Ujwala Rahane

Inspirational Others

3.5  

Ujwala Rahane

Inspirational Others

हम होंगे कामयाब

हम होंगे कामयाब

2 mins
3.1K


बाहेर कोरोनामुळे सुन्न वातावरण. मीही सुन्न खिडकीशी उभी राहून निर्जीव रस्त्याला बोलके करण्याचा प्रयत्न करत होते.


इतक्यात डॉक्टरचा सिंबाॅल असलेली गाडी समोरून गेली. परत, परत मी वळून पाहिले. गाडीतील व्यक्ती ओळखीची वाटली.


बापरे हे तर आपलेच डॉक्टर!

नक्की डाॅक्टर कोठे? कशासाठी? मनात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.


या प्रश्नांच्या भुंग्याला शांत करण्यासाठी मी लगेचच त्यांच्या क्लिनिकला फोन केला.


नेहमीप्रमाणे कंपाऊंडरने फोन घेऊन मला सागितले, हो डॉक्टर येणार आहेत, तुम्ही येऊ शकता. पण येताना कोरोनासाठी असलेल्या नियमांचे पालन नक्की करा हे सांगायला ती विसरली नाही.


यदाकदाचित मी पेशंट आहे हे तिने गृहीत धरले असावे.


मी थोड्या उशीराच क्लिनिकला पोहोचले, कारण मला डॉक्टरला जाणून घ्यायचे होते.


अगदी सगळे नियम, सोशल डिस्टंसिंग पाळून पेशंटला माफक औषधे देऊन, धीराचा डोस डॉक्टर देत होते. चेहरा हसतमुख सहचारीणीही तशीच पतीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन हातभार लावणारी.


क्षणभर मी स्तब्ध झाले आणि मनोमन देवाला हात जोडले.


खरंच देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून की काय असे देवदूत तुमच्या-आमच्यासाठी तो पृथ्वीवर पाठवतो.


कोरोनासारखी भंयकर परिस्थिती असतानादेखील आपल्या कार्याला वाहून घेतलेले हे दांपत्य आपल्या पेशाची शपथ विसरले नाहीत.


पेशंट हेच आपले दैवत मानून माफक दरात औषधोपचार करतात. तेही आपल्या जिवाची पर्वा न करता!


डॉक्टर सलाम तुमच्या कार्याला! म्हणून आपोआपच माझ्या मुखातून गौरवोद्गार बाहेर पडले..


यावरही डॉक्टरने छानशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या प्रयत्नांची शर्थ सर्वांच्या भल्यासाठीच झटणारी पोलीस संघटना या सर्वांना जनतेच्या सहकार्याची साध मिळाली ना तर नक्कीच 'हम होंगे कामयाब..!'


खरंच सर्वांच्यात कष्टाला समान दर्जा देणाऱ्या दिव्य मुर्तीमंत दांपत्याला मानाचा मुजरा!.


वरील लेख आमचे फॅमिली डॉ. हरीश पांचाल व डॉ. सौ. जयश्री पांचाल याच्या दैदीप्यमान कार्याला समर्पित!


आजही कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत आपल्या प्राणाची बाजी लावून अहोरात्र पेशंटची सेवा करत आहेत. विक्रोळीत (मुंबई) कोरोना येण्यास मज्जाव करत आहेत. कृपया विक्रोळी (मुंबई) करांनो डॉक्टरांना साथ द्यावी ही नम्र विनंती!


असे बरेच डॉक्टर्स आहेत आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, अशा व आपल्या भल्यासाठी झटणारी आपली काळजी वाहक पोलीस संघटना, सर्व हॉस्पिटल स्टाफ या सर्वांना मनापासून धन्यवाद. फक्त लोकहो आपल्याला सहकार्य करायचे आहे, कृपया सहकार्य करा. यश द्या ही विनंती!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational