होम स्टे
होम स्टे


पोलिसांनी नीता आणि आनंद आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले, आठ ही मुलं कुठे गेली होती? रिसॉर्टच्या बाहेर का पडली? त्यांनी काय खाल्लं प्यायला होतं? बिअर कुठून आणली होती? बाहेर पडताना त्यांनी कोणाला सांगितलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीता आणि आनंद द्यायची होती.
काही वनस्पतींच्या शोधार्थ, काही हर्बेरियम करण्यासाठी आणि काही कोकणातल्या दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेण्यासाठी बीएससी च्या वर्गाची मुरुड जंजिरा आणि कोकण परिसर इथे सहल निघाली.
कोकणामध्ये म्हणे पावसाळ्यात फार मजा असते म्हणून काही हौशी आणि धाडसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यार्थिनींनी प्राध्यापकांना पटवून सहलीसाठी राजी केले.
दोन बस भरून विद्यार्थी आपल्या चार प्राध्यापकांना घेऊन शुक्रवारी सकाळी पुण्याहून कोकणच्या दिशेने रवाना झाले. गाणी गप्पा गाणी गप्पा गाणी यांचा जणूकाही ऊत आला होता.काही मुले उगीचच डेअरडेव्हिल्सच्या पैजा लावत होती. काही जणांमध्ये ठरलं होतं कोकणचा अंधारामध्ये दूरवर जाऊन यायचं. तरुण मुलांचा रगेल पणा , त्यांना कोण अडवणार? काही आडदांड मुले मुद्दामच काही वात्रट पणाच्या पैजा लावत होते
निसर्गाचा आनंद घेत दोन्ही बसेस हळुवारपणे कोकणाच्या रस्त्यावरुन चालल्या होत्या चालल्या होत्या.
वनस्पती संकलन हे फक्त कागदावर लिहिण्यासाठी होतं बाकी मुला-मुलींना काही वेगळीच मजा करायची होती. त्यांचे ग्रुप्स आणि पार्टनर ठरलेले होते, मोकळ्याढाकळ्या वातावरणात आनंदाचे तरंग उठत होते. विभा विजय, जॉन शायना, मुस्तफा फराह, निता आनंद, स्मिता जय अशा जोड्या तर एकमेकांच्या सहवासात फारच धुंद झाल्या होत्या.
संध्याकाळच्या सुमारास बस मुरुड गावी पोचली आणि तिथल्या आकृती रिसॉर्टमध्ये सगळी मुले उतरली. रिसॉर्टमध्ये दोन मोठे हॉल आणि काही स्पेशल रूम्स होत्या, मुलांना एक हॉल मुलींना दुसरा आणि रूम्स प्राध्यापकांना अशी विभागणी झाली. दिवसभराची बडबड गाणी आणि गोंगाट त्यामुळे सगळे जण दमले होते त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर कॅम्पफायर न करता झोपायचं ठरलं.
आकृती रिसॉर्टच्या मॅनेजर त्यांना कल्पना दिली रिसॉर्टमध्ये कधी कधी दिवे जातात आणि म्हणून त्यांनी भरपूर मेणबत्त्या काडेपेट्या आणि बाथरूम मध्ये वापरण्यासाठी टॉर्च , असे सगळे सामान प्रत्येक हॉलमध्ये ठेवले.
दिवे जातात हे कळल्यानंतर अश्विनी अंजली रिया आणि सुनीता या थोड्या घाबरल्या, पण स्मिता, विभा शायना दिवे जाण्यातच फार रस होता. सहलीला येण्याचा त्यांचा उद्देश काही वेगळाच होता.
कोकणातल्या जुन्या वाड्यांमध्ये सध्या होम स्टे साठीखोल्या देण्याचं देण्याचा नवीन व्यवसाय सुरु झाला होता, आनंद मुस्तफा विजय यांनी येतानाच कुठे कुठे होमस्टे अवेलेबल आहे ते बघून ठेवलं होतं.
50 मुल आणि चाळीस मुली याच्यामधले 4-5 गायब झाल्या तर कोणाला काही कळणार नाही नव्हतं.
प्राध्यापकांच्या नकळत आणलेला बिअर आणि व्हिस्की चा बॉक्स मुलांनी आपल्या हॉलमध्ये नेला, मुली पण काही कमी नव्हत्या, त्यांच्याकडे पण व्यवस्थितरीत्या आणलेली बियर होती.
रात्रीचे जेवण पटापट उरकून सगळी मुले आपल्या आपल्या हॉलमध्ये आली, दिवे बंद करून एकच मेणबत्ती मध्ये पेटवली आणि मुलींना पण आपल्या हॉलमध्ये बोलवून सगळ्यांनी बिअरचा आस्वाद घेतला.
दिवे बंद असल्यामुळे प्राध्यापकांना वाटलं की मुलं झोपली.
रात्री अकराच्या सुमारास आनंद मुस्तफा विजय आणि जॉन यांनी आपल्या मैत्रिणींना टेक्स्ट केलं, बाहेर जाण्याचा पेहराव ठरला होता काळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट,
कोणाला नकळत आकृती रिसॉर्टच्या बाहेर पडल्या, समुद्रा वरती जाऊन त्यांनी परत एकदा बिअर चा आस्वाद घेतला, आणि मग पाहिलेल्या चंद्रकला होम च्या दिशेने चालायला सुरुवात केली.
काळोखी रात्र, चांदण्याचा प्रकाश, माडाची उंच झाडं, वाजणाऱ्या नारळाच्या झावळ्या, दूरवरून येणारी समुद्राची गाज, यामुळे वातावरण अगदी रोमँटिक झालं होतं.
चंद्रकला होम स्टे अशी पाटी पाहिल्यानंतर जॉनने सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधले वेधलं.केली, चंद्रकला बंगला डोंगराच्या टोकावर, जणूकाही समुद्रावर झुकलेला होता, मुख्य रस्त्यापासून जवळजवळ शंभर फुट चढून गेल्यावरच बंगल्याचे प्रवेशद्वार होतं. आठही जण बंगल्या पाशी पोहोचले.एखाद्या भयपट यामध्ये शोभेल असाच चंद्रकला बंगला होता.
बंगल्याच्या समोर सुरेख कारंजे होते, बाजूला गाड्यांचे गॅरेज होते त्यामध्ये जीप, एक जुनी फियाट, आणि अजून दोन गाड्या होत्या, त्याच्या शेजारी घोड्यांचे तबेले होते ज्यामध्ये काळे आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते. कोकण आणि घोडे? सगळ्यांना आश्चर्य वाटले. मुलांना वाटलं असेल कोणी स्मगलर, किंवा त्याचा बंगला. आनंदच्या मनात पाल चुकचुकली, झपाटलेला डोंगर आणि त्यावरचा बंगला तर नाही? पण त्यांनी आपली शंका दाबून टाकली.
सहा पायऱ्या चढून मुल वर गेली, बाहेर एक मोठी पितळी घंटा ज्याची दोरी खाली लोंबत होती ती जॉन वाजवली. . दोन तीन वेळेला घंटा वाजल्यानंतर वाड्याचे भलेमोठे जुने सागवानी दार करकरत उघडले, पाठीमागे उत्तम पोषाख केलेला एक म्हातारा उभा होता?
मुलांनी डोकावून बघितले म्हाताऱ्या च्या मागे एक मोठा हॉल दिव्यांच्या झगमगाटात चमकत होता. दरवाजातूनच हॉलमध्ये लावलेल्या, एका प्रचंड तसबिरी चे दर्शन झाले. भरघोस मिशा ठेवलेल्या एका पहलवान माणसाची तसबीर होती. म्हाताऱ्याने मुलांना बोलावले आणि त्यांच्या हातात रेट कार्ड दिले.
विजयने हाताचे चार बोट दाखवून चार खोल्या रात्री पुरत्या असं सांगितलं. म्हातारा हसला, त्यांनी पहिले बोट वर केलं , पैशाचा प्रश्नच नव्हता त्याच्यामुळे चौघांनी हात पुढे केला,
म्हाताऱ्याने परत इलेक्ट्रीकच्या दिव्याकडे बोट केले आणि कंदील याकडे पण बोट केले जसं तो विचारत होता की मुलांना यातील काय पाहिजे?
नाहीतरी मुलांना दिव्याची काहीच आवश्यकता नव्हती, त्यांची उतावीळ भलत्याच गोष्टीचे होती. आणि रोमांचक अनुभवासाठी त्यांना कंदील पण पुरेसे होते.
म्हातारा काहीच बोलत नव्हता, वाडा सगळ शांत होता, पण वरच्या मजल्यावरून काही संगीताचे आवाज येत होते, कोणीतरी हळुवार नादामध्ये नृत्य करत असल्यासारखे वाटत होते. चारी बाजूला नजर फिरवल्यावर भिंतीवर लावलेली हरणाची शिंगे, मोठ्या मिशा असलेले पहिले चित्र, तसेच काचेच्या मोठ्या कपाटात असणाऱ्या जुन्या तलवारी, जुन्या बंदुका, एक प्रकारचं गूढ वातावरण तयार करत होतं.
कोपऱ्यात ठेवलेले चार कंदील म्हाताऱ्याने प्रज्वलित केले, आपल्या जानवे लावलेल्या चार किल्ल्या काढल्या आणि वरच्या मजल्यावर ती बोट केले.,
4 जोडप्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि पहाटे सहाचा गजर लावून सगळी मंडळी उठायच्या आत रिसॉर्टवर परत जायचा निरोप एकमेकांना दिला आणि ते आपापल्या खोलीच्या दिशेने निघाले.
वरच्या मजल्यावरती आल्यावर त्यांना काही जोडपी एकमेकांच्या बाहुपाशात धुंद होऊन नृत्य करताना दिसली, फारच बाहेर रोमांचक वातावरण होतं. म्हातारा मुलांबरोबर पहिल्या मजल्यावर आला आणि त्यांनी खोल्यांच्या दिशेने बोट केले. हातातले बारीक केलेले कंदील घेऊन जशी मुले खोल्यांच्या दिशेने निघाली तसे अचानक बंगल्याचे दिवे गेले.
दिवे गेलेले होते त्यामुळे कंदिलाच्या धूसर प्रकाशात शायना .बाथरूम मध्ये शिरली.तोपर्यंत जॉनी खोलीची ची पाहणी केली. नळाखाली तिने दोन्ही हात धरले . विचित्र चिकट पाणी पडायला सुरुवात झाली . तोंडावरती पाण्याचा फटकारा मारला, दोन-तीन हबके मारून शायना बाहेर आली, गंमत म्हणजे बाथरूममध्ये टॉवेल्स नव्हता. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली आणि म्हातारा बाहेर पाण्याची बाटली आणि टॉवेल्स घेऊन उभा होता.
बाथरूम मध्ये जॉन गेला होता, त्यांनी पण तोंडावरती चिकट पाण्याचे हबके मारले आणि तो बाहेर आला.
त्याच्याकडे बघितल्यावरती जोराची किंकाळी फोडून शायना, खोलीच्या बाहेर पळाली. जॉन से तोंड रक्ताने माखले होते. त्याचा एक अलौकिक क्रियाकलाप झाला होता. जशी शायना बाहेर पळाली तसा जॉन ने आपला चेहरा आरशामध्ये बघितला, एखाद्या ड्रॅक्युला सारखं त्याचं तोंड दिसत होतं.
बाहेर पळाली शायना , तिला काही केल्या जिना सापडेना. टोकापाशी म्हातारा उभा होता, अचानक पडलेल्या प्रकाशामध्ये त्याचे डोळे एखाद्या हिंस्त्र जनावरासारखे सारखे चमकले.
हसण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा त्याच्या तोंडातून दोन पांढरे दात बाहेर पडले . हसून म्हाताऱ्याने खिडकीच्या बाहेर बोट दाखवले, बाहेर एक मुलगी दोराला लटकत होती, हात पाय झाडत जेव्हा ती मुलगी वळली तेव्हा किंकाळी फोडली, कारण ती मुलगी म्हणजे शायना, होती.
जशी शायना खोली बाहेर पळाली तसे खोलीचे दार धाडकन बंद झाले, जॉनला काही केल्या दार उघडता येईना. खोलीतलं कंदील पण बंद झाला, त्यामुळे त्याला ठेवलेला मोबाईल देखील सापडेना. शेवटी जॉन अंदाजाने खिडकीपाशी गेला आणि धडधड हात मारून त्यांनी खिडकीची काच फोडली, बघतो तर काय, तिथे फास घेऊन शायना लटकलेली होती.
जोरात किंकाळी फोडून जॉनने खिडकीतून खाली उडी मारली, त्याची उडी नेमकी रिकाम्या कारंजा मध्ये पडली.
मुस्तफा आणि फराह खोलीचे निरीक्षण केल्यावर आरामात पलंगावर बसले, मुस्तफा ने परत एकदा खोलीचं निरीक्षण केलं आणि तो परत पलंगावर येऊन बसला, तेवढ्यात त्यांनी ठेवलेला कंदील हळूहळू मोठा व्हायला लागला, कंदील एवढा मोठा झाला की त्याची वात मोठी होऊन त्यांच्या पलंगावरती येऊन पडली, फराह दरवाजाकडे धावली, तर दरवाजा उघडेना,पलंगावरील गादीला पूर्ण आग लागली, बाथरूम मधल्या बादलीमध्ये कसलेतरी तपकिरी रंगाचे पाणी होतं, जेव्हा पाणी पलंगावर फेकले तेव्हा त्याच्यातून बारीक बारीक उंदीर बाहेर पडले आणि ते सैरावैरा धावू लागले. मुस्तफा चांगला हट्टाकट्टा असल्यामुळे त्यानी लाथा मारून दार तोडले आणि फराहला घेऊन तो जिन्याकडे धावला. अंधारात धावत असल्यामुळे या दोघांना दिशा कळत नव्हत नव्हती, जिवाच्या आकांताने धावताना, अचानक फराह खाली कोसळली आणि तिच्याबरोबर मुस्तफा पण.
विभा जराशी घाबरली होती, विजयला म्हणाली की आपण परत जाऊ, तिला रडू यायला लागलं, विजयचा फार मूड ऑफ झाला, त्याने खोलीची खिडकी उघडली, समुद्रा वरती बोट तरंगत होती. समुद्राच्या गार वाऱ्याने त्याला ताजेतवाने वाटले त्यांनी विभाला जवळ बोलावले आणि तिला पण ती बोट दाखवली. दोघेजण खिडकीपाशी उभी असताना अचानक त्यांच्या मागचा दरवाजा उघडला, आणि समुद्र मधली बोट वेगाने त्यांच्या दिशेकडे येऊ लागले, पाण्यावर तरंगणारी बोट आता हवेमध्ये उडत होती, त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बसले होते, विभाने डोळे ताणून बघितले तर तिला तिचे प्रतिबिंब दिसले, विजय आणि विभा दोघे हादरून गेले, असल्या भयानक दृश्य त्यांनी अपेक्षितच केलं नव्हतं. बंगला जर भयानकच होता तो म्हातारा ही फार गूढ होता. त्यांच्या लक्षातही आले नव्हते किती बंगल्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं .भीतीने दोघेजण गारठून गेले त्यांचे पाय जड झाले, आता ती बोट त्यांच्या खिडकीपाशी आली होती आणि त्यात बसलेल्या म्हाताऱ्याने त्या दोघांनाही ओढून बोटीमध्ये घेतले. भीतीने गारठून विभा आणि विजय बेशुद्ध पडले.
नीता आणि आनंदाची वेगळीच तर्हा झाली. ते दोघे जण चालतच राहिले तरीपण त्यांची रूम त्यांना मिळाली नाही, अंधाऱ्या जिन्यातून, पॅसेजमधून दोघेजण चालतच राहिले, त्यांना समजतही नव्हतं कि ती दोघे कुठे चालली आहेत. मधील त्यांना जंगल पण लागलं, मध्ये समुद्राचा आवाज, मध्येच कोल्हे कोई, एका वेगळ्याच भारलेल्या वातावरणात हे दोघेजण चालत राहिले, त्या दोघांनीही एकमेकांचे हात धरले होते म्हणून हरवले नाहीत.
रात्र संपली, आकृती रिसॉर्ट मध्ये सगळेजण नाश्त्यासाठी जमले, आठ मुलं गायब होती हे कोणाच्याच लक्षात आलं नाही, त्यांच्या मित्र मंडळाने देखील त्यांचे गुपित जपले होते.
नाष्टा संपत आला तसे काही पोलीस रिसॉर्टमध्ये आले आणि प्राध्यापकांची भेटले, त्यांनी काही फोटो बरोबर आणले होते, तेवढ्यात दुरून नीता आणि आनंद येताना दिसले, दोघांची पार बोबडी वळली होती. बाकीचे सहा जणांचा काहीच पत्ता नव्हता. प्राध्यापकांनी सगळ्या मुलांना हॉलमध्ये बोलावले आणि त्यांची हजेरी घेतली, त्यांच्या पण लक्षात आले की सहा मुले कमी आहेत, पोलिसांनी दाखवलेले फोटो सहा मुलांचे होते, फोटो काढण्याचे कारण म्हणजे त्यांचे मृतदेह डोंगर कड्याखाली समुद्रकिनारी मिळाले होते.
सहलीचे पुढचा कार्यक्रम रद्द करून प्राध्यापकांनी सगळ्या मुलांना बसमध्ये बसवले, मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी त्यांच्या पालकांना कळवले.
पोलिसांनी नीता आणि आनंद आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले, आठ ही मुलं कुठे गेली होती? केव्हा मुले रिसॉर्टच्या बाहेर पडली ?त्यांनी काय खाल्लं प्यायला होतं? बिअर कुठून आणली होती? बाहेर पडताना त्यांनी कोणाला सांगितलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीता आणि आनंद द्यायची होती.
जॉन ने पाहिलेला चंद्रकला बंगला अस्तित्वातच नव्हता, पोलिसांनी खोदून खोदून विचारल्यावर नीता आणि आनंदने चंद्रकला बंगल्याचा रस्ता त्यांना दाखवला, नीता आणि आनंद जबरदस्त शॉक मध्ये होते, जर त्यांनी खोलीचे दार उघडलं असतं तर त्यांची पण अवस्था बाकीच्या सहा मुलांसारखी झाली असत असती,
आनंदने दाखवलेल्या रस्त्यावरती पोलीस पार्टी शोधासाठी गेली, तिथे न कुठलं कंपाऊंड होतं ना वाडा होता,न बंगला गॅरेज डोंगराच्या टोकावरती फक्त झाडं होती कुठलाही बंगला कुठलाही म्हातारा तिथे नव्हता. नको ते धाडस सहा मुलांच्या जिवावर बेतले होते, नीता आणि आनंदला तर वेड लागायची पाळी आली होती.