गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ,
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ,
गुरुविण कोण दाखविल वाट,आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट.."!! गुरुपौर्णिमा हा भगवान व्यासांचा जन्म दिवस असतो. आषाढ़ महिन्यात पौर्णिमेला हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. भविष्या मध्ये वेदांचा अभ्यास कमी कमी होत जाणार हे व्यासा ना समजले होते, म्हणून त्यांनी वेद सोप्या भाषेत सामान्य लोकां पुढे आणले. काळा नुसार आपल्याला शिकवनारया शिक्षकांना,आपले दैवत असणाऱ्यांना आपण गुरु मानतो. गुरु चा दर्जा हा देवा समानच मानला गेला आहे. आपल्या संस्कृतीत तर गुरु चे अनन्य साधारण महत्व आहे. मूल जन्माला येते,तेव्हा पासून च ते वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागते,त्याला प्रत्येक गोष्टी चे ज्ञान देणारी त्याची गुरु म्हणजे "आई" होय. प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरु त्याची आई असते. ती त्याचे दैवत ही असते. वाट दाखवनारी,अंधारातून प्रकाशा कड़े नेणारी, ज्ञान देणारी,सोबत करणारी ती असते गुरु माऊली "आई".
मग त्यानंतर आपल्या भोवती असणारा आपला निसर्ग हा ही आपला गुरुच आहे. त्याच्या परीने तो ही आपल्याला काही शिकवत असतो. आयुष्यात येणारे काही प्रसंग,बरेवाईट अनुभव हे ही आपले गुरुच असतात. त्यांच्या कडून ही आपण बरेच काहि शिकत राहतो. गुरु चे मार्गदर्शन आपल्याला पदोपदी हव असत,योग्य मार्गावर चालायला,आपली बौद्धिक,धार्मिक वाटचाल घडवायला गुरूंचे उपदेश,त्यांचे आशीर्वाद महत्वाचा ठरतो. भरकटलेल्या मनाला योग्य दिशेने नेणारा गुरु च असतो. युगानूयुगे ही गुरु शिष्या ची परंपरा सुरुच आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळात देखिल इतका मोठा योगी चांगदेव पण त्यानी लहानग्या मुक्ताई ला गुरु मानले होते. इथे वयाचा संदर्भ जोड़ताच येत नाही. ज्याच्या कड़े जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे ज्ञान असेल तो गुरु असतो. म्हणूनच तर श्री गुरुदेव दत्ताना विविध प्रकारचे चोवीस गुरु होते.
पूर्वी गुरुकुल पद्धति अस्तित्वात होत्या,पुढे काळानुसार शाळा पद्धत सुरु झाल
ी. "गुरु" चा गुरूजी असे नामाकरण ही झाले. हे गुरूजी कधी छड़ी देवून तर कधी गोड़ बोलून विद्यार्थ्याला विद्या देतच आले आहेत. गुरु कड़े पाहान्याचा दृष्टिकोण पूर्वी पासून सन्माना चा,आदराचाच आहे. आता यात थोड़ा बदल होत गेला,गुरूजी चे रूपांतर "सर" मध्ये झाले, पण तरी ही या पेशातील तत्व,बदलली नाहीत.त्यांचा आदर कमी झाला नाही. उलट वेळोवेळी सल्ला,मार्गदर्शन घ्यायला विद्यार्थ्याला सर हवे असतात. आज केवळ विद्यार्थी घडवने,हे शिक्षकांचे ध्येय असत नाही,तर एक सामाजिक,राष्ट्रीय जाणिवा,आणि जबाबदारी चे भान असणारा सुजाण नागरिक घडवने हे महत्वाचे काम आजचे गुरु करतात. आजची स्थिती पाहता पूर्वी सारखा गुरुबद्दल धाक किवा भीति मुलांमध्ये दिसून येत नाही उलट मुले आणि शिक्षक यांच्या मध्ये सवांद वाढला आहे, याला कारणीभूत आजची विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती होय. त्यामुळे संवादाची साधने वाढली. संवाद वाढला. आजचा विद्यार्थी फेसबुक,जीमेल,व्हाट्स अँप च्या माध्यमातून शिक्षकांशी जोड़ला गेला आहे. एक मैत्री चे नाते शिक्षक व विद्यार्थी यांच्यात पहावयास मिळते. एखाद्या लेक्चर ची माहिती,अभ्यासातील अडचणी,नोट्स थेट व्हाट्सऍप च्या माध्यमातून विद्यार्था पर्यन्त पोहचवले जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात मुलांना शिक्षकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. शाळा,कॉलेज पिकनिक,स्नेहसमेलन अशा कार्यक्रमातुन ही शिक्षक आणि मुले यांचे मैत्री चे नाते दिसून येते. प्रत्येकाला आयुष्यात अनेक वेळा अडचणी च्या वेळी योग्य सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला एका चांगल्या गुरु ची गरज भासतेच. गुरु नुसते शिकवत नाहीत,तर आपले आयुष्य घडवतात्. दीपस्तम्भा सारखे मार्गदर्शन करतात. गुरूंचे महत्व,त्यांचे स्थान,त्यांचा आदर युगाणुयुगे अबाधित राहणार आहे. आजच्या गुरु पौर्णिमे च्या दिवशी आपल्या गुरुंना वंदन करून म्हणावेसे वाटते,,," गुरु ब्रह्मा,गुरु विष्णु गुरुर देवो महेश्वराः,,,,गुरु साक्षात् परब्रह्म,तस्मै श्री गुरवे नमः,,""!!