तो एक दिवस
तो एक दिवस


आमच्या मैत्रीचे दिवस आठवतात.कारण मैत्रीचा प्रत्येक क्षण आठवणीत राहतो .ते दिवस आठवणींचे...जेव्हा मी इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला होतो.रेहान,वैभव,समीर,सरिता,आरोही,किरण,अंजली आणि मी...राहुल...असा आमचा आठ जणांचा गृप होता.तसे आम्ही पहिल्या वर्षापासूनचे मित्र-मैत्रीण...आमच्या मैत्रीचे किस्से तर पूर्ण कॉलेजमध्ये माहित होते.आमच अस होत एक रूसल की सगळे रूसायचे.एक हसल की सगळेच हसायचे...आणि फक्त मस्ती,धमाल चालायची.पण परिक्षा जवळ आली की अभ्यास पण करायचो.या धमाल मस्ती मध्ये शेवटच वर्ष कस आलं कळलच नाही.नुकतेच पेपर संपले होते.काही दिवसांसाठी कॉलेजला सुट्या होत्या.मग काय करायच घरी जाऊन कंटाळा येतो म्हणून सर्वांनी कुठे तरी फिरायला जायचं ठरवलं.पण मुलींनी होकार दिला नाही. कारण घरचे परवानगी देणार नव्हते हे त्यांना माहित होतं.सगळे विचारात पडले.पण मग आम्ही घरच्यांना न सांगता जाण्याचे ठरवले.सर्वांनी मिळून एक दिवस ठरवला.गाडीचा प्रश्न नव्हता कारण रेहान जवळ त्याची स्वतःची कार होती.तसा तो श्रीमंत होता.पण अंजलीची इच्छा नव्हती.तिला भीती वाटत होती. मग आम्हीच तिला समजावलं. तेव्हा कुठे तिने होकार दिला. मग काय ...तो दिवस आला...सकाळचे सात वाजले होते. आम्ही सगळे जमलो. गाडीत बसून निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला. त्याच बरोबर धमाल मस्ती पण. गाडीत बसूनच अंताक्षरी...नाही तर रस्त्याने एखादा स्पॉट मिळाला की उतरून सेल्फी काढणे...अशी धमाल सुरू होती.
दुपारचा एक वाजला होता.आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो. काय नजारा होता तो...पाहता क्षणी प्रेमात पडावे.हिरवीगार झाडी...पांढरा शुभ्र वाहणारा धबधबा...वा-यासोबत वाहणारे शहारे...मन अगदी प्रसन्न झाले.सगळ्यांना भुक लागली होती म्हणून आम्ही पहिल्यांदा जेवण केलं.जेवणानंतर त्या हिरव्यागार वातावरणात आम्ही रमून गेलो. आम्ही त्या धबधब्या जवळ गेलो जवळ जाताच एकदम थंडगार धुके अंगावर येत होते.त्यात समीरचा पाय घसरून तो पाण्यात पडला.मग काय वैभवने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हात दिला तर समीरने त्याला पण पाण्यात ओढले. अशाप्रकारे आम्ही सगळेच ओले झालो.काही वेळ पाण्यात राहल्यावर आम्ही बाहेर निघालो. ओले कपडे उन्हात उभे राहून वाळवले आणि बसलो गप्पा सांगत.काही वेळानंतर...आम्ही तेथून जवळच एका मंदिरात गेलो.मंदिर तस पुरातन काळातील होतं.आम्ही तिथे दर्शन घेतले आणि परत जाण्यास निघालो. सगळ्यांना वाटत होत की इथेच राहाव पण घरी लवकर जायच होत आणि त्यात खोटं बोलून आलो होतो.आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.जरा रात्र झाली होती.अंधार होता.आम्ही गाडीत पण गप्पा करत बसलो होतो.थोडी मस्ती पण सुरू होती.रेहान गाडी चालवत होता.लवकर घरी पोहचायच होत म्हणून गाडी स्पीड मधे होती.आणि त्याच एका क्षणात होत्याच नव्हतं झाल...रेहानच गाडीवरच नियंत्रण सुटल आणि गाडी जोरात झाडावर जाऊन आदळली.त्याच क्षणी मी बाहेर फेकल्या गेलो. त्यावेळी रस्त्यावर कोणी नसेल म्हणून मदत करायला कोणी आल नाही.रातकिड्यांचा आवाज...सगळीकडे अंधार होता.मला जरा शुद् होती.मी कसा तरी रस्त्याच्या कडेला आलो आणि मदत मागितली...एका गाडीवाल्याने माझी मदत केली.काही वेळात आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.मी फेकल्या गेल्यामुळे मला जास्त लागलेल नव्हतं पण मला बाकीच्याची काळजी वाटत होती. त्यांना बघायच होतं मी नर्सला विचारलं पण तिने काहीच सांगितलं नाही.तेव्हा मीच उठून बाहेर आलो आणि डॉक्टरांना विचारलं...तेवढयात आमचे आईबाबा तिथे आले.मी तिथे रडत होतो. आईने मला सांभाळलं. बाबांनी डॉक्टरांना विचारलं...डॉक्टरांनी सांगितले की आम्ही रेहान आणि समीरला नाही वाचवू शकलो.आणि हो अंजलीच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती अजून शुद्धीवर आली नाही. हे ऐकून मला धक्का बसला. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.काय कराव काय नाही समजत नव्हत. मी मोठ मोठ्याने रडत होतो. जुन्या आठवणी आठवत होत्या. काही वेळानी वैभव, सरिता, आरोही किरणला मी भेटायला गेलो.त्यांना समीर, रेहान बद्दल काही माहिती नव्हतं. ते मला विचारू लागले. पण मी पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होतो. त्यांनी मला पुन्हा विचारलं...तेव्हा मी सांगितलं की ते आपल्याला सोडून गेलेत. त्यांना ही धक्का बसला. ते ही रडू लागले...काही दिवसांनी आम्ही बरे झालो.पण अंजली अजून बरी झाली नव्हती.त्या दिवशी कॉलेज पण शांत होतं. वाटत होत तो पण रडतोय. त्यालाही त्यांची कमी भासत आहे....तो एक दिवस आमच्या पासून सर्व काही हिरावून घेऊन गेला. आज दोन महिने झाले त्यांना जाऊन.अस वाटतय तो क्षण आयुष्यात आलाच नसताच तर...