गुरू शिष्य परंपरा
गुरू शिष्य परंपरा
गुरू शिष्य परंपरा
प्राचीन व आधुनिक
प्राचीन काळापासून भारत देशात गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे.सगळ्या विश्वात फक्त भारत देशात च गुरू शिष्य परंपरा आहे. पूर्वी मुलगा पाच वर्षांचा झाला की त्याच्या वर उपनयन संस्कार करून जानवे घालत असत.त्यानंतर मुलाला गुरुगृही जाऊन तेथेच वेदशास्त्राचा अध्ययन करावे लागत असे.
भारतीय प्राचीन संस्कृती मध्ये देवदेवतांना जितके महत्त्व दिले आहे त्यापेक्षा अधिक गुरुला पूज्य स्थानी मानण्यात आले आहे. " गुरू विण कोण दाखविल वाट , गुरु विण नाही दुजा आधार "
हे गुरू वचन आपल्या ला खूप काही शिकवून जाते. पूर्वीची गुरू कुल पध्दत होती . गुरू च्या घरी जाऊन शिक्षण पूर्ण होईपर्यंत तेथेच राहावे लागत असत. तेथे सर्व शिष्यांना समान वागणूक दिली जात असे. कोणाच्या ही बाबतीत भेदभाव नसायचा. गुरू अध्यापनाचे काम करत तर शिष्य ज्ञान संपादन करून कृतीत आणणे, ज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे हे काम करत असत. स्वत:चे काम स्वत:करणे म्हणजे च स्वावलंबना चे धडे दिले जात असत. लहान वयात शिष्याला स्वावलंबनाचे धडे मिळाल्याने पुढील काळात ते शिष्य यशस्वी व आदर्श बनत असत. गुरू आपले सर्व ज्ञान शिष्यांना देत असत .त्यांचा हेतू हाच असायचा की आपला शिष्य शिक्षा ग्रहण करून एक चांगला आदर्श , स्वावलंबी शिष्य बनावा. या ज्ञानरूपी अंधारातून बाहेर पडून गुरू पेक्षा विद्वान शिष्याने बनावे असा शुध्द हेतू गुरू चा असायचा. गुरू शिष्याचे नात वडिल मुला सारखे असायचे. शिष्य ही आपले सर्वस्व गुरूं च्या चरणी अर्पण करत असे. गुरू च्य आदेशाचे पालन करणे.हे शिष्याचे पहिले कर्तव्य मानले जात असे. गुरू शिवाय उन्नती होत नाही असा अटल विश्वास शिष्याला गुरुप्रति होता. गुरू गृही शिक्षा पूर्ण झाल्यावर गुरू मागतील ती गुरू दक्षिणा शिष्याला द्यावी लागे . याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकलव्य " एकलव्य याने गुरू दक्षिणा म्हणून हाताचा अंगठा कापून गुरू ला दिला होता. इतकी नितांत श्रद्धा शिष्याची गुरुवर होती म्हणून च म्हणतात.
गुरुर् ब्रम्हा , गुरुर् विष्णू
गुरूर् देवो महेश्वर:
गुरूसाक्षात परब्रम्ह
तस्मैयी श्री गुरवें नमः
आपल्या मधील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देण्याचे काम गुरूकडून केले जायचे.
कालांतराने या गुरू शिष्य परंपरा मध्ये बदल होत गेला. आजकाल तर शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे . आधुनिक युगात आजची शिक्षणपद्धती धोक्याची घंटा देत असल्याने पूर्वीची गुरू कुल पध्दत चांगली होती असे वाटते. आजकाल शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे ही गुरु विषयी विद्यार्थ्यां मध्ये आदराची भावना कमी झाल्यासारखी वाटते. शिक्षकांना ही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक प्राप्ती कमी व कामाचा बोजा जास्त .अनेक वाईट गोष्टी मुळे शिक्षकाची परवड होत आहे. आर्थिक अडचणी मुळे शिक्षकांना शिकवण्या घ्याव्या लागतात.जेवढा शिक्षक हुशार तेवढी त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे ही शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांचा आदर कमी झाला असे वाटते. शिक्षकदिनाच्या दिवशी एखादे फूल दिले की शिक्षक दिन साजरा झाला अस विद्यार्थ्यांना वाटते. शिक्षकांना आज एखाद्या विद्यार्थ्याची चूक झाली तरी रागावण्याचा ही अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे मुलांना शिक्षकांचा धाक वाटत नाही. याला जबाबदार कोण ? तर माझ्या मते आजची परिस्थिती आहे. काळानुरूप सर्व बदल झाले आहेत. पण असे असले तरी ही शिक्षक हा गुरुच असतो. ज्या घरामध्ये आई-वडिलांचा आदर , सन्मान केला जातो त्या घरातील मुल आज ही शिक्षकांना गुरू समान च मानतात. गुरू शिवाय ज्ञान नाही हे त्रिवार सत्य आहे. त्या मुळे सर्वांनी गुरुंचा आदर करून सन्मान करावा असे प्रामाणिकपणे वाटते.
