अक्षय काळमेघ

Inspirational

3  

अक्षय काळमेघ

Inspirational

दोन पक्षी...

दोन पक्षी...

2 mins
233


गाड्यांचा आवाज आला तोच सुगंधा म्हणाली अहो मुल आली वाटते....अस म्हणत असतानाच बेल वाजली तोच सुगंधाने दार उघडलं. आणि तिची दोन मुलं, सुना, नातवंडं आत आली आणि निवांत बसली.त्यांना बघून सुगंधा खूप खुश झाली होती...किती तरी दिवसांनी घर भरल्या सारखं वाटतं होत...ती स्वयंपाक घरात गेली आणि चहा घेऊन आली...सगळ्यांनी गप्पा मारत चहा घेतला आणि तोच "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई बाबा" म्हणत शुभेच्छा दिल्या...

       

आज सुगंधा आणि निशिकांतचा लग्नाचा पस्तीसाव्वा वाढदिवस होता. रात्री मुलांनी छान सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. संध्याकाळ झाली... सगळी तयारी झाली होती तोच सुगंधा आणि निशिकांत छान तयार होऊन बाहेर आले....आणि समोर ठेवलेला केक कापत सगळ्यांनी शुभेच्छा देत लग्नाचा वाढदिवस साजरा केला....आज सुगंधा निशिकांत दोघेही खुश होते मुलांना आनंदी बघून त्यांच्या ही सुखाला पारावर उरला नाही...तोच सुगंधाने छान स्वयंपाक बनवला होता सगळ्यांनी मिळून सोबत जेवण केलं आणि स्वयंपाक छान झाला म्हणून सुगंधा च कौतुक ही केलं...काही वेळ गप्पा करत मुल म्हणाली आई बाबा येतो आम्ही उद्या ऑफिस पणं आहे लवकर उठाव लागेल...येऊ नंतर कधी निवांत आम्ही...त्यावर सुगंधा म्हणाली अरे इतक्या रात्री कशाला जाता थांबा आज रात्रभर उद्या सकाळीच चहा घेतला की निघा....पणं मुलांनी तीच एक ऐकलं नाही आणि येतो म्हणत निघून गेली....सुगंधा आणि निशिकांत ने भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला....आणि मागे वळले त्याच क्षणी त्यांना तो सुखाने भरलेला नजारा आठवला किती तरी दिवसांनी हे घर अस दणाणून गेले होत....


     सुगंधाने घर आवरलं...आणि म्हणाली "मी काय म्हणते काय गरज होती मुलांना हे सगळं करायची आता काय आपल वय राहील का लग्नाचा वाढदिवस साजरा करायची"...त्यावर निशिकांत म्हणाला "म्हणजे मग आपण आनंद साजरा करायचा नाही होय अग वय वाढत जात पणं मन मात्र तसचं तरुण राहत बघ..आणि एक सांग तू नेहमी याच दिवसाची तर वाट बघते की या चिमणा चिमणी च्या घरट्यात पिलांनी यावं काही क्षण राहावं आणि पुन्हा भूर् उडून जाव."


  हे ऐकून सुगंधा भरलेल्या डोळ्यांनी निशिकांतला म्हणते की "तसं म्हटलं तरी चालेल पण खर सांगू मला या दिवसाची ओढ त्या क्षणभर सुखासाठी असते... आणि त्याच सुखासाठी जीव तरसतो. नाहीतर बाकी काय ह्या चार भिंतीचा चौकोन तर आपल्याशी रोज बोलत असतो"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational