"गृहलक्ष्मी"
"गृहलक्ष्मी"


नेहा सुबोध बरोबर सुमीत कड़े जायला तैयार होते. चला एक वेळ तरी सुट्टी स्वयंपाकाला , पण दोघेही पोहोचल्यावर बघतात तर काय सुमीत स्वयपाक करतोय आणि स्वाती झोपली, काळजी वाटली. माहिती पड़ले की गरोदरपणात डॉक्टरांनी जास्त प्रमाणात काम नाही करायचे असे सांगितल्या प्रमाणे सुमीत वागतो, त्याने नेहाची मदत पण न घेता कुशालने त्यांना जेवायला वाढ़ले.
तो म्हणे पूर्वी एकत्र असताना तिने पण नोकरीच्या बरोबर सगळ्यांच्या आवड़ी-निवड़ी जपून घराची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळून माझ्या तब्येतीची काळजी सुद्धा न सांगता घेतली, तर या क्षणाला मला मदत करणे गरजेचे आहे, कारण घरातली गृहलक्ष्मी निरोगी असेल तेव्हांस बाळाचे संगोपनाबरोबरच कुटुंबपण आनंदी राहील, हे ऐकून सुबोधला आपली चूक कळली.