ईश्वरसेवा
ईश्वरसेवा
ऐहिक सुखाचा, पैसा-अडक्याचा किंवा सुख सोयीचा कधीच त्यांना मोह पडला नाही. अहो! आयुष्याचा उर्वरित काळ आनंदित जावा ह्यासाठी कोणतीच तरतूद त्यांनी केली नव्हती, असे हे रामभाऊ, सुखाच्या,पैश्याच्या बाबतीत मात्र जरा उदासीन होते... एकीकडे सारं जग त्यांना नावाजतंय, त्यांना डोक्यावर घेतंय, समाजसेवक म्हणून वाखाणतंय पण ह्या गोष्टीचा कधीच त्यांनी विचार नाही केला, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं कधीच त्यांना नाही वाटलं, खरंच जनसेवा हीच ईश्वरसेवा हे त्यांनी कृतीतून दाखवलं दाखवलं...
