अक्षय काळमेघ

Romance Tragedy

3.8  

अक्षय काळमेघ

Romance Tragedy

गोष्ट त्याच्या प्रेमाची...❣️

गोष्ट त्याच्या प्रेमाची...❣️

11 mins
464


अभि ला आज ऑफिसला जायला जरा उशीर च झाला होता. स्नेहा घाईघाईत नाश्ता आणि चहा घेऊन आली...आणि परत किचन मधे गेली. इतक्यात अभिने चहा नाश्ता केला आणि तसाच ऑफिसला निघाला तोच स्नेहा ने त्याला हाक मारली..."अरे डबा तर घेऊन जा..."तोच तो मागे वळला आणि डबा घेतला.. बाहेर जाताच परत मागे वळला आता काय तर चावी विसरला होता..तोच स्नेहा धावत आली आणि त्याच्या हाती चावी ठेवली...तिला पाहताच अभि हसला तिला एक मिठी मारली आणि ऑफिसला निघून गेला...

अभि एकदाचा ऑफिसला गेला की स्नेहा निवांत तिची राहिलेली काम करत बसायची... आज तिला जास्त काही काम नव्हती तरी काय करावं तिला सुचेना...घरात एकटीच...तिने आज घर आवरायचं ठरवलं...खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हती तिने तिची रूम आवरायला घेतली...

      इकडे अभि ऑफिसला पोहचला होता...दुपार झाली जेवायची वेळ झाली की तो एकदा तिला कॉल करायचा...आज स्नेहा कामात होती तिने आता कपाट आवरायला घेतलं होत...तेवढ्यात तिचा फोन वाजला..अभिनेच कॉल केला होता...आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या...बोलता बोलता अभिच जेवण पणं झाल आणि त्याने कॉल ठेवला...स्नेहा ने ही पटकन सार काम आटोपलं आणि फ्रेश होऊन तिनेही थोड खाऊन घेतलं...आणि टी व्ही बघत बसली...

         संध्याकाळचे पाच वाजले होते...घड्याळाकडे पाहताच स्नेहा तशीच उठली टीव्ही बंद केला आणि पुन्हा कामाला लागली...दिवे लावायची वेळ झाली...स्नेहा ने देवाजवळ दिवा लावला आणि अभिची वाट बघत बसली...तेवढ्यात तिचा फोन वाजला...स्नेहाच्या आईचा फोन होता..खूप दिवसानंतर ती आईशी बोलत होती..आई ने तिला आज माझ्यासोबत बाहेर येतेस का म्हणून विचारलं...स्नेहाने तसाच होकार दिला...आणि अभिला कॉल केला. पण त्याने कॉल उचलला नाही...स्नेहा ने पुन्हा कॉल केला पणं तरी त्याने उचलला नाही...ती तशीच बाहेर निघून गेली...आईला फोन केला आणि त्या दोघी भेटल्या...रात्र झाली होती

नऊ वाजत आले होते..दोघींची शॉपिंग झाली...स्नेहाला काळजी वाटत होती की अभि ला न सांगताच ती बाहेर आली होती..तेव्हाच ती आईला सांगून घरी जायला निघाली...तिला वाटलं आता पर्यंत अभि घरी पोहचला असेल...तिने अभी ला कॉल केला त्याने तेव्हाही कॉल उचलला नाही...ती घाईघाईत घरी आली पणं घरी कुणीच नव्हत...तिने लाईट लावली आणि स्वयंपाक करायला लागली...

          तिचा स्वयंपाक पणं झाला होता...दहा वाजत आले होते अभि अजून आला नव्हता..आता स्नेहाला जास्त काळजी वाटू लागली होती...ती अभीला कॉल वर कॉल करत होती तो कॉल घेत नव्हता तशी तिची काळजी वाढत होती...रात्रीचे अकरा वाजले...तेवढ्यात तिचा फोन वाजला...तिने लगेच मोबाईल घेतला तर आईचा कॉल होता आणि आई म्हणाली..."अग स्नेहा बाळा लवकर इकडे घरी ये..."स्नेहाला आणखी काळजी वाटतं होती...त्यावर ती म्हणाली... "अग आई आता तर भेटलो आपण आणि येवढ्या रात्री अस काय झालं...?.. अग ते विचारू नको आधी तू घरी ये...?" स्नेहा ने फोन ठेवला आणि तशीच घराला लॉक करून गाडी काढली आणि काही वेळातच घरी पोहचली...साधारण रात्रीचे बारा वाजले होते...घरी पोहचताच तिने बेल वाजवली आणि...


दरवाजा उघडला...स्नेहा आत आली पणं घरात सगळा अंधार होता...तिला काही दिसत नव्हत...तेवढ्यात अचानक स्नेहाच्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवला आणि लाईट आली. तशीच स्नेहा मागे वळली आणि... विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थडे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा....बायको... विश करत अभि तिच्या समोर उभा होता...त्याला पाहून तिला खूप आनंद झाला...थॅन्क्स म्हणत तिनेही अभि ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...आणि तोच स्नेहाच्या घरच्यांनी सुध्दा तिला आणि अभि ला शुभेच्छा दिल्या.. आज स्नेहा चा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा सुध्दा पहिला वाढदिवस होता..याच सरप्राइज साठी स्नेहाला इतक्या रात्री बोलवलं होत हा सगळा अभि चा प्लॅन होता. स्नेहा हे सरप्राइज बघून खूप खुश झाली...आईने तिला आत मधे नेलं आणि स्नेहा छान तयार होऊन आली. मग सेलिब्रेशन पार्टी सुरू झाली. केक कटिंग झाला...अभि ने स्नेहा साठी गिफ्ट आणला होत..ते त्याने तिला दिलं...पणं स्नेहा तीच गिफ्ट घरीच विसरली होती कारण ती घाईघाईत आली होती... नंतर स्नेहाच्या आईने स्वयंपाक केलाच होता.सगळ्यांनी जेवण केले रात्रीचा एक वाजला होता.अभि ने ही छोटी पार्टी केली होती पण ऑफिस वाल्यान साठी दुसरी पार्टी उद्या होती. म्हणून ते दोघे रात्रीच घरी परत आले.घरी येताच दोघेही लवकरच झोपले...

     सकाळ झाली..आज स्नेहा ला उशिरा जाग आली पणं अभि मात्र लवकर उठला होता..स्नेहा ने पटकन अंघोळ केली आणि तशीच किचन मध्ये गेली बघते तर काय अभि ने चहा आणि नाश्ता केला होता.स्नेहा त्याच्या जवळ गेली तर त्याने तिला बाहेर बसायला सांगितलं.. आज सगळं मी करणार तू फक्त बसून खायचं..आणि त्याने स्नेहाला बाहेर बसवलं..तो परत किचन मध्ये गेला आणि चहा नाश्ता घेऊन आला.आणि दोघांनी ही छान नाश्ता केला...स्नेहाला कांदेपोहे खूप आवडायचे म्हणून त्याने खास तिच्यासाठी कांदेपोहे बनवले..नाश्ता होताच स्नेहा अभि ला म्हणाली...अरे आज साठी काय बनवायचं तेव्हा अभि म्हणाला तू एकटीने काही करायचं नाही आपण सोबत सगळं बनवू...मला उत्तम स्वयंपाक करता येतो तुला तर माहीतच आहे..अरे पण... स्नेहा ला काही बोलू न देताच तो म्हनाला...नाही आज आपण सोबत स्वयंपाक करायचा...सो चला पटकन कामाला लागू म्हणजे पार्टीला उशीर नको..दुपारचे 12 वाजले होते...जेवण तयार झालं होत..आणि सगळी तयारी पणं झाली होती दोघेही जाऊन पटकन तयार होऊन आले तेवढ्यात स्नेहाची आई आणि बाबा आले होते...बघता बघता 2 वाजले...अभि आणि स्नेहा तयार होऊन बाहेर आले होते..तेवढ्यात ऑफिस मधले सगळे येऊन पोहचले आज रविवार होता तर सुट्टी होती...अभि आणि स्नेहाने सगळ्याचं स्वागत केलं.आणि सगळ्यांनी त्या दोघांना विश केलं गिफ्ट दिले..

    सगळे गप्पा करत बसले होते...तेवढ्यात विभा ची एन्ट्री झाली..दिसायला छान गोरी पान..सलवार सूट मध्ये आज विभा खूप छान दिसत होती..ती येताच सगळे तिच्या कडे बघत होते..तेव्हा विभा म्हणाली अरे असे काय बघताय मी भूत नाही विभा आहे...तेव्हा अभि च म्हनाला होहो तू विभाच आहे पणं तुला अस कधी बघितल नाही न म्हणून जरा..तेव्हा सगळे हसायला लागले अभि तूना थांब बघते च तुला...म्हणत तीही हसायला लागली..आणि अरे विसरली च अभि आणि स्नेहा हॅप्पी मॅरेज अॅनिवर्सरी...म्हणत तिने स्नेहा आणि अभि ला विश केलं.ती अभि ला म्हणाली अभि तू सांगितलं त्याहून खूप छान आहे स्नेहा..लग्नात येऊ शकले नाही तर स्नेहाला भेटायचं राहून गेलं होत..पणं लकी आहे तू तुला स्नेहा सारखी बायको मिळाली...यावर सगळे हसले स्नेहा ही विभाला आजच भेटली होती..त्यांच्या छान गप्पा झाल्या आणि सगळ्यांनी मग छान जेवण केलं.आणि सगळे परत घरी निघून गेले...आज दोघेही खूप खुश होते...बघता बघता एक वर्ष कधी गेलं त्यांना ही कळलं नाही...

        सकाळ झाली...अभि तयार होऊन बाहेर आला...स्नेहाने नाश्ता आणून दिला त्याने नाश्ता केला आणि बाहेर जायला निघाला तोच अचानक...चक्कर येऊन तो खाली पडला..स्नेहा तशीच धावत आली अभि उठ.. काय झालं..? ती घाबरली..तिने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तोच अभि शुध्दीवर आला..स्नेहा ने त्याला रूम मध्ये नेल...तिने त्याला सरबत दिलं...आता त्याला बर वाटत होत. कालच्या दगदगिमुळे असेल म्हणून स्नेहा ने ही मनावर घेतलं नाही तो येता येता डॉक्टर कडे जाईल म्हणत ऑफिसला निघून गेला...ऑफिस मधे येताच विभा त्याच्या जवळ आली विभा अभिची छान मैत्रीण होती.. एकाच कॉलेज मध्ये दोघे शिकले होते...दोघांचं छान जमत होत...सगळ्या गोष्टी दोघं एकमेकांना सांगत खूप क्लोज होते दोघं एकमेकांच्या...विभा म्हणाली काय मग अभिराव आज फ्रेश दिसत नाही आहात...काय झालं तर तेव्हा अभिने तिला सांगितलं..तेव्हा ती म्हणाली अरे थकला असशील म्हणून झाल असेल इतकं काय त्यात चला काम करा..आणि तो दिवस तसचं कामात गेला...

     रात्र झाली अभि घरी आला...स्नेहा ने स्वयंपाक करून ठेवला होता...तो फ्रेश होऊन आला तोच स्नेहा ने विचारलं कसा आहेेस ?...तो म्हणाला अग ठीक आहे मी...काही नाही झाल...मी एकदम ठीक आहे...चल खूप भूक लागली आहे तू ताट वाढ बर..स्नेहा ने ताट वाढलं आणि दोघांनी जेवण केलं...स्नेहा लवकर आटोपून घे आपण जरा बाहेर चक्कर मारून येऊ खूप दिवस झाले कुठे गेलोच नाही...स्नेहा ने पटकन आटोपलं आणि दोघेही बाहेर फिरायला गेले...चालत चालत दोघे एका आइस्क्रिम पार्लर जवळ आले आणि अभि ने आइस्क्रिम घेतली...आइस्क्रिम खात खात दोघं गप्पा करत घरी आले रात्र खूप झाली होती दोघे लवकरच झोपी गेले...

काही दिवस असेच सुखात गेले...पणं सुखा नंतर दुःख हे येणारच...त्याचा सामना दोघांना हि करावा लगनार होता...दोघांचं ही आयुष्य बदलणार होत....


 आज अभि घाईघाईत ऑफिस ला निघून गेला.त्याने नाश्ता ही केला नाही.स्नेहा ला काही कळेना पणं तिला वाटलं कामाचा ट्रेस असेल म्हणून तिने समजून घेतलं. दिवस असाच गेला स्नेहा तिच्या घर कामात आणि अभि ऑफिस च्या कामात.रात्र झाली होती स्नेहा अभीची वाट पाहत बसली होती. रात्रीचे दहा वाजले होते. तिला खूप भूक लागली होती.अभि सोबत जेवण करू अस तिला वाटत होत पण अभि अजून आला नव्हता आणि फोन ही उचलत नव्हता. शेवटी तिला राहवलं नाही तिने जेवण केलं आणि तशीच रूम मध्ये जाऊन झोपी गेली. रात्री चा एक वाजला होता अभि ऑफिस वरून परत आला होता. काही आवाज न करता तो तसाच येऊन झोपी गेला.

    अभि च वागणं स्नेहाला ठीक वाटत नव्हत.तो जास्त बोलत नव्हता...रात्री अपरात्री यायचा आणि तसाच झोपी जायचं..स्नेहा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची पणं तो गोष्ट बदलवून सगळं ठीक आहे असा दाखवायचा...आता त्याच अस वागणं रोजच सुरू झाल...स्नेहाला काळजी वाटत होती..ती त्याच्या शी खूपदा या बाबत बोलायचा प्रयत्न करत होती पणं तो तिची एकही गोष्ट ऐकायचा नाही उलट तिच्या वर रागवाय चा आणि मग दोघात वाद व्हायची.पणं हे अस अचानक का कसं झाल हे स्नेहाला कळत नव्हत.एक दिवस सकाळी...अभि पुन्हा घाईघाईत तसाचं ऑफिस ला निघून गेला..आता ते दोघं एकमेकांशी जास्त बोलत नव्हते..पणं घाई घाईत तो त्याचा मोबाईल घरीच विसरून गेला होता.तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला एका पाठोपाठ एक मेसेज येत होते.आणि कॉल पणं ते स्नेहाला दिसल पणं बघावं की नाही अस तिला झाल पणं शेवटी तिने मेसेज वाचले.मेसेज वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली...तिला धक्का बसला..ती तशीच खाली बसली...आणि एकदम रडायला लागली...अभि खरच अस करू शकतो तिला विश्र्वासच बसत नव्हता...तिने स्वतः ला सावरलं आणि आता ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे...ह्याच विचारात ती होती दिवस जाता जात नव्हता तो मेसेज अजून तिच्या डोक्यात धुमत होता.रात्र झाली...अभि घरी आला आज स्नेहा जागीच होती तिला पाहून अभि ने नजर चोरली आणि रूम मध्ये जाणारच तो...स्नेहाने त्याला थांबवलं...आणि म्हणाली...अभि हे काय चाललंय तुझ...अरे अस काही होत तर सांगायचं ना..का माझ्या पासून लपवतोय..तुझ वागणं बोलणं बदललंय ...तेव्हाच मला कळायला हवं होत.पणं नाही तू अस काही करशील अस वाटल नव्हत...पणं जेव्हा हे मेसेज बघितले न तेव्हा मला सगळं कळलं...का अस केलंस रे...कुठे कमी पडली मी सांग ना..? स्नेहा अस बोलणं बघून अभि घाबरला..तो म्हणाला काय आणि कस ? अरे आता तरी खोटं बोलू नको.. आज तुझ्या मोबाईल वरचे सगळे मेसेज मी वाचले.पणं तरी त्या मेसेज वर मला विश्वास बसला नाही.म्हणून तुला विचारात आहे...की खरंच तू विभा वर प्रेम करतो...अभि आज चूप राहू नको..सांग खर काय ते...अभि खाली मान घालून सगळ ऐकत होता...आणि स्नेहा बोलत होती तोच तो म्हणला की हो आहे माझ विभा वर प्रेम...अहो आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात...आणि मला तुझ्या मधून सुटका हवी आहे बस...मी तुला हे सांगणार होतो पणं तुला ते कळलं हे चांगलं झालं...म्हणून जास्त विचार करू नको आणि हो मला डिव्होर्स हवा आहे...येवढं बोलून तो रूम मध्ये निघून गेला...स्नेहा एकदम चूप उभी होती..अभिचे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते... रडाव की हसावं अस तिला झाल...येवढं मोठं दुःख पचवणं सोपी नव्हत तरी स्नेहा ने स्वतः ला सावरलं...आणि तशीच रूम मध्ये गेली आणि बॅग भरली..अभि तिच्याकडे बघत होता पणं त्याने तिला अडवल नाही..तिने बॅग उचलली तशीच घराबाहेर पडली...शेवटचं तिने घराकडे बघितलं...आता पुन्हा मागे वळून बघता येणार नाही हे तिला माहीत होत...

आता तिला तिच्या आईबाबा चा आधार होता...ती तिच्या घरी पोहचली. आईने दार उघडलं अशी रात्री अचानक आणि तेही बॅग घेऊन तिला पाहताच तिच्या आईला वेगळं काही वाटलं आणि तिने स्नेहाला विचारलं स्नेहा काय झालं अशी अचानक इथं...बोल ना पणं स्नेहा काही बोलत नव्हती...स्नेहाच्या आईचा आवाज ऐकुन स्नेहाचे बाबा पणं बाहेर आले त्यांनी स्नेहाला बसवलं आईने तिला पाणी दिलं...आणि बाबाला बिलगून स्नेहा एकदम रडायला लागली.बाबाने तिला सावरलं...अग काय झालं सांग तर अस रडून आम्हाला काही कळणार आहे का?..तेव्हा कुठे स्नेहा ने दोघांना खर काय ते सांगितलं.त्यांना ही धक्काच बसला..त्यांना विश्र्वासच होत नव्हता की अभि अस करू शकतो...पणं ते खर होत...त्यावर बाबा म्हणाले...बाळा काळजी करू नको..मी बोलतो अभि शी...त्यावर स्नेहा म्हणाली...कुणी कुणाशी बोलयाच नाही..तुमच्या समजावण्या ने तो समजणार नाही..म्हणून मी आता एक निर्णय घेतला आहे..की मी अभि ला डिव्होर्स देणार...खूप विचार करून स्नेहा ने हा निर्णय घेतला होता..पणं अभिने अस का केलं होत अचानक त्याच स्नेहा वरच प्रेम कस संपलं...अस काय झालं असेल..?

    


आज दोन महिने झाले...अभि आणि स्नेहाचा डिव्होर्स झाला होता... आता दोघे वेगळे झाले होते..स्नेहा ने या दोन महिन्यात मागे वळून पाहिलं नव्हत...पणं अभि चा विचार तिच्या मनातुन जात नव्हता...पणं आता मागे वळून फिरता येत नव्हत..स्नेहाच्या आई बाबा ला तिची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी तीच पुन्हा लग्न करायचं ठरवलं होत...त्यांनी स्नेहाचा विचार घेतला..पणं पाहिले तिने नकार दिला पणं आईबाबा कडे बघून तिने तिचा विचार बदलला..आणि काही दिवसात तिच्या साठी एक स्थळ आल..अजिंक्य...त्याच ही दुसर लग्न होत...

पाहण्याचा कार्यक्रम झाला...आणि लग्न पक्कं झाल...अजिंक्य बाहेर देशात नोकरी वर होता आणि लग्न झाल्यावर स्नेहाला घेऊन तो जाणार होता...स्नेहा खुश होती पण पुन्हा अस नको व्हायला याची तिला भीती वाटतं होती...पणं अजिंक्य च्या बाबतित पणं अस झाल होत..तो तिच्या भावना समजत होता...हळूहळू अजिंक्य ला स्नेहा आवडायला लागली.पणं स्नेहा अजून अभि ला विसरू शकली नव्हती.तो क्षण...त्या आठवणी अजूनही तशाच होत्या.पणं आता तिला सगळ विसराव लागणार होत...

     काही दिवस असे च गेले...अजिंक्य आणि स्नेहा एकमेकांना भेटू लागले..दोघांचे विचार जुळू लागले..आणि त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली होती..स्नेहा तिच्या आयुष्यात खुश होती..पणं अभि...तिने त्याच्या कडे वळून बघितल नाही...आणि इकडे....

डिव्होर्स झाला तेव्हा तेव्हा पासून अभि ने जॉब सोडला होता..तो घरीच होता...खूप थकल्या सारखा झाला होता...नेहमी स्नेहा ला आठवत होता..तो एकटा पडला होता..अधून मधून विभा त्याच्या कडे यायची...अभि अजूनही स्नेहाच्या प्रेमात होता..स्नेहा बद्दलची प्रत्येक बातमी विभा त्याला देत होती....विभा आणि अभि मधे प्रेम वगैरे काही नव्हत तो अभि ने रचलेला प्लॅन होता..जेव्हा तो चक्कर येऊन खाली पडला होता तेव्हा तो डॉक्टर कडे गेला होता...आणि तेव्हा डॉक्टर ने त्याच्या काही टेस्ट केल्या होत्या त्यात त्याला ब्लड कॅन्सर झाला होता आणि तो लास्ट स्टेज वर होता...हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला फक्त स्नेहाची काळजी वाटत होती...कारण तो वाचेल न वाचेल याची खात्री नव्हती..त्याला स्नेहा ला आनंदी बघायचं होत..त्याने तेव्हाच ठरवल...आपल्यासोबत अस काही झाल हे त्याने विभा ला सांगितलं..आणि त्याने विभा ची मदत मागितली...आणि विभा चा नाईलाज होता अभि ने पहिल्यांदा तिला काही मागितलं होत...अभि ने हे स्नेहाला कधी न कळू द्यायचं विभा कडून वाचन घेतलं होत...आणि अभि ने जाणून त्या दिवशी तो मोबाईल घरी ठेवला होता..आणि ऑफिस मधे जाताच त्याने स्वतः विभा च्या मोबाईल वरून मेसेज केले होते...स्नेहा ला अभि सांगू शकत नव्हता...तिला कळलं आणि ती जेव्हा अभि ला सोडून जात असताना अभि ला खूप वाईट वाटत होत..पणं त्याने तिच्या कडे न पाहता...तिला न कळू देता...तो तिच्या पासून दूर झाला..

   आणि आज विभा घाईघाईत आली आणि अभि ला सांगू लागली की परवा स्नेहा च लग्न आहे ती अजिंक्य सोबत खूप खुश आहे तुला हवं होत अगदी तशीच...हे ऐकून तो खूप खुश झाला. तो विभा म्हणाला...विभा आता मी सुखात मरू शकतो...आज माझं प्रेम जिंकल का मला नाही माहित पणं एक नक्की...मी शेवट पर्यंत तिच्यावर प्रेम केलं...आता ती खुश आहे हेच हवं होत मला...नाही तर माझ्या काळजीत ती स्वतःला विसरली असती... फक्त माझ्यासाठी जगली असती आणि मी गेल्यावर ती ती एकटी माझ्याच आठवणीत राहिली असती हेच नको होत...येवढं बोलताच ती खाली पडला...विभा ने लगेच त्याला हॉस्पिटल मधे भरती केलं...त्याची तब्येत खूप जास्त बिघडली होती..विभा ला राहवत नव्हत तिला आताच जाऊन सगळं सांगावं वाटत होत पण...अभि ला दिलेलं वचन आड येत होत...डॉक्टरांनी हात वर केले होते...अभि कधीही जाणार होता...आणि इकडे स्नेहाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि इकडे अभि ला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले तो शेवटचे क्षण मोजत होता...बघता बघता लग्नाचा दिवस आला...स्नेहा पुन्हा सात वाचनात अजिंक्य चा हात धरून चालत होती..आणि अभि तिला आठवून शेवटचे क्षण मोजत होता...विभा त्याच्या जवळ बसली होती..त्याचा हात हातात घेऊन रडत होती...पणं अभि मात्र हसत होता...

     आता अभि ची तब्येत जास्त क्रिटिकल झाली होती...स्नेहा आणि अजिंक्य च लग्न झालं आणि...अभिने अखेरचा श्वास घेतला...स्नेहा अभिच्या आठवणीं त्यांचं प्रेम मागे सोडून अजिंक्य सोबत निघून गेली...आणि अभि तिला सुखात पाहून कायमचा निघून गेला...अभि तिला सुखी करून प्रेम जिंकला होता...अशी होती गोष्ट त्याच्या प्रेमाच्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance