अक्षय काळमेघ

Tragedy

3.7  

अक्षय काळमेघ

Tragedy

वर्तुळ

वर्तुळ

14 mins
23.7K


निशा तशी दिसायला गोरी पान.. भुरके डोळे... काळे केस...सडपातळ अशी..नेहमी हसत असणारी... बिंदास्त मुलगी होती.तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये मॅनेजर होते...तशी निशा लाडाची तिच्या वडिलांनी तिला कशाची कमी पडू दिली नाही. पणं येवढं असूनही तिला जरा सुद्धा गर्व नव्हता.प्रेमाने सर्वांशी वागणारी होती निशा...

निशाच नुकतंच MBA झालं होतं...ती मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायच्या विचारात असतानाच. घरच्यांनी तिच्या लग्नाची पाहणी सुरू केली. पणं तिला लग्न करायचं नव्हत.आता घरच्यांपुढे काय बोलणार म्हणून तिने ते सांगितलं नाही.आणि लग्नाला होकार दिला.


तिथून दोन दिवसांनी... निशा साठी एक स्थळ आल. विवेक सावंत त्याच नाव...तोही MBA झालेला...पुण्याच्या कंपनीत नोकरीला होता. तसा गर्भ श्रीमंत होता वाडवडीलांची जमीन...गावात वाडा.. सयाजी सावंत पाटील विवेक चे वडील.थोड्या जुन्या विचारांचे होते. गावाची पाटीलकी करत असत..आणि तशी गावात त्यांची खूप इज्जत होती.लोक त्यांना खूप मानायचे.आणि पाटलांचा मुलगा म्हटल की कोण नकार देणार.म्हणून निशाच्या वडिलांनी म्हणजे नारायण साठे...यांनी लगेच पाहणीचा कार्यक्रम ठेवला.विवेक पण सुट्ट्या काढून आला होता.


पाहणीचा तो दिवस...पाहुणे आले आगत स्वागत झालं...कांदेपोहे झाले...आणि निशाला बोलावण्यात आलं.गुलाबी साडीत, डोक्यावर पदर घेत..खाली मान नजर झुकवून ती बैठकीत आली.आणि खुर्ची वर बसली. पहिले बसायला पाट ठेवत असत पण आता खुर्ची ची प्रथा आली..आणि आता तिला काही प्रश्न विचारण्यात आली...तुझ नाव काय? शिक्षण काय? हे असे प्रश्न...त्याची तिने उत्तम प्रकारे उत्तर दिले. आणि सयाजी राव म्हणाले... तुम्हाला विवेक ला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा...त्यावर निशा च्या वडिलांनी पणं विवेक ला प्रश्न विचारले....आणि झाला सगळ्यांना मुलगी आणि मुलगा पसंत आला...विवेक नेही होकार दिला...निशा चे तर तिचे बाबा म्हणेल तोच तिचा होकार होता. तस सयाजी पाटलांचा नाव होत तर जास्त काही पहायची गरज नव्हती...म्हणून लगेच साखरपुड्याची तारीख पक्की झाली आणि येत्या रविवारीच दोघांचा साखरपुडा उरकला. आणि एका महिन्या नंतर लग्नाची तारीख पण ठरवली...


घरात लगीन घाई सुरू झाली...आणि बघता बघता लग्नाचा दिवस आला...सनईच्या सुरात...मंगलाष्टक म्हणत...दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या.सात जन्माची वचने घेत.शुभ विवाह पार पडला....आणि नारायण राव म्हणजे निष्याच्या वडिलांची जबाबदारी पार पडली...त्यांनी हसत हसत सुखाचे अश्रूंनी आशीर्वाद देत तिची पाठवणी केली...लग्नाचे सगळे विधी पार पडले सगळे पाहुणे निघून गेले... निश्याचा सुखी संसार सुरू झाला...निशाला सगळच येत होत ती उत्तम स्वयंपाक करत होती...ती खुश होती तिला इतकं चांगलं सासर मिळालं होत..विवेक स्वभावाने खूप चांगला...आजच्या पिढीच्या विचारांचा... पणं त्याच्या वडिलांसामोरं त्याच काहीच चालत नव्हत...म्हणजे घरात सयाजी राव म्हणजे विवेक चे वडील जे म्हणेल तीच पूर्व दिशा अस होत...विवेक ची आई सुध्दा त्यांच्या समोर काही बोलत नव्हती.. पणं ती निशाचा खूप लाड करत होती..शेवटी एकुलती एक सून होती...


काही दिवस असे आनंदात गेले...पण खरं वादळ तर निशाच्या आयुष्यात आता येणार होत....निशाला त्याच्या जराही पत्ता नव्हता. विवेकच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या...त्याला आता पुण्याला जायचं होत...निशाला वाटलं आता आपणही विवेक सोबत पुण्याला जावं...तिथेच राहावं जमल तर जॉब पण करावा...अस तिच्या मनात चाललं होत...ते तिने विवेक कडे सांगितलं. विवेक म्हणाला अग वेडा बाई यात विचारण्या सारखं काय...आता मी जिथे...तिथे तू... चल आपली बॅग भरायला घे उद्या आपल्याला निघाव लागेल....अस बोलून तो बाबाला म्हणजे सयाजी रावांना विचारायला गेला...की निशाला पण तो सोबत घेऊन जाणार म्हणून... पणं पुढे ज्याची भीती होती तेच झालं...आणि विचारून तो परत आला...थोडा विचारात होता...निशाला कसं सांगावं त्याला कळत नव्हत...


पण त्याला तिला सगळं सांगावं लगणार होत.शेवटी त्याने तिला सांगितली की...निशा हे बघ मला तुला सोबत न्यायचं आहे पण आई बाबा म्हणतात की नवी नवरी आहे काही दिवस राहू दे की गावात म्हणून मग नंतर घेऊन जा...शेवटी पाटलांची सून आहे गावातल्या आया बाया येतील तिला बघायला काही पाहुणे मंडळी पण येईल तर राहू दे इकडे म्हणून....निशा तशी समजूतदार होती सासू सासरे म्हणताय तर तिने समजून घेतलं.आणि हसत म्हणाली काही हरकत नाही तुम्ही जा...चेहऱ्यावर जरी हसू होत पण मन मात्र नाराज झालंच...पण काय करणार आता लग्न झाल होत तर कोणतीही गोष्ट तिलाच समजून घ्यावी लागणार होती.आणि तसंही लग्न झालं की बाईचं आयुष्य बदलत हे मात्र खर आहे...लग्ना आधी सारखी जगण्याची..मुक्त विहरण्याची...सगळी मर्यादा संपते...चार भिंतीच्या चौकोनात तीच विश्व तयार होत....येवढं असूनही तिने बॅग मधले तिचे कपडे तीच सामान बाजूला काढून विवेक ची बॅग भरली...हव्या नको त्या गोष्टी त्याच सामान तिने त्याला विचारून बरोबर पॅक केलं...आणि तेवढ्यात आवाज आला...निशा इकडे...सासू बाईंची हाक ऐकू येताच ती तशीच धावत गेली...अग किती वेळ खोलीतच राहशील...किती कामे पडलीत ते कोण करणार... अग विवेक जाणार आहे त्याच्या साठी काही तरी बनवून ठेव...हे काय डोक्यावरचा पदर कुठे गेला...तू सासू सासाऱ्यांसमोर उभी आहे...आणि तू आता साठे ची मुलगी नाही पाटलांची सून आहे..आणि हे प्रत्येक वेळी तुला सांगावं च लागणार का...हे ऐकताच निशा जरा घाबरली आणि तिने लगेच डोक्यावर पदर घेतला...आणि नजर झुकवून उभी होती...ते तिच्या सासूला कळलं म्हणून त्यांनी तिला समजावत म्हटल की अस समजू नको मी तुला सासू म्हणून धाक दाखवते तस अजिबात नाही... पणं सुनेने कसं वागायचं काय करायचं...आपल्या काही रिती परंपरा आहे...त्या तुला पाळाव्याच लागणार...


हे सगळं निशा निमूट पणे ऐकत होती...शेवटी करणार ही काय नवी नवरी होती...ती काही बोलू ही शकत नव्हती..तिने होकारार्थी मान केली आणि स्वयंपाक घरात निघून गेली...आता खऱ्या अर्थाने तिला सासरी आल्याचे जाणवत होते...पण ते विसरून तिने विवेक साठी छान छान पदार्थ बनविले...आणि पटापट स्वयंपाक पण केला...रात्री जेवायची वेळ झाली...सगळे जेवायला बसलीत...निशा ने सगळ्यासाठी ताट वाढली...जेवण झाली.सगळे झोपायला गेली... निशाचे जेवण झालं आणि तिने सगळं आवरून..ती पणं झोपायला गेली.विवेक तिचीच वाट बघत होता.त्याला सकाळीच निघायचं होत.म्हणून दोन क्षण निशा शी बोलावं म्हणून तो जागा होता. विवेक ला जाग बघून निशा ने त्याला विचारल अहो तुम्हाला उद्या लवकर जायचं न मग असे जागे का...झोपा...त्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला...अग हो हो आधी बस तर...मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी जागा आहे... उद्या मी जाणार मग आपल्याला असा क्षण कुठे मिळणार. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या...गोष्टी गोष्टीत मगाशी झालेलं निशा ने विवेक ला सांगितलं...विवेक ने तिला समजून घेतलं... पणं शेवटी आईबाबाला काय म्हणणार...म्हणून त्याने निशाला समजावलं...की आईबाबा जुन्या रिती परंपरेला मानतात ग मला पणं पटत नाही पण मी तरी काय करू...तसे ते छान आहेत...तू जास्त विचार करू नकोस... बर चल झोप आता मीही झोपतो...हा येवढं बोलून विवेक शांत पने झोपला...


विवेक निशाचा आधार होता तो जीवापाड प्रेम करत होता.. पणं आईबाबांच्या ही बंधनात तो होताच न... पण निशाला कुठे झोप लागणार...तरी विचार करत करत कधी तिचा डोळा लागला तिलाही कळलं नाही...सकाळ झाली...निशा लवकरच उठली अंघोळ करून सगळ्यांना चहा नाश्ता दिला...विवेक तयार होऊन आला...त्याने ही नाश्ता केला.आणि निघायची तयारी केली. आईबाबा ना नमस्कार करून काळजी घ्या..आणि निशाला ही काळजी घे म्हणत बॅग उचलली आणि निघाला...निशा ही त्याच्या मागे मागे अंगणात येणार तेवढ्यात सासूबाईंनी तिला आवाज दिला..निशा थांब नवी नवरी आहेस अशी बाहेर नको निघुस उगाच नजर लागायची...हे ऐकुन तिने डोक्यावरचा पदर सावरत दुरूनच विवेक ला निरोप दिला...आणि मागे वळून तिच्या खोलीत जाऊन बसत नाही तर सासूबाईंनी सांगितलं की आज काही पाहुणे घरी येणार म्हणून काही छान नाश्ता बनव आणि छान तयार होऊन राहा...सासू बाईंचा आदेश सर आखो पे...असच तीच झाल होत.तिने लगेच नाश्ता तयार करून ठेवला आणि स्वतः छान तयार होऊन आली..लग्ना नंतर खूप दिवसांनी ती इतकी सजली होती..नाही तर साधी साडी कुंकू मंगळसूत्र इतकंच...


तेवढ्यात पाहुणे आले पाहुणे कसले गावातल्याच काही बाया आल्या होत्या...पाटलांची सून कशी आहे बघायला...त्या येताच नीशाच्या सासूबाईंनी त्यांना बसायला सांगितलं...तेवढ्यात निशा पाणी आणि त्याच बरोबर नाश्ता चहा घेऊन आली...सगळ्यांनी तेव्हाच निशाला बघितल आणि तिची तारीफ केली...सगळ्याचं नाश्ता वगैर झाला...निशा ही त्यांच्या जवळ येऊन बसली...आणि त्यांची निशाची विचार पूस सुरू झाली...काय मग निशा तू खुश तर आहेस...? हो मी खुश आहे निशा जरा हसतच म्हणाली...आणि हो आम्हाला समजल की तू खूप शिकली आहेस...? मग काय पुण्याला जाऊन नोकरी करायची की काय...?अशी एक अनेक प्रश्न विचारले त्यावर निशा काही बोलायच्या आत...तिच्या सासूने उत्तर दिलं...नोकरी ??? अजिबात नाही अहो आमच्याकडे सगळं आहे की त्यात पाटलाच्या सुनेने नोकरी करावी अशी रीत नाही... चूल आणि मूल एवढंच...आणि विवेक आहे की तो कमावतो की...आणि ह्यांना तर अजिबात आवडत नाही....हे ऐकुन निशा एकदम विचारात गेली...काही वेळ अश्या गप्पा झाल्या आणि सगळ्या निघून गेल्या...


काही दिवस असेच गेले...ती तिचे काम आणि तिची खोली यापलीकडे काहीच नाही...असच सुरू असताना एक दिवस गावातील काही माणसे सयाजी राव कडे आलीत...गावात काही तरी घडल होत...सयाजी राव पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सगळे त्यांचा सल्ला घ्यायला आली होती...त्यांच्या वाड्यावर सगळ्यांची बैठक जमली...निशा खिडकीतून हे सगळं बघत होती...शेती माला विषयी चर्चा सुरू होती.. काय करावं कुणाला कळतं नव्हत...निशाला ते पूर्ण समजल होत...तेवढ्यात डोक्यावरचा पदर सावरत ती दाराच्या आड उभी राहिली...आणि तिने उपाय सुचवला...तो सगळ्यांना पटला...आणि शेवटी निर्णय झाला...सगळे निघून गेले. सयाजी रावांनी निशाला बोलवले...आता आपण अस सगळ्यांसमोर बोललो म्हणून सयाजी राव आपल्यावर रागावणार असच निशाला वाटत होत पण... सयाजी रावांनी निशाला शाब्बासकी दिली...म्हणाले खऱ्या अर्थाने तू घरची लक्ष्मी आहेस तुझी मर्यादा जपून तू आज तू सगळ्यांना खूप मोठ्या संकटातून वाचवलं...हे ऐकुन निशा खूप खुश झाली..

रात्री तिने हे सगळं विवेक ला सांगितलं...तोही जाम खुश झाला... पणं हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता...ती वादळ येण्याची शांतता होती... निशाच आयुष्य बदलणार होत...त्या चार भिंतीच्या चौकोण मुक्त होऊन ती वर्तुळ तिला घेरणार होता....


निशा आज खूप आनंदी होती...त्यात तिला तिच्या माहेरची आठवण झाली... माहेराला काही दिवस जाऊन यावं असं तिला वाटतं होत.पण सासू बाई काय म्हणेल जाऊ देईल की नाही या विचारात ती होती...दिवस पूर्ण विचारत गेला. तिला राहवलं नाही...आणि तिने संध्याकाळी सासूबाई ला विचारलं...आई खूप दिवस झाले माहेराला जायचं म्हणते काही दिवस जाऊन येऊ का...? त्यावर सासू बाई म्हणल्या... अग विचारायचं काय...माहेराला चं जायचं ना..जा ये जाऊन...तुला ही बर वाटेल...खूप दिवस झाले कुठे गेली नाहीस...फक्त दोन दिवसात परत ये...म्हणून परवानगी दिली...


निशा ने पटकन काम आटोपली...स्वयंपाक जेवण झाली... आता तिला माहेरची ओढं लागली होती...कधी जाऊ कधी नाही अस झाल होत.

तिने खोलीत जाऊन बॅग भरायला घेतली. बॅग भरून होताच लगेच तिने विवेक ला कॉल केला. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या...बघता बघता रात्रीचे बारा वाजले होते . सकाळी लवकर उठाव लागेल म्हणून तिने कॉल ठेवला..आणि झोपली...


उशिरा झोपल्या मुळे सकाळी जरा उशीराच जाग आला. सकाळचे सात वाजले होते.निशा तशीच ताडकन उठली अंघोळ वगैरे करून स्वयंपाक घरात आली तिने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला आणि पटकन स्वयंपाक पण करून घेतला...आणि तशीच खोलीत जाऊन तयारी केली...आणि काही वेळात बाहेर आली. दोंघांच्या पाय पडली. पण ती एकटी येवढ्या दूर कशी जाईल कोणी सोबत असावं अस सासू बाईला वाटत होत..अग एकटी जाशील ना बरोबर...?त्यावर निशा म्हणाली आई हो जाईल...आणि निशा निघाली तिच्या प्रवासाला...


संध्याकाळचे सहा वाजले होते बस आज जरा उशीराच पोहचली होती.आणि तिने घरी सांगितलं नव्हत की ती येणार म्हणून कारण तिला सरप्राइज द्यायचं होत..बस पोहचली तशीच निशा उतरली आणि ऑटो पकडुन ती घरी आली. आणि दाराची बेल वाजवली...आईने दार उघडले. आणि निशाला अस दरात बघून ती खूप खुश झाली. आणि म्हणाली निशा तू अशी अचानक...काही खबर नाही काही नाही...ये आत ये....अग आई मला तुम्हाला सरप्राइज द्यायचं होत सो म्हणून मी काही सांगितलं नाही.तेवढ्यात निषाचे बाबा आले..आणि तिला पाहून...निशा बाळा...बाबाला पाहून निशा धावतच गेली आणि बाबाला मिठी मारली आणि म्हणाली बाबा कसे आहात...? कसा असणार मी मजेत...ते सोड आधी तू सांग कशी आहेस...सासरचे कसे आहेत...बाबा बाबा सगळं ठीक आहे आणि मी पण खूप खुश आहे...शेवटी तुम्ही निवडलं आहे माझ्या साठी...मग सगळं ठीकच असणार ना...बर आई मी खूप थकली तुझ्या हाताचा गरम गरम चहा देना...हो हो तू आधी हात पाय धुवून घे...मी चहा करते आई म्हणाली...


निशा फ्रेश होऊन आली तसाच तिचा फोन वाजला...आणि ती घाबरली आणि तिने फोन उचलला हॅलो बाबा...सयाजी रावांचा फोन होता...निशा पोहचली का बरोबर... जरा घाबरत...हो बाबा आताच पोहचली मी कॉल करणारच होते आणि तुमचा कॉल आला...बर ठीक आहे अग काळजी वाटत होती म्हणून ...माफ करा बाबा...अरे काही हरकत नाही ठीक आहे चल ठेवतो काळजी घे...हो बाबा तुम्ही पणं काळजी घ्या..येते मी परवा परत...म्हणून फोन ठेवला...तेवढ्यात आईने गरम गरम चहा आणला...चहा घेताच निशा म्हणाली...वाह मस्त झाला चहा...खूप दिवस झाले असा आयता चहा हातात मिळतोय...त्यावर आई म्हणाली अग तसचं असत बाई म्हटल की ते आलंच...बर सांग आज जेवायला काय बनवू...आई आज पालक पराठे तुझ्या हातची खूप मस्त होतात...खूप आठवण येते मला मी करून पणं बघितले पण तुझ्या सारखे नाही जमतं मला आणि हो तुझ्या जावयाला पणं खूप आवडतात पालक पराठे...कधी आला तर त्याला ही खाऊ घालशील...बर बर त्यात काय एकुलता एक जावई आहे लाड तर पुरवावे लागेल न...

हो हो जावयाचे लाड पुरवा आणि लेकीला विसरा...


निशा जरा नाराज होतच म्हणाली... अग वेडा बाई तुला का विसरणार...तू तर खूप लाडाची लेक माझी.. नीशाचे बाबा प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाले...

अश्याच गोष्टी सुरू होत्या तेवढ्यात आईचा स्वयंपाक सुध्दा झाला...निश्याच्या आईने ताट वाढली आणि सगळ्यांनी जेवण केले...आणि दोन दिवस असेच मस्त आनंदात गेले...निशाला आज परत जावं लागेल होते.जायची इच्छा नव्हती पण जावं लागत होत...तयारी केली तिच्या बाबाने तिला बस मधे बसून दिलं आणि संध्याकाळी ती पोहचली सयाजी राव तिला घ्यायला आले होते. आणि ते दोघेही घरी पोहचले. घरी येताच निशा फ्रेश होऊन कामाला लागली. पण आज निषाच मन कशात लागतं नव्हत.

तिला नुसती विवेक ची आठवण येत होती... आज अस अचानक का होत होत तिला कळत नव्हत. स्वयंपाक होताच तिने विवेक ला कॉल केला पण त्याला कॉल लागत नव्हता...तिला आणखी काळजी वाटत होती...पणं खूप प्रयत्ना नंतर त्याला कॉल लागला...पणं त्याने कॉल उचलला नाही...ती घाबरली आणि धावतच सासू बाई कडे गेली आणि तिने सांगितलं की आज तिला घाबरल्या सारखं होतंय...विवेक ची खूप आठवण येत आहे म्हणून...सासू बाईंनी तिला अस घाबरलेले पाहून...त्याही घाबरल्या पणं त्यांनी तिला सांभाळलं आणि समजावलं...तेवढ्यात सयाजी राव तिथे आले...त्यांनी निशाला बघितल तर त्यांनी ही तिला समजावलं की बाळा तू थकली असशील आजच प्रवास करून आलीस न म्हणून सासूबाई तिला खोलीत घेऊन गेल्या...आणि तिला आराम करायला सांगितलं.... पणं तिला काही झोप लागतं नव्हती...तिने पुन्हा विवेकला कॉल लावला...आणि तेव्हा त्याने कॉल उचलला. आणि तिने पटकन कसा आहेस म्हणून विचारलं...आणि कॉल का उचलत नाही कुठे गेला होतास..किती घाबरले मी...का असा करतो तू जरा रडतच ती विवेक ला बोलत होती..


अग अग मला बोलू तर दे...अरे ऑफिस च काम होत मीटिंग मधे होतो आणि फोन स्विच ऑफ होता...सो नाही उचलू शकलो...आधी तू रडणं बंद कर...मी ठीक आहे ...तेव्हा कुठे तिला बर वाटल... आज खूप थकलो निशा मी तुला नंतर कॉल करतो...म्हणून त्याने फोन ठेवला...रात्री अशीच आठवणीत गेली.

आणि सकाळी सासूबाई नी एकदम आवाज केला...निशा इकडे ये...हे बघ काय झालं...लवकर ये...


निशा तशीच धावत गेली...बघते तर काय सासू बाई रडत होत्या...आणि सयाजी रावांना उठवत होत्या...पणं सयाजी राव बेशुध्द झाले होते...निशा त्यांच्या जवळ गेली तिनेही सयाजी रावांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काहीच हालचाल करत नव्हते...निशा तशीच धावत आली आणि रूम मधे जाऊन बाहेर काम करणाऱ्या गडी माणसांना आवाज दिला आणि त्यांना लगेच हॉस्पिटल मधे भरती केलं...हॉस्पिटल मधे आल्यावर...निशा ने विवेक ला फोन लावला..पणं तो आज सुध्दा फोन उचलत नव्हता...सासू बाई खूप घाबरल्या होत्या तशी निशाला ही काळजी वाटत होती पणं तिला सासू बाईला सावरायचं होत...त्यांना धीर द्यायचा होता...तिने फोन ठेवला आणि सासू बाई कडे गेली...त्यांना धीर देत म्हणाली आई काळजी करू नका होईल सगळं ठीक...बाबा लवकर बरे होतील..तुम्ही रडू नका बर..


तेवढ्यात डॉक्टर बाहेर आलेत आणि निशा ने त्यांना विचारल...तर डॉक्टर म्हणाले की त्यांच्या उजव्या साइडला हात आणि पायावरून अर्धांग वायू म्हणजेच परालाईज गेला...ते बोलू शकतात पण हात आणि पाय हलवू शकत नाही...हे ऐकताच दोघींना ही धक्का बसला...पणं निशा ने स्वतः ला सावरलं...आणि दोघी त्यांना भेटायला आत गेल्या... सयाजी राव हळू हळू बोलू शकत होते...पणं सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी बोलायला सांगितलं नव्हत. दोघींनी त्यांना बघितल...आणि बाहेर आल्या... इकडे हॉस्पिटल मध्ये गावातल्या लोकांची गर्दी झाली होती...लोक सयाजी रावांना भेटायला येत होती...निशाणे तिच्या बाबांना फोन लावला आणि सगळ सांगितलं...विवेक तिथे नव्हता निशाला आधार हवा म्हणून निशा ची आई आणि बाबा लगेच निघाले....इकडे निशा विवेक ला फोन लावत होती...पणं त्याचा मोबाईल बंद येत होता...निशाला आणखी काळजी वाटतं होती...


रात्र होत आली होती...तेवढ्यात निशा चे आईबाबा तिथे पोहचले...आईबाबा ला बघताच निशा आईला बिलगली आणि रडत होती आईने तिला सावरलं आणि धीर देत त्या सासू बाई कडे आल्यात त्यांना ही धीर देत आम्ही आहोत काळजी करु नका...सयाजी राव होईल लवकर बरे...आई अग सकाळ पासून काही खाल्ल नाही त्यांनी...मी घरी जाऊन काही बनवून आणते...म्हणून निशा घरी गेली...अस अचानक काय झालं...याच विचारात ती होती आणि विवेक लाही फोन लागत नव्हता...तिला आणखी काळजी वाटायला लागली...इकडे निशा चे बाबा सयाजी रावांना भेटायला आत गेले...सयाजी रावांची तब्बेत तशी क्रिटिकल नव्हती....ते आता जरा थोडे स्पष्ट बोलत होते...निशा चे बाबा त्यांच्या जवळ येताच सयाजी रावांच्या डोळ्यातून पाणी येत होत...आणि ते काही तरी सांगत होते... नेमक काय ते ऐकू येतं नव्हत...तर निषाच्या बाबांनी कान थोडा जवळ नेला आणि सयाजी राव त्यांना म्हणाले...हे ऐकताच निशा च्या बाबाच्या पायाखालची जमीन सरकली...त्यांना एकदम धक्काच बसला...नेमकं अस काय झालं होत ते आता दोघांना च माहीत होत...आणि निशा च्या बाबांनी तुम्ही काळजी करू नका...मी जातो म्हणून त्यांना धीर दिला आणि बाहेर येऊन निशा च्या आईला निशा ची आणि सगळ्यांची काळजी घ्या म्हणून घाईघाईत तसेच निघाले...तेवढ्यात निशा जेवण घेऊन आली...आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि मी थांबते अस सांगून आईला व सासूबाई ला निशाणे आराम करायला घरी पाठवलं...आणि ती सयाजी रावांच्याबाजूला येऊन बसली...निशाला पाहून सयाजी रावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...निशा ते बघताच म्हणाली बाबा काळजी करू नका तुम्ही लवकर बरे व्हाल मी आहे न आणि साडीच्या पदराने त्यांचे अश्रू पुसत होती...रात्र अशीच गेली....

आणि सकाळी...निशा चे बाबा गाडी घेऊन घरी आले... आता नीशाच आयुष्य बदलणार होत....


निशा चे बाबा गाडी वरून खाली उतरले तोच एक पांढऱ्या रंगाची गाडी वाड्यासामोर येऊन थांबली...आणि त्यातून दोन माणसे स्ट्रेचर घेऊन खाली उतरली आणि वाड्याच्या आत तो स्ट्रेचर ठेऊन निघून गेली...गाडीचा आवाज ऐकुन निशाची आई आणि सासू दोघी बाहेर आल्या...आणि बघते तर काय स्ट्रेचर कडे पाहताच त्यांना धक्का बसला...आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला...सासू बाई जोरजोरात रडू लागल्या... निशाच्या आई ने त्यांना सावरलं...इकडे निशा सयाजी रावांजवळ बसली होती. त्यांनी तिला घरी जा म्हणून सांगितलं..तिला जाताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले नाही...निशा घरी येताच वाड्या जवळ गर्दी जमली होती काय झालं तिला कळेना ती तशीच धावत आत आली...आणि सासूबाई ना रडताना पाहून तिने बाबाला विचारल काय झालं आणि हे कोण आहेत...निशा च्याबाबाने तिला सावरलं आणि त्या स्ट्रेचर वरचा कापड काढला आणि निशाला धक्का बसला..ती एकदम चूप झाली आणि फक्त पाहत होती...तिच्या बाबाने तिला सावरलं...धीर देत त्यांना ही रडणं आवरलं नाही..तेही रडू लागले...ती एकदम शांत होती तिचा आधार तीच आभाळ कोसळलं होत...आणि त्याच क्षणी तिने एकच आवाज केला...


तो क्षण आठवाताच निशा चे डोळे ओले झाले... आज विवेक ला अपघातात जाऊन दहा वर्ष झाली होती...हीच बातमी ऐकुन सयाजी रावांना पॅरालाईज होऊन ते भरती होते...आणि विवेक गेल्याची बातमी त्यांनी निशा च्या बाबाला सांगितली होती..

       

निशा च आयुष्य बदललं होत.वाड्याची सून आज वाड्याची मालकीण झाली होती..परंपरेच्या विळख्यातून निशा केव्हाच बाहेर आली होती.पणं डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर तिने येऊ दिला नाही. आज ती गावातील लोकांची व्यथा जाणून घेऊन त्यांची प्रश्न सोडवत होती.सयाजी रावांची जागा आता तिला मिळाली होती पणं तिने त्यांची जागा कधीच घेतली नाही सयाजी रावांच स्वप्न तिला पूर्ण करायचं होत म्हणून तिने पाटलांची सून म्हणून ती जागा घेतली होती. कधी कुणी वाड्यावर आल तर ती त्याला खाली हात जाऊ देत नव्हती... आज जरी ती येवढ्या मोठ्या प्रॉपर्टी ची मालकीण होती पणं तरी ती एकटी होती.....आज पर्यंत तिने प्रत्येक वादळाचा सामना केला होता. ती खूप कणखर झाली होती.पणं निशा आजही आठवणींच्या विळख्यात बंदिस्त होती..होत नव्हत सार घेऊन गेलेली वेळ प्रत्येक क्षणी तिला आठवत होती..आणि पापण्या ओल्या करून जात होती...त्या चार भिंतीच्या चौकोन आता वर्तुळ झाला होता...आणि ती त्या वर्तुळाचा बिंदू...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy