होळी
होळी
लेख..."होळी हा सण हसण्याचा व उत्साहाचा तनामनाला स्वास्थवर्धक अहेर आहे."
खेळीमेळीच्या वातावरणात होळी ही आनंदाने साजरी करावी.कारण हिंदू संस्कृतीत होळी सणाला खास महत्व आहे.पारंपारीक पद्धतीने केल्यास आपण स्वास्थ कमवू शकतोय.होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिलावटी रंगामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना किंवा त्वचेला हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायनीक रंग वापरू नये. सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. आपण वेळेअभावी रेडीमेट रंग वापरतो.पण पुर्विची थोर मंडळी घरीच रंग तयार करायचे.केशरी रंग पलाश फुलापासून तयार व्हायचा.अनेक रंग घरात किंवा बागेतिल वनस्पतीपासून तयार करायचे.
होळी सण भारतातच नाही तर अनेक ठीकानी साजरा केला जातो.होळी सण फाल्गून महिण्याच्या पंचमीला येतो.देश विदेशात हिंदू लोक असल्यामुळे होळी सण साजरा होतोय.मित्र मैत्रिनी एका ठीकानी जमुन खेळीमेळीच्या वतावरनात साजरा केला जात असतो. होळी च्या दिवशी घरी पुरणपोळी व इतर पक्वान्न केली जातात. महाराष्ट्रात रंग पंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि "बुरा न मानो होली है" असे म्हणतात.होळी सण वृंदावणात मोठ्या प्रमानात साजरा करतात.आजही राधाकृष्णाच्या रासलीलेचे भरभरून वर्णन करतांना मग्न होवून जातात. व नटखट कान्हाला गवळनी तेवढच प्रेम करताना दिसतात.त्या प्रेमभावनेत त्यांना परमसुख मिळत असते .अनेक कवन गीते रंगपंचमीकरीता रचले जातात.ब्रजची होळी विशेषच असते.त्यादिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना रंग लावतात.थट्टा मस्करी करतात. ननंद,भावजय, दिर,भावजय,जिजा,साळी एकमेकांची थट्टा मस्करी करतात.
बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते, आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने हा सण साजरा करतात.मध्यप्रदेश राणी अहिल्याबाई होळकर यांची राजवट इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जातेय.इथे ह
ोळीची एक वेगळीच शान बघायला मिळते.होळीच्या दिवशी ठिकठीकानी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून रंगीत पाण्याने होळी खेळली जात असते. तसेच नाचून खेळून होळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात असतो.
१५ दिवस अगोदर पासूनच होळीची तयारी करतात.
काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळी चा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांना गळा भेट देवून एकमेकाची माफी मागून वाजत गाजत (फगवा) मिरवनूक काढली जाते.
पुर्वी हा उत्सव आर्यामध्ये प्रचलित होता.एका मुस्लीम पर्यटकाने लिहिलेल्या आपल्या ग्रंथात होळीचे महत्व वर्णन केले आहे.तसेच मुस्लीम राजवटीतही होळी हा सण साजरा करीत असल्याचे पुरावे मिळतात.बादशाह अकबर आपली राणी जोधाबाई सोबत नेहमी होळी खेळत होता.तसेच जहाँगीर बादशाह आपल्या नुरजहाँसोबत होळी खेळल्याचा उल्लेख आहे.अलवर येथील एका संग्रहालयातील चित्रात शहाजहान बादशाहाने या सणाला ईद ए गुलाबी आणि धुलीवंदनला (रंगाचा पाऊस)म्हटलेले दाखवले आहे.मोठ्या आनंदात आणि उत्साहात रंग लावायला संपुर्ण मंत्रीमंडळ जायचे.यावरुन हे दिसते की होळी हा सर्व समाजात रूढ असणारा सण आहे.
होळीेका दहन करणे याचा अर्थ दृष्ट प्रवृत्तीचे दहन करणे होय.आपल्या मनातील राग,लोभ,मद,मोह द्वेष, मत्सराचे दहन करुन सात्विक आचार विचार मिळविणे होय.चिखलाने,शेणा मातीने,होळी खेळू नये.कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावूही नये. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.कुठेकुठे यादिवशी गोटमार भरविल्या जाते. दोन गृप एकमेकावर दगडफेक करतात. पण कुणालाही इजा किंवा जखम होत नाही .गुद्दलपेंडी ही अशीच भरविल्या जाते.जाडा दोरखंड ज्याला आपण रस्साखेच स्पर्धा म्हणू शकतो.साहित्यीकांचीही मंदिळाई असते कवी संम्मेलन कुठे महामूर्ख संम्मेलन भरतात.कविता ऐकून हसून लोटपोट होत असतोय.
"होळी हा सण हसण्याचा व आनंदाचा उत्साहाचा तनामनाला स्वास्थवर्धक अहेर आहे. आणि तो असाच साजरा करून एकता व समानतेला काही अर्थ मदत होईल".