Ajay Nannar

Horror Thriller

4.0  

Ajay Nannar

Horror Thriller

Hostel Days

Hostel Days

3 mins
244


Hostel Days


हा अनुभव माझ्या बहिणीसोबत काही वर्षांपूर्वी घडला होता. माझी बहिण म्हणजे प्राजक्ता तेव्हा १० वी त शिकत होती. त्या वर्षी त्यांची ट्रीप माथेरान ला गेली होती. ते पहाटे निघाले होते त्यामुळे सकाळी ११ च्या सुमारास तिथे हॉटेल वर पोहोचले. हॉटेल अगदी शांत ठिकाणी होते. आजूबाजूचा परिसर अगदी दाट झाडांमुळे भरला होता. काहीसे वेगळेच वाटत होते त्या सगळ्यांना. पोहोचल्यावर नाश्ता वैगरे झाला आणि त्यांना रूम्स दिल्या गेल्या. प्राजक्ताला १०१ क्रमांकाची रूम मिळाली होती. प्रत्येक रूम मध्ये ५ मुलींना राहण्याची सोय होती.  प्राजक्ता सोबत तिची अगदी खास मैत्रीण श्वेता ही होती. ठरल्याप्रमाणे कॅम्पिंग वैगरे करून त्या आपल्या रूम मध्ये आल्या. सगळ्या जणी खूप थकून गेल्या होत्या. रात्रीचे जेवण ही तिथेच कॅम्प मध्ये होते त्यामुळे ते उरकून त्यांना यायला बराच उशीर झाला. जवळपास रात्रीचे ११ झाले असावेत. अंथरूण वैगरे करून ते झोपलेच होते की श्वेता ला रूम च्याच बाहेरून कसलीशी चाहूल जाणवली. तसे ती उठली आणि रूम च्या बाहेर आली. बाहेर कोणीही नव्हते तसे ती थोडी दचकली. पण आपल्याला भास झाला असेल असा विचार करून ती पुन्हा रूम मध्ये जाण्यासाठी फिरली आणि तिला पुन्हा ती चाहूल जाणवली. 


तिने झटकन मागे वळून पाहिले तर एक १०-१२ वर्षांची लहान मुलगी उभी होती. जवळच असलेल्या माठातून पाणी पीत होती. श्वेता ने तिच्याकडे दुर्लक्ष केल. खरं तर ते संपूर्ण हॉटेल फक्त त्यांच्या साठी बुक केलं होत त्यामुळे इतक्या लहान मुलीच तिथे असणं जरा विचित्र होत. त्यामुळे श्वेता तिला तिथे पाहून बरीच घाबरली होती. ती दबक्या पावलांनी रूम मध्ये जाऊ लागली तसे तिला मागून तिच्या नावाने हाक ऐकू आली आणि ती प्रचंड घाबरली. त्या मुलीने तिला नावानिशी हाक दिली होती. ती जागीच थांबली आणि मागे वळली. ती लहान मुलगी तिच्या जवळ आली आणि तिला विचारले “तुम्ही या १०१ नंबर च्याच रूम मध्ये राहता ना.”  श्वेता ने घाबरतच हो म्हटलं. तसे ती पुढे म्हणाली “तुम्ही ती रूम लगेच रिकामी करा तिथे एका मुलीने आत्महत्या केली होती”. इतक्या लहान मुली चे असे अभद्र बोलणे ऐकून ती धावतच रूम मध्ये आली आणि रडू लागली. तिने प्राजक्ताला उठवून घडलेला प्रकार सांगितला. प्राजक्ता ही घाबरली. अनोळख्या ठिकाणी असे काही घडतेय म्हंटल्यावर कोणाच्याही मनात भीती निर्माण होण साहजिक होत. ती रात्र त्या पाचही जणींनी कशी बशी काढली. सकाळ होताच शिक्षकांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसे त्यांनी ही मेनेजर ला सांगून त्यांची रूम बदलली. 


कॅम्प एकच दिवसाचा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते सगळे घरी आले. एव्हाना सगळा प्रकार त्या मुलींनी त्यांच्या घरच्यांना सांगितला होता. प्राजक्ता ने ही आम्हाला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या रात्री प्राजक्ताला खूप ताप भरला होता. कॅम्प मधल्या अक्टिवि टी ज मुळे ती पुरती थकून गेली होती. तिला झोप कधी लागली कळलेच नाही. साधारण दोन ते अडीच च्याच सुमारास तिला हाक ऐकू येऊ लागली. तिने किंचित डोळे उघडले आणि समोर तीच १०-१२ वर्षांची मुलगी उलटी मांडी घालून तिच्या शेजारी बसलेली दिसली. ते जीवघेणे दृश्य पाहून ती जोरात किंचाळली तसे घरचे सगळे जण जागे झाले. तिला विचारू लागले की काय झाले तू इतक्या जोरात का ओरडलीस. 



तिने ती मुलगी आपल्या घरात दिसल्याचे आम्हाला सांगितले. आम्ही तिची बरीच समजूत काढली आणि देवाचा अंगारा लाऊन तिला झोपवले. पण तिला अजूनही कळले नाही घरी आल्यावर तिला ती मुलगी खरच दिसली होती की तो फक्त तिचा एक भास होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror