STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational

3  

vaishali vartak

Classics Inspirational

हर्ष मनी रहावा

हर्ष मनी रहावा

1 min
235

सदा मना सारखे... मनाजोगे मिळणे ..वा होणे. असे जीवनात होत असता.मग काय हर्ष ,आनंद होत असतोच .नेहमीच देवा कडे मागावे व त्याने उदार हस्ते आपणास द्यावे. मग काय आनंदी जग आयुष्य असते. सुखाच्या पायघड्या देवाने घालून ठेवल्या सारखे वाटते. तसेच माझे काहीसे झालेय.  खरच देवावरील दृढ विश्वास ...नशीब ..भाग्य अथवा माझ्या सारखी मीच ..आहेच जीवनात हर्षाने भरलेली आहे. अर्थात समाधानी वृत्ती हे खरे कारण असेल . 

बालपणापासूनची आजीची...नंतर , आईबाबांची शिकवण.मनी हर्ष सदा भरलेला. वृत्ती च आनंदी समाधानी ...याचे कारण आहे ...आपल्या जवळ आहे त्यात समाधान मानणे. ही सदैव शिकवण ...त्यामुळे मोठे धन होते मनात ...समाधान.  अशा संस्कारात मोठी झालेली त्यात भाग्य उजळले ... यांच्या सारखे पती लाभले. सुंदर दृष्ट लागेल असा संसार झाला ..गोंडस मुले. व कन्या दानाचे पण पुण्य..... कन्या रत्न प्राप्त झाल्याने ते ही पदरी लाभले .तिला मोठे करण्यात माझी हौस मौज पूर्ण केली ..झाली. प्रत्येकाने मुलांनी मुलीने कर्तृत्वाने दृष्ट लागेल असे संसार थाटले. वेळेनुसार आजी आजोबाची पदवी पण मिळाली.     आता खरच "घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे"ह्या गाण्यांच्या ओळी गुणगुणत ...देवाला स्मरतेय.असा देवानी आभाळभर हर्ष दिला आहे . कारण देवाने काय दिलय याचाच हिशोब जीवनी ठेवलाय . म्हणून म्हणते, " हर्षहा मनी रहावा. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics