Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

"हात जोडून सांगते सुनबाईं"

"हात जोडून सांगते सुनबाईं"

6 mins
182


 शेखर चहा घेतलास कारे? उषाताईने पांघरूणातून तोंड बाहेर काढून कातरलेल्या आवाजात शेखरला म्हणजेच मुलाला विचारत होत्या. 


 हो आई,मी आज लवकरच निघतोय, आॉफीसमध्येच घेईल चहा आता! आईची नजर चुकवत शेखरने उत्तर दिले. 

  इकडे ममताने म्हणजेच सुनबाईंने कुस बदलत स्वतःहाच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली. ती जागीच होती ती पण झोपेचे सोंग मात्र घेतले होते.


   उषाताईंना हे सहन होत नव्हते आणि बोलताही येत नव्हते म्हणूच घेतलेला निर्णयाशी त्याची धरसोड चालू होती. बोलणार तरी कोणाला त्या? स्वतःहाच पायावर धोंडा मारून घेतला होता.आता जखम झाली म्हणून रडण्यात काय मतलब असणार. 


 शेखर अंघोळीला गेल्याची चाहूल लागताच पांघरूण बाजूला करून इच्छा नसतानाही उषाताई उठल्या. बाजूलाच ठेवलेल्या काठीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेल्या. चहाचे आधण ठेऊन कांदा चिरुन बाजूच्या डब्यातील पोहे भिजवून फोडणीला टाकले.घरात पोह्याच्या वास दरवळत होता. 


 शेखरने बाथरूम मधून आवाज दिला आई अग राहू दे ग झोप थोडावेळ कशाला करतेस? खाईल मी काहीतरी बाहेरच. तर बाहेरच्या रूममधून आवाज आला आई पोहे करताय का? थोडे जास्तीचेच करा मी पण खाईल बरका चहा बरोबर. 


  उषाताईचा स्वर कातर झाला नकळत डोळ्यात पाणी आले. मनावर दु:खद साया पसरवून गेले.त्या विचारात गुंतल्या. नक्की सासू कोण आणि सून कोण? 


  आजवर उषाताईने खुप सोसले होते.म्हणूनच त्यांनी ठरवलं आपल्याला सुन आली कि तिला फुलाप्रमाणे जपायचं.आपण जे भोगले ते तिच्या वाट्याला नाही येऊ द्यायचे. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले सुनबाई जोरात निघाल्या.सासूबाईंच्या मऊ स्वभावाचा त्यांनी चांगलाच फायदा उचलला. चार दिवस गोडीगुलाबीने राहिल्या आणि रंग दाखवायला लागल्या. 


    नातेवाईकांत हसू नको म्हणुन नावाप्रमाणेच शांत असलेल्या उषाताई म्हणजेच सासुबाईं सुनबाईचे म्हणजेच ममताचे सगळे थेअरं सहन करत.खुप हौसमौज करत सुनेची. त्याची तिला किंमत नव्हती. तिने नवऱ्याला म्हणजेच शेखरला गुंडाळूनच ठेवले होते. 


    एवढेच काय तर हौसमौजेने उषाताईने केलेली दागिने सुनबाईंने म्हणजेच ममताने आईकडे ठेवले होते. कारण काय तर घर लहान आहे आणि चाळ सिस्टीम चोरी झाली तर? 


   घर लहान आहे प्रायव्हसी नाही मिळत म्हणून रात्री ममता स्वयंपाकघराचे बेडरूम बनवत आणि सकाळी रात्री चांगली झोप होत नाही म्हणून बाहेर येऊन कॉटवर खुशाल दहा दहा वाजेपर्यंत झोपत. हिची बाहेरच्या रूममध्ये रात्र सुरू व्हायची तर उषाताईचा स्वयंपाकघरात दिवस सुरू व्हायचा.


  एकदा दोनदा गोडीगुलाबीने उषाताईंनी तिला समजावून सांगितले, अग नीता काही काही निमित्ताने आजूबाजूचे लोक येतात घरी, तु अशी झोपलेली चांगले दिसतं का? लवकर उठत जा सकाळी संजूला डबा करून दे. नंतरच मी करत जाईल. संजूला पण बरं वाटेल ग! 


  तिचे त्यावर उत्तर ठरलेलं असे, संजूला तुमच्याच हातचे आवडतं मग मी काय करू तुम्हीच करा आणि किती दिवस तुम्ही करणार नंतर तर मलाच करायचे आहे ना! असे उर्मटपणे नीता उत्तर द्यायची.यावर उषाताई तरी काय बोलणार,त्या बिचार्‍या गप्प बसत.

 कारण यावर काही बोलायला जावे तर ती उगाच आवाज वाढवायची. म्हणून मग आजुबाजुला तमाशा नको म्हणून त्या शांत बसायचे. यामुळे तर नीताचे चांगलेच फावायचे. 


 ती मनाला येईल तेंव्हा ती माहेरी जात.शाॅपींग करत यासाठी तिला सासुबाईंच्या परवानगीची तिला गरज भासत नसत.पण ती जेंव्हा केंव्हा माहेरी जात तेंव्हा उषाताईला काय संजूला देखील हायसे वाटायचे शेवटी पदरी पडले आणि पवित्र झाले अशी गत होती. 


 आज उषाताईचे मन विषण्ण झाले. आपसूकच त्या भुतकाळातील प्रसंगाची वर्तमानकाळाशी सांगड घालू लागल्या. आपण काय होतो आणि ही कशी आहे. 


  लग्न होऊन उषाताई सासरी आल्या त्याच मुळी घरात कामवाली बाई म्हणूनच.घरात येताच उषाताईंना सासूबाईंच्या सुचना चालू झाल्या होत्या.पाया कसे पडावे ?येथूनच धडे सुरू झाले.लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या पध्दतीने स्वयंपाक करायला सांगून सासूबाईं किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडल्या.उषाताईंना काहीच माहिती नव्हते.जमेल तसा त्यांनी स्वयंपाक केला आणि सासूबाईंच्या पाकशास्त्रात पुर्णत: उषाताई नापास झाल्या.


  वरचेवर असेच प्रसंग घडत आणि कित्येक प्रसंगात उषाताईंना अपमानित केले जायचे. आणि त्यांच्या माहेरचा उध्दार करायची एकही संधी उषाताईच्या सासूबाईं सोडत नसत. एकंदरीत अपमान उषाताईच्या पाचवीलाच पुजलेला होता.तक्रार तरी त्या कोणाकडे करणार?आईवडील नव्हते.आश्रितासारखे जिवन, काका काकीच्या हाताखाली जगलेल्या उषाताईला चार गोड शब्द कधीच कानी पडले नाहीत. 


 बिजवराचे स्थळ आले.पैसा खर्च न करताच, उषाताईचे लग्न झाले. देवाब्राम्हणाच्या साक्षीने झाले पण तेही देवळात.

  पहिल्या बायकोचे दोन मुले लहानच चार वर्षांची मीरा आणि सहा वर्षांचा संजू, त्यांच्या समवेत उषाताईंचा संसार सुरू झाला.


 आईविना लेकरं म्हणून उषाताईंनी त्यांना जिव लावला.कारण याच आगीत तर त्यापण होरपळून निघाल्या होत्या.

  सतत कमीपणा घेत.ह्या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून स्वत:हा मातृसुखापासून वंचित राहिल्या. आणि मुलांचे पालनपोषण केले.


  कालानत्समय् सासूबाईं निवर्तल्या. त्यांच्या अजारपणात पण उषाताईंनी सासुबाईंची खुप सेवा केली.पण फक्त सासूरवासा व्यतिरिक्त उषाताईला काहीच मिळाले नाही जो काही मुद्देमाल होता तो आधीच नव्हते सासूबाईंनी आधिच मुलीला देवून टाकले होते. शेवटीही उषाताई लंकेची पार्वतीच राहिल्या. नवऱ्याला म्हणजेच सुधाकररावांना सगळे दिसायचं. 


 पण तोही आईच्या शब्दाच्या बाहेर नव्हता.आईसमोर काहीही बोलायची त्याची हिंमत नव्हती.आलेला पगार त्याचा आईकडे सुपूर्द व्हायचा कारण आईची तशी सक्त ताकीदच होती.


  आई म्हणायची सुधाकर हे बघ, हि सगळी माहेरची भरती करेल बर, कारण हिच्या माहेरी आहे अठराविश्वे दारिद्र्य. उषाताईच्या मनाला असे बोल लागायचे. आतल्या आत त्या रडायच्या, तेंव्हा चिमुकला हा संजू आपल्या इवल्याशा हाताने आईचे डोळे पुसायचा.कारण दोघांनाही तेवढेच प्रेम उषाताई देत होत्या.


  मुले मोठी झाली.सासुबाईं गेल्यावर उषाताई आणि सुधाकररावात चांगले बॉंडींग झाले. आणि कुठे सुखाचा संसार सुरू झाला. मुलांचे शिक्षण कोडकौतुक यात कोठेही उषाताई नी कमतरता ठेवली नाही. मीराचे लग्न योग्य स्थळ येताच व्यवस्थित करून दिले.

 दोन्हींही मुलांनी आईंच्या उपकाराची जाणिव ठेवली.त्यांनीही आईच्या प्रेमावर कधीच अविश्वास दाखवला नाही.सुधाकररावांना पण बायकोच्या प्रेमाची कदर होतीच.


  दिवसेंदिवस उषाताईंचा आयुष्यात सुखाचे दिवस येऊ लागले.जावई पण चांगला मिळाला. नीताला सासर चांगले मिळाले उषाताईंनी केलेल्या संस्कारामुळे नीताने पण सासरी नाव कमावले. 


  संजूचे शिक्षण पुर्ण झाले.चांगला पदवीधर झाला. मग उषाताईं आणि सुधाकरराव संजूला लग्नासाठी पाठी लागले. संजू पण तसाच सुसंस्कारी, आई वडीलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता.त्याला जवळच्या नात्यातली मुलगी सांगून आली वरवर चौकशी करून उषाताईंनी नीताला सुन करून घेतली.


 उषाताईला आता सासू बनायचे होते.पण सासुपण त्यांच्या रक्तातच नव्हते. फक्त प्रेमाची भाषा त्यांना समजायची. तुझं,माझं कधीच केल नाही. म्हणून तर त्यांनी सावत्र मुलांना सख्ख केले.आणि आपली कुस उजवू दिली नव्हती.किती हा त्याग याची कल्पना मुलांना आणि नवऱ्याला होती.जाणिव होती. 


  पण येणाऱ्या सुनेनी त्यांच्या स्वभावाची पोथी ओळखली. तसं माहेरहून येताना आईकडून शिकवणच घेऊन आली. ती तुझी सख्खी सासू नाही. हे आईने तिच्या मनात पुर्ण पणे बिंबवले होते.नव्याचे नऊ दिवस संपले आणि नीताने आपले रंग दाखवायला सुरू केले.


   ममता उषाताईच्या अगदी राहणीमानापासून ते स्वयंपाकापर्यंत ती काहितरी चूक शोधायची.उषाताई सहन करायच्या,कारण समाज काय म्हणेल याला त्या भित होत्या.लोक सावत्र सून आहे असे बोल लावतील असे त्याना वाटायचे.म्हणूनच शब्दांला शब्द त्या वाढवत नसतं.


 ममता काही अपमानास्पद बोलली तरी त्या या कानाचे त्या कानालाही कळू देत नव्हत्या.त्यामुळेच सुधाकरराव, शेखर आणि मुलगी मीरा काही कळायचेच नाही.


   याचाच नीता फायदा उचलत मैत्रीणीशी बोलताना मला किती सासुरवास आहे हि माझी सावत्र सासू आहे.मी किती चांगली याचे गुणगाण गात. मैत्रीणी किंवा नातेवाईक घरी आल्यावर त्यांच्या समोर मानभावी पणा करत आणि मीच घरातले सगळे काम करते हे दाखवत.आणि सगळे श्रेय स्वतःहाकडे घेत. 


  उषाताईच्या सहनशक्तीचा कधी कधी अंत होत. पण घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणून त्या सहन करत.सुधाकररावांनी खुपदा विषय काढला. उषा आपण वेगळे राहू,आता तरी स्वतःहासाठी जग.मी कायम तुझ्यावर अन्यायच करत आलो आहे.


  पण उषाताईला वेगळे राहणे रूचले नाही. परत लोक काय म्हणतील? म्हातारचळ लागले वाटते. शेवटी एके दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन सुधाकररावांनी जगाचा निरोप घेतला आणि उषाताई एकट्या पडल्या.त्यानंतर मुलगी मीरा मागे लागली आई माझ्याकडे चल राह्यला. पण जावयाच्या घरी राह्यला जाणे उषाताईंना रूचले नाही. 


 त्यांनी संजू बरोबर राहणे मान्य केले.नीताला आयती मोलकरीण मिळाली.पण आपलेच दात आपलेच ओठ तक्रार कोणाकडे करणार. 


  खरच कधी कधी एखाद्याचे आयुष्य हे फक्त सुखदुःखाच्या लपंडावाने भरलेले असते. चार दिवस दु:खाचे गेले कि,सुखाचे काही दिवस येणार याची कल्पना असते. पण त्याच आशेवर तो जगत असतो.पण समजा तेच सुख त्याच्या कधी दारी आले नाही तर,त्याची काय अवस्था होते.तो कोलमडून जातो.तशीच काही अंशी उषाताईची अवस्था झाली होती. 


 त्या सुधाकररावांच्या अकाली जाण्याचा दु:खाने कोलमडून गेल्या होत्या.त्याच दु:खाला छातीशी कवटाळून,शेखर सहवासात सुखाची सावली शोधत होत्या. गैर काहीच नव्हते. पण याचाच फायदा ममता उचलत.पण जाऊ दे, शेखर तर काही बोलत नाही तो तर आपलाच आहे म्हणून सहन उषाताई सहन करत होत्या. घरातील पडेल ते काम नाही तर सगळेच घरचे काम त्या करत.


  आजूबाजूचे शेजारी म्हणत उषाताई स्वतःहासाठी जगा किती दिवस हे जिणं जगणार? खुपदा आपण सासुरवास बघतो आणि अनुभवतो पण तुमच्याकडे तुम्हीतर सासूरवास पण भोगला आणि आता हा सुनवास का भोगत अहात? लोक चुकीचे बोलत नव्हते प्रत्यक्ष दिसत होते तेच तर बोलत होते.


  उषाताईने खुप विचार केला आणि ठरवले,कदाचित आपली लुडबुड ममताला नको असेल,आता आपणच कोणावरही भार न होता वृध्दाश्रमाचा मार्ग स्विकारायला काय हरकत आहे? पाहूया प्रयत्न करून.


 फक्त मोहमाया पासून मन अलिप्त झाले पाहिजे म्हणजे सगळे सहज शक्य आहे. 


  आजचा हा प्रयत्न त्याच्यासाठीच तर होता.पण मुलगा न चहा घेता ऑफिसला निघत असल्याचे नजरेतून त्याच्या सुटले नाहीत.


  नकळत त्यांची पाऊले स्वयंपाकघराकडे वळली. अंगावरच्या चादरी बरोबर मनातलं विचार पण त्यांनी घडी घालून ठेवले.हे सहज शक्य नाही असे त्यांना वाटले बिछाना झटकून उषाताईंनी रोजच्या कामाला सुरुवात केली. ममता मात्र साफ केलेल्या बिछान्यावर जाऊन गाढ झोपून गेली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational