अक्षय काळमेघ

Others

2.5  

अक्षय काळमेघ

Others

कॉपी...

कॉपी...

3 mins
522


लोकांची गर्दी जमली होती...

काय झालं कसं झाल कुणालाच माहीत नव्हत...

पोलिसांच्या गाडीचा आवाज येत होता...

नेमकी काय झालं कुणालाच कळत नव्हतं...

काहिदिवसांपूर्वी...

सीमा फोन वर बोलत...

अग नाही ग आता तर राहुलची परीक्षा सुरू होईल..

एकदाचे पेपर झाले की येऊ आम्ही सगळे तुझा कडे बरं चल ठेवते हा काम पडली आहेत...

अस बोलून सीमाने फोन ठेवला आणि राहुलच्या रूम मधे गेली... हातात दुधाचा ग्लास होता.

राहुल दूध पिऊन घे...मग अभ्यास कर बस...

ती राहुलला प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली...

ही ग आई...बस थोडाच वेळ घेतो मी दूध

पुस्तकात कडे च बघत तो आईला म्हणाला...

बरं तुझा उद्या पहिला पेपर आहे न...

घाबरु नको आणि टेन्शन घेऊ नको...

होईल सगळं नीट...अभ्यास कर हा...

चल येते मी...

येवढं बोलून सीमा राहुलच्या रूम मधून निघून गेली

राहुल अभ्यास करत बसला होता...

तसा राहुल खूप हुशार...जिद्दी जे ठरवलं ते करायचा त्याला 12 वी त 90 मार्क घ्यायचे होते...म्हणून तो जिद्दीने अभ्यास करत होता पुढे त्याला मोठा डॉक्टर व्हायचं होत...

दिवस असाच गेला...राहुल रात्रीचे 1वाजेपर्यंत अभ्यास करत होता...

तेवढ्यात सीमा तिथे आली

राहुल झोप की बाळ आता उद्या पेपर आहे न

थोडी झोपही महत्वाची आहे रे नाही तर पेपर वेळेला झोप येईल चल झोप बघू...

राहुल ने पुस्तक बाजूला ठेवलं आणि बेडवर जाऊन झोपला...सीमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला पांघरूण देऊन लाईट बंद केले आणि तीही झोपायला गेली...

सकाळ झाली...

राहुल ची तय्यारी झाली होती...

सीमाने त्याला नाश्ता दिला...सकाळचे दहा वाजत आले होते..राहुलने बाबांना पोहचून मागितल...

राहुल आणि राहुलच्या बाबा दोघेही परीक्षा केंद्राकडे निघाले...आणि पोहचले जवळच होत सेंटर...

गाडीवरून उतरून राहुल आत गेला...बाबांनी बेस्ट लक दिला आणि ते निघून गेले...

आत जाताच राहुलने रोल नंबर बघितला तेवढ्यात त्याचे मित्र पण तिथे पोहचले...सगळ्यांनी आपापले रोल नंबर बघून सगळे आत गेले 

पेपरची वेळ झाली होती...आज मराठीचाच पेपर होता

सगळे पेपर लिहिण्यात गुंग होते...

काही वेळात पेपर संपला..सगळे बाहेर आले 

आज मराठीचाच पेपर असल्यामुळे सगळ्यांचाच छान गेला होता...

पेपर सुटताच राहुल घरी आला...

घरी येताच बाबाने विचारल..

कसा गेला पेपर...छान गेला बाबा मराठीच होता ना!

बरं चल हात पाय धून घे आणि जेवून घे

ताट वाढते मी...सीमा राहुलला म्हणाली

राहुल हात पाय धून आला आणि जेवण करून पुन्हा अभ्यासाला लागला...

काही पेपर असेच गेले...इंग्लिश...बायोलॉजी...

केमिस्ट्री पेपर होता..राहुल सेंटर वर पोहचला पेपर सुरूही झाल...आणि नेमकी त्याच दिवशी धाड पडली...

राहुलचं अभ्यास झाला होता...तो पेपर लिहिण्यात गुंग होता.त्याच वेळेस राहुल जवळ एक कॉपी येऊन पडली मागून कुणी तरी फेकली होती

राहुलचं लक्ष नव्हत...आणि नेमके तेवढ्यात अधिकारी आत आले आणि त्यांना राहुल जवळ ती कॉपी दिसली...त्यांनी राहुलला उठवलं आणि त्याची झडती घेतली पण त्यांना एका कॉपी शिवाय काही सापडल नाही...त्यांनी राहुलचं पेपर घेतला आणि त्याला ऑफिसला बोलावलं...राहुल का काही कळत नव्हत की काय झालं ते...तो त्यांना विनंती करत होता पण कुणी त्याच ऐकायला तय्यार नव्हत...कारण तो रंगेहाथ सापडला होता...पण ती कॉपी त्याची नव्हती हे ही खर होत...पण ती कॉपी त्याची नाही हे कस सिद्ध होणार होत...

शेवटी राहुलला रस्टि केट करण्यात आले...

राहुल रडत होता...तो खूप घाबरला होता आता घरी जाऊन काय सांगायचं...आई बाबांना काय वाटेल याच विचारात तो होता शेवटी तो घराकडे निघाला...

पण त्याच्या डोक्यात आईचा बाबाचं त्याचा डॉक्टर होण्याचा विचार घुमत होता...काय करू काय नाय अस झाल होत..शेवटी तो घरी पोहचला गेटजवळ गेला आणि घरी कुणी नव्हत तर सोसायटीच्या टेरेस वर गेला आणि काहीही विचार न करता तिथून उडी मारली...

त्यामुळेच तिथे गर्दी जमली होती...त्यात एकाला राहुल आहे हे कळलं त्याने त्याच्या बाबांना फोन करून बोलावलं...तो पर्यंत त्याला हॉस्पिटल मधे नेण्यात आल...जेव्हा तो सुद्दिवर आला तेव्हा त्याच्या आई बाबांना हा प्रकार कळला...

त्या तून राहुल वाचला...पण त्याने अस करायला नको होत...चूक त्याची नव्हती...

पण आत्महत्ये चां विचार त्याने करायला नको होता...

बघा ना एक कागदाचा तुकडा आयुष्य बिघडवत...

म्हणून कॉपी करू नका...अभ्यास करा आणि यश मिळवा...


Rate this content
Log in