबर होत. १ पण २ सारखा लिहिला होता.

डोक्यावर हात मारला. आपल्या उत्सुकतेने आपली चांगलीच फजिती केली. तिथून परत उलट १० बंगले मागे गेल्यावर ५ मिनटांनी १४ नंबर बंगला आला.

मी बेल वाजवणार तेवढ्यात दरावाजा उघडला आणि बाहेर एक बाई आल्या.

बाईः कोण पाहिजे ?

मीः मुग्धा गोडबोले इथेच राहतात का?

बाईः व्हय. इथच राहत्यात. तुमी कोण ?

मीः त्यांची छत्री द्यायची होती.

ती ओरडत आत गेली

म्याडम छत्री मिळाली, छत्रीवाला आलाय.

बाहेर एक भिजलेल्या कपड्यातला, केस विसकटलेला, दोन तासाचा लोकल प्रवास आणि दीड तास चालून प्रवास केलेला हिरो उभा होता तो म्हणजे मीच.

ती बाई आली

बाईः सायेब माफी करा. मी इसरलेच तुमाला. या आत. मी कामवाली हाय. इथ काम करती. म्याडम येतायत तुमी बसा इथ. पानी घ्या.

मीः धन्यवाद

पाणी पिल्यावर पाण्याची खरी किंमत कळली. ३ तासापेक्षा जास्तवेळाने मी पाणी पिल. पाणी अमृतापेक्षा सुंदर आहे अशी जाणीव झाली. ज्या अप्सरेला मी शोधत होतो तिला मी फाइनली भेटणार याची जाणीव झाली. बंगल्याची सजावट बघून सर्व थकवा गायब झाला. घरात सुध्दा छोटी निरनिराळ्या सुंदर फुलांची बाग होती. त्यांचा सुवास पूर्ण घरात पसरला होता.
मी परत येऊन सोफ्यावर बसलो.कोणीतरी आल.

मी पाहिल तर,
पायाखालाची जमीन सरकली,
स्वप्नांचा चुराडा झाला,
अपेक्षांचा कचरा झाला,
विचार, वेळ, कष्ट, हिरोगिरी वाया गेले.

कारण ती ती नव्हती ती त्या होत्या.

मुग्धा गोडबोले ह्या एक आजीबाई होत्या.

आजीः नमस्कार

मीः नमस्कार. ही आपली छत्री घ्या. मी येतो.

आजीः बाळा मी भूत आहे का रे?

मीः नाही आजी.

आजीः मग पळतोस का बस थोडावेळ.

मीः हो बसतो.

आजीः कमला एक टॉवेल आण. चहा पिणार की कॉफी?

मीः काही नको. मला लांब जायच आहे येतो मी.

आजीः अरे बाळा छत्री नसताना बाहेर पाऊस पडतोय. थांब जरा. मी तुला खाणार नाही. जेवण झाल का तुझ?

मीः नाही मी सकाळी नाश्ता केला.

कमलाबाईंनी टॉवेल दिला.

आजीः खूप खूप धन्यवाद बाळा. माझ्या छत्रीसाठी तू एवढा लांब आलास. आता जेवून जा.

मीः नको आजी भूक नाही.

आजीः तुझा थकलेला चेहरा भुकेला आहे त्याचासाठी जेव. आवडेल तुला जेवण. आणि मी पण आज उशीराच जेवतेय. कमला जेवण लाव.

मीः मी थोडसच जेवेन.

आजीः तुम्ही आजकालची पोर थोडस बोलून चिमणीपेक्षा कमी जेवता. कस अंगात रक्त बनणार.

मी गप्पच बसलो.

आजीः मग किती पैसै देऊ तुला?

मीः कसले?

आजीः छत्रीचे.

मीः अहो मला काही नको.

आजीः बोल. लाजू नकोस.

मीः मला खरच काही नको आजी. तुम्ही जेवायला विचारलत हेच बस आहे.

आजीः अरे वेड्या चांगली अॉफर आहे माग पैसे.

मीः नको आजी.

आजीः या छत्रीची किंमत पैशांपेक्षा जास्त आहे. तू लाखो रुपये मागितलेस तरी देण. माग.

मीः खरच नको काही. मी मदत म्हणून छत्री दिली. माझ पाकिट पण एकदा हरवल होत पण कुणी पत्त्याचा पुरावा असून परत केल नाही. म्हणून मी छत्री तुम्हाला दयायला आलो.

आजीः व्हा छान विचार. अरे ही छत्री माझ्या स्वर्गीय पतींनी भेटवस्तू म्हणून मला दिलीय. त्याची गोड आठवण. चार वर्षापूर्वी ते आजारपणामुळे गेले. पण या छत्रीने मला त्यांच प्रेम दिलय. म्हणून मी ही छत्री फक्त माझ्यासोबत घेऊन फिरते पण वापरत नाही. दररोच सकाळी यात फुल भरुन ठेवते. ही छत्री आमच्या प्रेमाच एक प्रतीक आहे. म्हणून ही शिवून ठेवलीय. चल जेवून घे आधी.

जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटल. जाऊ दे माझ्या कल्पनेने जरी मला फसवल असल तरी नवीन अनोळखी व्यक्तींना भेटण्याचा आनंदच वेगळा असतो.

जेवताना

आजीः जेवण आवडल का ?

मीः हो खूप छान आहे.

आजी. जमेल तस बनवते. पण आता शरीर साथ देत नाही. मग कमला मदत करते ?

मीः व्हा मस्तच आहे जेवण.

आजीः राहतोस कुठे ? करतोस काय ?

मीः राहायला बेलापूरला आहे. इंजिनिअर आहे. एका कंपनीत काम करत होतो पण कंपनी बंद पडली ६ महिन्याचा पगार बुडला. आता नोकरी शोधतोय.

आजीः ओके, नोकरी शोधण्याच्या व्यतिरिक्त काय करतोस ?

मीः तस काय खास नाही. पण आवड आणि छोटी कमाई म्हणून ५ वी ते ८ वी च्या मुलांच्या कमी पैशात शिकवण्या घेतो.

आजीः व्वा अप्रतिम का. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. खर आजची पोर फक्त नोकरी भेटत नाही म्हणून रडत बसतात. नोकरी शोधण्यासोबत छंद जोपासले पाहिजेत. माझ्या मिस्टरांची अशीच कंपनी बंद पडली तरी टेन्शन न घेता. नोकरी शोधता शोधता समाज कार्य करायचे.

आजीः ठीक आहे. कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलस ?

मीः इंजिनिअरिंग मध्ये काटावर पास झालो होतो. आधीच्या सेमीस्टर केट्या पण होत्या नंतर त्या कशाबश्या सुटल्या. म्हणून कुठे चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली नाही. नंतर एका छोट्या कंपनीत लागलो. दोन वर्ष काम केल. अॉटोमेशन क्षेत्रातल मला खूप ज्ञान मिळाल, परत जी बंद झाली त्या कंपनीत मी स्वीच झालो. इथ पण खूप काही शिकलो. पण आता बेरोजगार आहे.

आजीः बाळा खचू नकोस. आयुष्यात संकट येण हे चांगल असत. तुझा मार्ग खडतर असेल पण तुला यश मिळण पक्क असेल.

जेवण झाल

मीः जेवणासाठी धन्यवाद. आजी आता मी येतो.

आजीः जरा थांब या कागदावर तुझ नाव आणि मोबाईल नंबर लिही.

मी लिहिला.

कमलाने आईसक्रीम आणून दिल. आणि आजी आत गेल्या.

मी आईसक्रीम खाऊन निघण्यासाठी तयार झालो.

आजी आल्या.

आजीः हे घे तुझ अपॉईटमेंट लेटर. उद्यापासून तु मुग्धा अॉटोमेशन सोल्युशन्स लिमिटेड चा कर्मचारी. २५००० पगार, सहा महिन्यानंतर तुझ्या कामावरुन वेतनवाढ होईल.

मीः Madam तुम्ही ?

आजीः ही माझीच कंपनी आहे. उद्या येऊन आमच्या कंपनीच्या Project Manager ना भेट. ते तुझी सगळी काम तुला समजवतील.

असाच इमानदारीत काम करत राहिलास तर चांगली प्रगती होईल. पैशाच्या मागे पळू नकोस. ज्ञानाच्या मागे पळ आणि अशी परिस्थिती बनव की पैसा तुझ्या मागे पळाला पाहिजे.

मीः खूप खूप धन्यवाद madam.

आजीः धन्यवाद बोलू नकोस. मीच तुला माझ्या आयुष्यात ही छत्री आणून देण्यासाठी धन्यवाद बोलते.

मी त्याची परवानगी मिळवून तिथून निघालो.

खूप खूश होतो मी, वाटलच नव्हत माझ्या सकाळच्या वाईट सुरवातीनंतर एवढा चांगला दिवस बघायला भेटेल.

मी कंपनीत जॉईन झालो.
अप्रतिम कंपनी. सर्व माणस कामाच्या बाबतीत प्रामाणिक होती कारण तिथे कोणी नोकर नव्हत. सगळ्या माणसांना पगाराव्यतिरिक्त कंपनीच्या नफ्यातून प्रत्येक महिन्याला बोनस भेटतो. कंपनीच रेकॉर्ड होत. तिथे कामाला लागलेला एक पण माणूस नोकरी सोडून गेला नव्हता.
सर्वजण समाधानी होते. कुणाची काहीच तक्रार आढळत नव्हती. मुग्धा madam यांनी कंपनीला कुंटुबासारख जपल होत. तिथ एकमेकांशी शर्यत नव्हती. सर्वजण एक समान होते.

आज सहा वर्ष झालेत. जग बदलल माझ एका छत्रीने.

आज मुग्धा madam या जगात नाहीत. त्यांची मुलगी संजना या कंपनीची मालकीण आणि माझी बायको आहे.

खूप जणांना वाटत संजना एका पायाने अधू असून मी तिच्याशी लग्न प्रॉपर्टीसाठी केल.
पण तस काही नव्हतं.
पगारात आलेले पैसे वाचवून मी दान कार्य करायचो. हीच माझी गोष्ट संजनाला कळाली आणि तिने मुग्धा madam ना सांगितली.त्यानंतर संजनाच आणि माझ लग्न झाल.

खरतर आपण माणसाची किंमत त्याच्या दिसण्यावरुन, बोलण्यावरुन आणि वागण्यावरुन ठरवतो पण प्रत्येक माणसाला ओळखणं खूप अवघड असत हे संजनामुळेच मला कळाल.

संजना मला हवी तशीच मुलगी आहे.
मुग्धा madam ची सावली तिच्यावर पडली होती.
एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण असून सुध्दा, घरात अज्ञाळू सून, प्रेमळ बायको हे नात ती प्रामाणिक आणि उत्तम निभावतेय.
तीला अजिबात घमंड नाहीय. मला अहो जावोच करते.
जीन्स तीला खूप आवडते पण माझ्या घरातल्यांना आवडणार नाही म्हणून साडी आणि ड्रेस वापरते.
मी तिला कौतुकाने एकदा विचारल होत, मी तुला आयुष्यात काय दिल? तु का माझाशी लग्न केलस ?
तर ती फक्त एकच वाक्य बोलली
मला तुमची बायको होण्याचा मान दिला, एवढ चांगल कुंटुब दिल अजून काय हवय.
कामामुळे आम्हा दोघांना भांडायच कारण शोधायलापण वेळ नसतो.

आज ती छत्री मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने बांधलेल्या बंगल्यात काचेमध्ये ठेवलीय.

सासूबाईंसाठी जरी ती छत्री सासरेबुवांच्या खऱ्या प्रेमाच प्रतिक असली तरी माझ्यासाठी मात्र माझ आयुष्य बदलणारी जादूची छत्रीच आहे.


माझी ही कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा

वाचकांच्या ह्रदयाचा मोफत भाडेकरु

मन एक लेखक


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama