STORYMIRROR

Ajay Nannar

Horror Thriller

3  

Ajay Nannar

Horror Thriller

हॉस्टेल एक रहस्य

हॉस्टेल एक रहस्य

3 mins
305

-हि गोष्ट आहे ४ वर्षापुर्वीची, बारावीचा result नुकताच लागला होता. निकिता खेड्यापाड्यात राहणारी श्रीवर्धन झिल्यातली शांत मुलगी होती. नेहमीच आपल्या हुशारीने तिने शाळेतल्या आणि जुनिअर कॉलेज मधल्या शिक्षकांची मन जिंकली होती म्हणूनच ती एक आवडती विद्यार्थीनी होती. 


ह्यापुढील शिक्षण मुंबईत येऊन करावं अशी तिची ईच्या होती, तिने मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध इंजिनीरिंग कॉलेज मद्धे ऍडमिशन घेतलं होत. आता गावसोडून एवढ्या लांब मुंबईत आली होती तर मग राहायचं कुठे हा विचार करत असतानाच प्रियांका नावाच्या तिच्या कॉलेज मधल्या मैत्रिणीने सल्ला दिला कि आपण हॉस्टेल मद्धे एकत्र राहुयात. त्याप्रमाणे निकिताने तसा फॉर्म भरला आणि ती प्रियांका च्या रूम मद्धे जॉईन झाली. 


दुपारी कॉलेज चे lecture संपल्या नंतर निकिता हॉस्टेल मद्धे जाऊन नेहमी प्रियांका सोबत गप्पा मारत असे, दोघी पण मस्ती करत असत. प्रियांका ला एक सवय होती ती म्हणजे ती कधी जास्त lecture अटेंड करत नसे आणि अक्खा दिवस त्या हॉस्टेल मद्धेच एकटी राहत असे. हल्ली निकिताला खूप टेन्शन आलं होत कारण हॉस्टेल ची रूम ३ मुलींसाठी असते पण ह्या तर दोघीच होत्या त्यामुळे निकिताला खूप टेन्शन आलं होत. 


प्रियांका हल्ली एकटी एकटी रहायची, जास्त कोणाशी बोलायची नाही. का कुणास ठावूक ती निकिता सोबत पण हल्ली जास्त बोलत नसे, दुपारी हॉस्टेल मद्धेच थांबायची आणि काळोखात बसून राहायची तीच असं वागणं कुठे तरी निकिताला खुपत होत. एकदा रात्री निकिता अचानक उठली तिला जोपच येत न्हवती. मग ती उठली आणि प्रियांका कडे पाहिलं तर प्रियांका जागेवर न्हवती ती washrrom मद्धे गेली असणार म्हणून निकिता बेड वर उठून बसली. २० मिनिटे झाली तरी पण का प्रियांका येत नाही म्हणून ती पाहायला गेली तर तिथे कोणीच न्हवत. मग कुठे गेली असेल हा विचार करतानाच तिची नजर त्या रूम मद्धे गेली जिथे ह्या दोघी ऐरवी जात नसत. 


तिने हळूच डोकावून पाहिलं त्या रूम मद्धे, सगळी कडे अंधार होता आणि कोणीतरी एका खुर्ची वर बसलं होत. कोण असेल? प्रियांका तर नाही ना त्या खोलीत ? अंधारात कोण काय करतेय ? दरवाजा तर बध होता मग त्या खोलीत १००% प्रियांकाचा असणार ह्याची खात्री झाली आणि ती आत शिरली आणि ती फक्त पाहतच राहिली... 


ते लाल लाल डोळे, केस सोडलेली, चेहरा विचित्र रागाने झालेला, मोठ्याने मोठ्याने हुंदकारा देत असणं हे सगळं विलक्षण होत. आता मात्र निकिता खूप भयभीत झाली तिने जास्त विचार न करता प्रियांका ला हाक मारली. प्रियांका लक्ष्य देत न्हवती ती माझ्या कडे बघत नाही म्हणून पुन्हा हाक मारली तर प्रियांका जोरात ओरडली निकिता तू झोप जा, जा तू झोप बेड वर. मला एकटीला राहूदे ह्या खोलीत जा आता. 


निकिताने लगेच दरवाजा बंद केला आणि तिच्या बेड वर जाऊन झोपली, झोपली कसली तिला तर रात्र भर झोप येत न्हवती आणि त्यात रात्र पण लवकर संपत न्हवती; कधी एकदा पहाट होईल ह्याची ती वाट बघत झोपून गेली. सकाळी उठली प्रियांका बाजूला झोपलेली पाहून तिला धीर आला पण काही करून मला हि रूम नको ह्या साठी ती कॉलेज च्या हेड ऑफिस ला आली तिने नवीन रूम मिळण्यासाठी फॉर्म भरला आणि रात्रीचा घडलेला पूर्ण प्रकार तिने त्या स्टॅफ ला सांघितला. त्यावर तिला एक अनपेक्षित उत्तर मिळालं त्या स्टाफ कडून कि ती ज्या रूम मद्धे राहत होती तिथे कोणीच न्हवत. 


मुळात प्रियांका नावाची कोणी मुलगीच न्हवती पूर्ण कॉलेज मद्धे आणि त्या रूम मद्धे फक्त एकच मुलगी राहते ती म्हणजे निकिता असच त्या स्टाफ आणि कॉलेजला माहित होत. मग प्रियांका कोण आणि त्या रूम मद्धे काय करत होती ह्या प्रश्नाने अजूनही निकिताला उत्तर मात्र मिळालं नाही. 


पण एवढं मात्र नक्की कि खरच त्या रूम मद्धे कोणीच राहत न्हवत निकिता शिवाय....


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror