अक्षय काळमेघ

Others

3  

अक्षय काळमेघ

Others

कधी न संपणाऱ्या आठवणीं चा गंध

कधी न संपणाऱ्या आठवणीं चा गंध

2 mins
464


कधी न संपणाऱ्या आठवणींना गंध अजूनही...❣️


गोड आठवणी आठवल्या की कशी आपसूकच गालावर खळी खुलते....नाही का...?

तसचं काहीस त्याचही झालं होत. त्याने अल्बम हातात घेतला आणि तो बघत होता, एक एक फोटो अगदी निरखून पाहत होता आणि एकटाच हसत होता....

बालपणी आपण किती खोडकर होतो हे त्याला जाणवत होत...आणि फोटो बघताच तो त्याच्या आठवणीत जात होता...

       सहा वर्षाचा होता...नुकताच पाहिलीत गेला होता आणि शाळेचा पहिला दिवस म्हणून बाबाने ती आठवण कैद करून ठेवली होती...शेवटी लाडा चा एकुलता एक... तेवढ्यात त्याला त्याच्या सुखाची सावली दिसली...त्याचा बाप...आणि तो गहिवरला....कसा संकटात बाप हसत होता आणि त्याच्या सुखा साठी झटत होता हे त्याला त्या क्षणी जाणवलं...

आणि तसही बाप मुलात आपलं पुढचं आयुष्य शोधत असतो...मुलीलाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो...कारण तिलाही बापाची जास्त ओढ असते...

      पुढे पहिलं तर त्याला हातात ट्रॉफी घेतलेला फोटो दिसला...ते त्याला मिळालेलं पहिलं बक्षीस त्याच आनंदात बापाने खांद्यावर घेऊन तो फोटो काढला होता...त्यात ही बाप सुखाने हसत होता...त्याच क्षणी आई सुखाचे दोन घास भरवत होती...पदराने तोंड पुसत होती...मायेने गोंजारत होती

तिच्या प्रत्येक आठवणी त्याला आठवत होत्या...

रात्री तिच्या कुशीत जाऊन झोपल की ती गोंजारत होती केसातून हात फिरवत छान गोष्टी सांगत होती...तो क्षण आठवला की त्याला त्याचा हात आपसुकच त्याच्या केसात गेला आणि जाणवलं की हेही सुख हिरावल केव्हाच...पणं आठवणीत ती माय अजूनही होती...मित्रांच्या सहवासात घालवलेल ते बालपण गावात फिरणं,खेळणं सार काही आठवणीत जाऊन बसलं होत...

छोट्या गावातून , कुटुंबातून सुरू झालेला त्याचा प्रवास आज येवढ्या मोठ्या कंपनीचा मालक होण्यावर येऊन थांबला होता...

    तो एक एक फोटो बघत होता आणि सुखाने सार विसरून हसत होता...कित्येक दिवस धूळ खात पडल्या होत्या त्याच्या आठवणी आज त्याच आठवणींना पुसत तो त्यांना ताज्या करत होता...आणि त्याच गोड आठवणींशी तो छान जमवून घेत होता...पणं आता 

     सुखाने जगावं अस त्याचा कडे काहीच नव्हत...पैशाने विकत घेतलेल्या वस्तू....बस येवढच

पण पैशाने ही विकत घेऊ न शकणाऱ्या

उरल्या होत्या त्या फक्त आठवणी पणं जे आता जगताना मिळतं नव्हतं ते त्या अल्बममधील, त्या मनातील आठवणी त्याला देऊन जात होत्या...

कारण त्या आठवणींना आजही गंध होता...ज्यात तो आजही सुखावून जात होता...❣️



Rate this content
Log in