Priyanka Kumawat

Crime

3.2  

Priyanka Kumawat

Crime

इमाकुली

इमाकुली

3 mins
357


आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट आहे जिच्या केवळ असल्याने आपण पहिली लढाई जिंकलेली असती. आत्मविश्वास असेल तर कठीणातील कठीणाई पार करण्याचे बळ आपोआप मिळते. आत्मविश्वास हा एक आतील प्रकाश असतो जो आपल्याला आपल्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो, हिम्मत देतो. कधी हार मानू देत नाही. आत्मविश्वास च्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते. इमाकुलीला आत्मविश्वास होता की ही कठीण परिस्थिती निवळेल आणि आपण ही यशस्वीपणे पार पाडू.

इमाकुली. रेवंडा या आफ्रिकेच्या छोट्याशा देशातील मुलगी. दोन धर्मात झालेल्या वादामुळे सर्वत्र हत्या केली जात होती. लोकसंख्या जास्त असलेल्या धर्माचे लोक विरोधक धर्माच्या लोकांना संपावायच्या मागे लागले होते. त्यांची निर्घृणपणे हत्या करत होते. धर्म वादामुळे तिच्या परिवाराचीही तिच्या समोरच हत्या केली गेली. तिच्या भावाच्या डोक्यात तिच्या समोर कुर्हाड टाकून हत्या केली. इमाकुली प्रचंड घाबरली. तिला घरचे इथून पळून जा सांगत होते म्हणून ती वाचली. तिथून पळून ती तिच्या शिक्षकांकडे गेली. वास्तविक तिचे शिक्षक हे विरोधी धर्माचे होते. पण हा धर्मवाद , होणारा हत्याकांड त्यांनाही मान्य नव्हता. ते तिला आणि अजून ७ स्त्रियांना आसरा देतात. एका बाथरूममध्ये त्यांना लपवतात. त्यासमोर मोठे कपाट लावून देतात. त्यांच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे होते. जेणेकरून त्यांच्या घरावर धाड पडली तरी ते सेफ राहावे. बघणार्यांना कळाले नसते की त्यामागे बाथरूम आहे. कपाटाच्या खालून ते २ वेळचे जेवण सरकवायचे.

एका छोट्याशा बाथरूम मध्ये तिला तब्बल ९० दिवस काढावे लागले . बाथरूम छोटे असल्याने एकमेकांना चिकटून बसावे लागे. बसून झोपणे. तसेच जेवण करणे हे सारे त्याच अवस्थेत करावे लागे. ९० दिवस बिना अंघोळीचे इतके दिवस राहणे, त्यात अंगाचा घाणेरडा दर्प, प्रातविधी ही बाकीच्या स्त्रियांसमोरच करावा लागे. सगळ्यांसाठीच ते अवघड होते. एकमेकांसमोर असे उघड्यावर प्रातविधी करणे ही सोपी गोष्ट नव्हती पण ईलाज नव्हता. इतरांना आपल्या समोर प्रातविधी करताना पाहणे आणि ते सहन करणे हे ही अवघड होते. त्यात मासीक पाळीचा घाणेरडा दर्प आणि त्या दिवसातील घाणेरडी अवस्था हे सगळे सहन करण्याची पलीकडे होते.

इमाकुलीने या ९० दिवसांचा सदुपयोग केला. ती जेवणासोबत शिक्षकाकडून इंग्रजी चे पुस्तके मागवायची आणि ते वाचायची आणि शिकायची. तिला विश्वास होता की धर्मवाद संपेल तेव्हा आपण नक्की बाहेर पडू. तिला आत्मविश्वास होता की आपण जी इंग्रजी शिकू त्याचा वापर करून आपण आपल्या सोबत आणि आपल्या धर्माच्या लोकांसोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडू. तो अन्याय आपण सगळ्यांसमोर मांडू. तिच्या या आत्मविश्वासाने च तिला त्या कठीण ९० दिवसांतून तारले. यामुळे ९० दिवसात तिच्या सोबतच्या स्त्रिया मानसीक रूग्ण झाल्या. पण इमाकुली ची मानसीक स्थिती स्थिर राहिली. 

अखेर तिचे सत्य ती तिने नुकत्याच अवगत केलेल्या इंग्रजी भाषेत जगासमोर मांडू शकली. तिला अंत्यंत दु:ख झाले. तिचा अख्ख्या परिवाराला तिच्या समोर मारले. ते ही अंत्यंत निर्घृणपणे. परिवारातील कोणी शिल्लक नव्हते. पण झालेल्या अन्यायाला वाचा फोडून तिने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यंत धाडसी अशी इमाकुली तिच्या घरी गेली तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जशाच्या तसा उभा राहिला. तिच्या समोर त्या मारेकर्यांना आणण्यात आले. पण इमाकुलीने मन घट्ट करून त्यांना माफ केले.

ती फक्त धाडसी नव्हे तर चांगुलकी अंगी बाळगलेली मुलगी होती. तिला माहीत होते की जो आपल्या सोबत जसा वागतो, त्याच्या सोबत आपणही तसेच वागलो तर दोघात काहीच फरक नाही. कोणाला मारणे ही आपली संस्कृती नाही. आपला धर्म नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime