STORYMIRROR

सई दंडगव्हाळ

Inspirational

2  

सई दंडगव्हाळ

Inspirational

गुरु

गुरु

3 mins
125

गुरु ह्या शब्दाची फोड करायची झाली तर प्रथम शब्द म्हणजे गुप्त ज्ञान देणारे आणि रु म्हणजे रूपक असा अर्थ आपल्या आयुष्याला देणारे ते गुरु. गुरु शिष्याच्या आयुष्यात येतात आणि शिष्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते. अज्ञानरुपी अंधारात चाचपडत असलेल्याला छोटासा लामन दिवाच असतात गुरु. गुरु आणि शिष्य हे नाते गाठीप्रमाने बांधून घेतलेले असते दोघांनीही. आणि ही गाठ न सुटणारी असते. कारण शिष्य कायम त्याच्या ऋणात असतो. शिष्य कितीही मोठा झाला असला तरी गुरु ची जागा तो कधीच घेऊ शकत नाही. आणि शिष्यानेही हे कायम ध्यानात असू द्यावे. जसे शिंपल्यात पावसाचा थेंब पडला की त्याचा मोती झाल्या वाचून राहत नाही. त्याचप्रमाणे गुरु सानिध्यात शिष्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही. फक्त गरज असते ती आत्मसात करण्याची. ज्याप्रमाणे समुद्र कितीही उपसला तरी तो समुद्र कधी आटत नाही. त्याचप्रमाणे गुरु हे त्या विशालकाय समुद्राप्रमाणे असतात. आपल्याला जितके ते अमृत रसपान करता येईल तेवढे करावे. ओहोटी आली तर सोडून जायचे नाही आणि भरती आली तर हुरळून जायचे नाही, येवढे मात्र लक्षात ठेवावे.


गुरु आपल्या आयुष्यात अँटीव्हायरस प्रमाणे काम करतात. आपल्या शरीररुपी कॉम्प्युटर मध्ये ते योग्य वेळीच इंस्टॉल करावे लागते म्हणजे आगामी काळात येणाऱ्या मनुष्यरुपी, घटनारुपी फाईल्स या वेरीफाय करूनच प्रवेश करतील. देवापेक्षा ही श्रेष्ठत्वाचे स्थान मिळविले ते गुरुने. कली ही ज्याला शरण आला ते गुरु. तुम्ही समोर असताना आणि नसताना ही तुमची देखभाल करणारे सीसीटीव्ही यंत्रणाच आहेत. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ' पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ' ही कणा कविता म्हणूनच गुरूचे महत्त्व लक्षात आणून देणारी आहे. गुरु तुमच्या आयुष्यात येऊन जीवन अगदी आल्हाददायक करून टाकतो. भविष्यात येणाऱ्या आगामी आणि सध्या भोगत असलेल्या भोगाचे चटकेही बसू देत नाही. फक्त आपण एकनिष्ठ राहून ते चरणकमल सोडता कामा नये. गुरुशिवाय हे जीवन वृथा आहे. आयुष्यात कितीही भौतिक सुख उपभोगूनही गुरुविण जीवन अधुरे. योग्य वाटेवर आपण पाऊल ठेवतो आहे की नाही किंवा चुकीच्या मार्गावरून सत्कर्माच्या मार्गी लावण्याचे काम गुरु करतो. आत्ताच्याच भाषेत सांगायचे झाले तर तो आपला फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर सर्व काही असतो. षडरिपुंवर विजय मिळवण्यात मदत करतो. फक्त गरज असते ती आपण गोचीड प्रमाणे चिकटून राहण्याची. या नश्वर जगात आपले म्हणून जर कोणी असेल, सदैव आपला हितचिंतक, वाटाड्या, मनकवडा तो फक्त गुरु.


आपल्याला काय हवंय यापेक्षा आपल्यासाठी काय हितावह अन् योग्य आहे ते गुरु मिळवून देतो. अहो फक्त प्रचंड विश्वास ठेवा, जसे आपण आकाशात फेकलेले बाळ हसत असते... त्याला चिंता, भीती नसते खाली पडण्याची. कारण त्याचा विश्वास असतो की आपल्याला वरचेवर झेलण्यासाठी कोणीतरी आहे. तद्वतच विश्वास जर आपल्या अंगी बाणला तर गुरु आपल्याला हिरा बनवणारच यात तीळमात्रही शंका नाही. नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळवून देण्याचे सामर्थ्य गुरुमध्ये असते. आपले कर्मभोग ही बदलण्याचे बळ गुरुठायी असते. गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले मायबाप च असतात. आई सारखी ममता जिव्हाळा देतात तर बापासारखी सावली अन् आधाराची साथ देतात. एकदा का गुरु केला तर तो सांगेल ते ऐका.. त्यातच आपले सर्वकाही हितसाध्य असते. सगुण गुरु जर आपल्याला आयुष्यात भेटला तर आपल्यासारखे भाग्यवान आम्हीच. म्हणूनच म्हटले आहे, " श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी ".


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational