गुढी उभारु कर्तव्याची
गुढी उभारु कर्तव्याची
जवळ जवळ 15 दिवस झाले शाळा मॉल सिनेमा गृह सगळी मोठी दुकाने बंद आहेत. चीन मधून एक व्हायरस आला आणि सगळ्या जगाला आपल्या कवेत घेतले त्याने. सगळे आर्थिक व्यव्हार ठप्प झाले. यश आणि सानवी शाळा बंद असल्याने घरी कंटाळून गेले आहेत. बाहेर पडण्याचा ही मार्ग बंद .घरात आम्ही तिघेच,शेखर ला 12 तास तर कधी 16 तास ड्युटी लागत आहे .मनवा एकटी हा विचार करत बसली होती. यश सानवी खेळत बसले होते. ती दोघ लहान त्यांना या आजाराचं कोरोनाच गांभीर्य थोडीच समजणार पण शेखर च्या काळजीने मनवा उदास होत होती. शेखर पोलिस ऑफिसर होता त्यामुळे त्याला सुट्टी न्हवती. 6 वर्षाचा यश आणि 4 वर्षाची सानवी यांच्याकडे मनवा ला लक्ष द्यावे लागत होते. वेळोवेळी त्यांना हात धूवायला लावणे, सकस अन्न खाऊ घालणे, सर्दी खोकला होऊ नये याची काळजी घेणे आणि घरातील कामे पन करणे कोणाची मदत नाही त्यामुळे मनवा ही दमून जायची पण आता नाईलाज होता. शेखर चा डबा पाणी मास्क सॅनिटायझर आठवणीने देणे. डबल ड्युटी असेल तर जास्तीचे खायला देणे हे सगळं ती नेटाने करत होती. तिची दमणूक होतेय हे शेखरला दिसत होते समजत होते पण त्याची पण ड्युटी अशी की तो इचछा असून पण मनवाला मदत करू शकत न्हवता. त्याला मग मनापासून वाईट वाटायचे.
मनवा खूप समजूतदार होती त्यामुळेच शेखर निर्धास्तपणे ड्युटी कडे लक्ष द्यायचा. टी व्ही वर सारख्या कोरोना संबधीत बातम्या देत होते. आज रात्री 8 वाजता पी एम् मा. नरेंद्र मोदी लाइव येणार होते. मनवाला शेखर मुळे न्यूज़ पाहण्याची सवय लागली होती तसे ही शेखर पोलिस खात्यात म्हणटल्यावर न्यूज़ वर्तमानपत्र वाचन हे गरजेचे होते. मनवा आपले सारे काम उरकून घेवून टि व्ही समोर बसली. यश ने विचारले आई बाबा कधी येणार ? थोड्या वेळात येणार हा बाबा मनवा म्हणाली. आज शेखर डबल डयूटी करून रात्री 11 वाजता येणार होता. बरोबर 8 वाजता पी एम लाइव आले ,कोरोना बाबत दक्षता बाळगा काळजी घ्या असे बोलले आणि आज रात्री 12 पासून 21 दिवस संपूर्ण लॉकडाउन करण्यात येईल अशी घोषणा केली. शेखर रात्री आला. तो पर्यन्त मूल झोपुन गेली होती. मुलां कड़े पाहून शेखर ला गलबलून आले पन काय करणार कर्तव्य पहिले होते त्याच्या साठी. मनवा म्हणाली अरे बराच वेळ जागेच होते दोघ पन तुझी वाट पहात मग कंटाळून झोपली. शेखर म्हणाला, बघ ना मनू आता मूल घरी आहेत तरी मला त्याना वेळ देता येइना ,डयूटीच अशी लागली आहे तरी तू सगळ करतेस घर मुलांना सांभाळतेस माझी पन काळजी घेतेस थैंक्स डियर.. असे म्हणत शेखरने मनू ला आपल्या मिठित घेतले. शेखर मी एका पोलीस अधिकार्याची बायको आहे हे विसरलास का तू? कसा विसरेंन मनु चल जेवून घेऊ म्हणत दोघ जेवायला बसले. सकाळी शेखर उठला स्वहताच आवरुन् यश आणि सानवी सोबत खेळत् गप्पा मारत बसला होता थोड़ा वेळ बाकि होता त्याला डयूटी वर जायला. मनवा त्याचा टिफिन बनवत होती. शेखर ला फोन आला तो बोलत होता, हो सर चालेल मी लगेच निघतो आणि पोहचल्यावर तुम्हाला रिपोर्ट करतो . तो किचन मध्ये आला मनु अग ऐक हा शेखर काय हवे आहे का तुला? तसा शेखर ने मनुचा हात् आपल्या हातात घेतला म्हणाला, मनू मला आता साहेबांचा फोन आला होता मला तातडीने मुम्बई ला जायला सांगीतले आहे. आमच्या पोलीस स्टेशन मधून आम्हा10 जनांची मुम्बई ला 21 दिवस ड्यूटी लागली आहे. मुम्बई ला काही उपनगरात पोलिस फ़ौज कमी पड़ते आहे म्हणून आम्हाला जावे लागत आहे. आताच मला निघावे लागेल सॉरी मनु. शेखर अरे सॉरी कशाला म्हणतोस तुझ कामच आहे हे आणि तू आमची काळजी करु नकोस मी मुलांची काळजी घेईन्. मनवाने जाणीव पूर्वक आपले अश्रु अडवून धरले पन शेखरला न् दिसता ही तिचे अश्रु दिसले. तो स्वतःचे अश्रू आवरणया साठी रुम मध्ये गेला तसे मनवाचे अश्रु गालावर ओघळले. ती पटापट काम आवरु लागली. शेखर ही तयार झाला पोलिस स्टेशन मधून तो आणि त्याचे सहकारी त्यांच्या कार मधून मुंबई ला जाणार होते. शेखरने मनवा ला मुलांना जवळ घेतले म्हणाला,यश सानू आई ला त्रास द्यायचा नाही मि थोड़े दिवस बाहेर गावी जाणार आहे आई चे सगळ ऐकायचे . ओके बाबा यश म्हणाला, तुम्ही लवकर या आम्ही वाट पाहतो तुमची हो बाळा लवकर येईन् असे म्हणत शेखर बाहेर पडला मनवा ला सगळ्या सुचना दिल्या होत्या.
काही इमर्जन्सी असेल तर त्याचा मित्र जो इथे पुण्यात पोलिस इंस्पेक्टर होता त्याला कॉन्टैक्ट कर असे म्हनाला. मनवा म्हणाली हो शेखर तू आमची काळजी अजिबात करु नकोस आता देशाला तुझी गरज जास्त आहे काळजी घे तू पन. शेखर नजरेआड़ होई पर्यन्त मनवा त्याला पहात उभी होती आता 21 दिवस शेखर भेटणार नाही या कल्पनेने तीला अजुन रडु आले पन मुलां साठी ती अश्रु पुसुन ती कामाला लागली. रोज रात्री शेखर फोन करायचा त्यांची खुशाली विचारायचा असे दिवस चालले होते . जगभरात कोरोना चे संकट आ वासुन उभे ठाकले होते . डॉक्टर्स,पोलिस,नर्सेस,सफाई कामगार तसेच अत्यावशक सेवेतील कर्मचारी न् कंटाळता आप आपली ड्यूटी करत होते. लोकांना करोना पासून कसे वाचवता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.
चार दिवसांनी गुढी पाडवा होता नवीन वर्ष सुरु होणार होते. मनवा ला वाटले आता शेखर इथे नाही तर या वर्षी नकोच गुढी उभा करायला मी एकटी इथे कशाला सण साजरा करु नकोच या वर्षी आणि मूड पन नाही शेखर शिवाय सण कसला? रात्री नेहमी प्रमाणे शेखर चा फोन आला मनू म्हणाली आम्ही ठीक आहोत शेखर तू कसा आहेस. मी पण ठीक आहे माझी काळजी करू नकोस तो म्हणाला. मनवा म्हणाली,शेखर परवा गुढीपाडवा आहे आणि तू आमच्या जवळ नाहीस तेव्हा या वर्षी नको गुढी उभा करायला माझी इच्छा पण नाही. तसा शेखर म्हणाला,मनु अग मी जवळ नाही म्हणून तू नवीन वर्षाच स्वागत करणार नाहीस असे नको करू तू गुढी उभा कर सण आनंदात साजरा कर,मुलं आहेत ना सोबत आणि मी लवकरच येणार आहे माझ्या मुळे तू सण साजरा करणार नाहीस हे बरोबर नाही त्याला थांबवत मनवा बोलली पण शेखर गुढी तर घरातला कर्ता पुरुष उभा करतो ना, तुझ्या शिवाय एकांतवासातला हा सण मला नाही साजरा करायचा. शेखर म्हणाला, वेडी आहेस का मनु आज 21 व्या शतकात स्त्री पुरुष असा भेद करतेस अग तू तर माझ्या घरची अष्टभुजा, आदिशक्ती, अन्नपूर्णा आहेस तुझ्या मूळे च मी बिनधास्तपणे माझे काम करू शकतो, तू माझं घर मुलं यांना सांभाळतेस तू माझी शक्ती आहेस. मनवा मी म्हणतो तूच आता गुढी उभी करायची आणि आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी प्रार्थना कर येणार नवीन वर्ष सर्वाना सुखाचं समाधानच जाऊ दे अशी प्रार्थना कर. मी कायम तुझ्या जवळच आहे तू हा सण एकांतवासातला असा नको समजूस उलट ही एक संधी आहे निसर्गाला धन्यवाद देण्याची आपण निसर्गाच्या विरुद्ध बरीच काम करतो मग आता निसर्गाची काळजी घेणे आपलं काम आहे. या करोनाने आपल्याला हे दाखवून दिले की कुटुंबातील लोकांशी संवाद साधणं,त्यांना वेळ देणं एकमेकांची काळजी घेणं हे किती महत्वाचे आहे आपण फक्त जगायचं म्हणून जगत राहतो पण जरा ब्रेक घेऊन पुन्हा समाधानाने जगण्याची उर्मी या आजाराने दिली आहे. हा एकांतवास लवकरच संपणार आहे आणि पुन्हा नव्या जोमाने प्रत्येक जण कामाला सुरुवात करणार आहे. मनवा आता देशाला माझी गरज जास्त आहे मी माझे कर्तव्य पार पाडत आहे तसे तू ही एका पोलिस अधिकाऱ्याची बायको म्हणून जे कर्तव्य आहे ते आनंदाने पार पाड. हा शेखर मी नक्की गुढी उभा करेन तू निश्चित रहा आणि स्वहताची पण काळजी घे मनवा बोलली. द्याटस लाइक अ गुड वाईफ मनू लव यु शेखर म्हणाला,आय लव यु टू शेखर म्हणत मनवा ने फोन बंद केला आज गुढीपाडवा मनवा छान पैठणी नेसून तयार झाली मुलांना ही तयार केले गुढीची काठी यश ला मदतीला घेऊन सजवली आणि आनंदाने नवीन वर्षाची गुढी उभी केली. गुढीसोबत स्वहता चा आणि यश सानू चा फोटो काढून शेखर ला पाठवला. गुढी ची मनोभावे प्रार्थना केली आणि देशाचे आणि देशवासियांचे करोना पासून रक्षण कर अशी प्रार्थना केली. पुरणपोळी चा स्वयंपाक तिने केला होता. मुलांना सोबत घेऊन ती जेवली. तिला आज खूप समाधान वाटत होते कारण शेखर ची ती पत्नी होती,तिला अभिमान वाटत होतं की शेखर एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होता. आता थोडेच दिवस हा एकांतवास होता तो आता लवकर संपणार होता आणि गुढीपाडवा सर्वाना नवचैतन्य देणार होता. कायम लक्षात राहील असा हा "एकांतवासातील सण " ठरणार होता...
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तवाशी याचा काही ही संबध नाही. आज करोना मुळे बऱयाच जनांनी एकांतवासात गुढीपाडवा साजरा केला त्याला अनुसरून ही कथा.!! पोलिस ऑनड्युटी चोवीस तास काम करतात. कामाचे तास निश्चित नसल्याने ड्युटी संपल्यानंतर अचानक अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते. सण, उत्सवात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द होतात. अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारे पोलिस घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्यला प्राधान्य देतात. कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते. सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपण्यासाठी कधी कधी त्यांना प्राण ही गमवावे लागतात. आज तमाम डॉक्टरस, नर्सेस, पोलीस अधिकारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी,सफाई कामगार आपल्याला साठी अहोरात्र झटत आहेत त्यांना माझा मानाचा मुजरा...हॅट्स ऑफ !!