अक्षय काळमेघ

Tragedy Inspirational Others

3.7  

अक्षय काळमेघ

Tragedy Inspirational Others

तिच्या सुखासाठी...

तिच्या सुखासाठी...

2 mins
210


गुलाबी गारव्याला कवटाळून मिठी मारत, ही पहाट आता जागी झाली होती. धुक्यात सारा नजारा हरवला होता. तेव्हा अनघा हलकीशी जागी झाली. तेवढ्यात आईने रेडिओ सुरू केला.

आणि....


केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे हरवून रात गेली....


गाण्याचे बोल कानी पडले... आणि त्याच गोड आवाजात तिची सकाळ झाली. काही वेळात ती ओल्या केसांत टॉवेल गुंडाळून किचनमधे आली. आईने चहा ठेवलाच होता. अनघाने तो कपात ओतून दोघीही छान रेडिओ ऐकत चहाची मज्जा घेत होत्या.


तसंही गार प्रहरी बेधुंद गाण्याच्या लहरी कानी येत चहाचा घोट घेत निवांत बसणं किती सुख देतं... नाही का... तेच सुख त्या दोघी अनुभवत होत्या...


बघता बघता अर्धा एक तास निघून गेला अनघा उठली आणि स्वयंपाकाला लागली... तिने पटकन सगळं आवरलं आणि तयारी करून ऑफिसला निघाली... पण त्याआधी तिने आईला नाश्ता दिला होता... आणि जेवण करून घे म्हणून निघाली...


तशाही त्या दोघीच होत्या एकमेकींसाठी... हे रोजचंच होतं... अनघाला आईची आणि आईला अनघाची काळजी. 


आज रविवार होता आई घरात राहून कंटाळली असेल म्हणून अनघा तिला घेऊन बाहेर गेली...

आणि एका शॉपमधे आल्या. हवं नको ती 

अनघा आणि आईने छान शॉपिंग केली आणि घरी निघाल्या तेवढ्यात अनघा म्हणून कोणी तरी हाक मारली... अनघा तशीच मागे वळली तर अनघा एकदम म्हणाली, रेश्मा तू.... खूप दिवसांनी भेटत आहेस...


अग चार दिवस झाले मला इकडे यायला... आणि हो माफ कर मला कालच माहीत पडलं आशिष बद्दल... तो कार अपघातात गेल्याचं...


हे ऐकताच अनघाला गहिवरून आलं पणं तिने स्वतःला सावरलं... तेवढ्यात काही बोलायच्या आत रेश्माला कॉल आला आणि ती निघून गेली पण आई आणि अनघाच्या मनात पुन्हा तेच तेच येत होतं...


शेवटी अनघाला गहिवरून आलंच.।. तेव्हा आईने तिला सावरलं...

 

रडत रडतच अनघा आईला म्हणाली की, आई का सोडून गेला आशिष आपल्याला... आणि जाताना फक्त आठवणी देऊन गेला... असं नको व्हायला होतं आई...


शेवटी आईने तिला समजावलं, अग वेडा बाई का अशी त्रास करून घेतेस स्वतःला... अगं मी त्याची आई मला पण खूप दुःख झाले त्याच्या जाण्याने पण मी सावरते आहे स्वतःला तुझ्यासाठी...

म्हणून तुला म्हणतेय की नको करू माझी काळजी जा पुन्हा लग्न कर नव्याने संसार थाट... सुखी राहा... अगं असं माझ्यासाठी किती दिवस एकटी राहशील मी तुझ्या मनातली घालमेल समजू शकते...

  

हे ऐकून अनघा आईला म्हणाली, नाही आई आज जीवंत आहे ते मी तुमच्यासाठी कारण असं त्याच्याशी माझं नातं जुळलं आहे तसं तुमच्याशी पण आहेच...मग का मी दुसरं लग्न करू 

आणि खरंच मी एकटी आहे का तुम्ही आहे की...

जरी सासू असल्या तरी आईची माया प्रेम करायला... आणि सोबत आशिष आहे की तो नसला म्हणून काय झालं...तो आहे आपल्या आठवणीत...


हे ऐकून आईने म्हणजेच अनघाच्या सासूने तिचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, आता रडायचं नाही. मी आहे म्हणून हसत जगायचं...


आणि आई यापुढे दुसऱ्या लग्नाचा मी विचारही करू शकत नाही कारण तुम्हीच म्हणता ना की दुसऱ्याच्या सुखात सुख शोधलं पाहिजे आणि मी तेच करत आहे... असं म्हणत दोघीही थोड्या हसल्या...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy