अक्षय काळमेघ

Others

3  

अक्षय काळमेघ

Others

स्वप्नांपलिकडे....

स्वप्नांपलिकडे....

2 mins
253


सकाळची वेळ होती. पल्लवीची कामाची लगभग सुरू होती. समीरला हॉस्पिटलमध्ये जायाला उशीर होईल म्हणून तीने लवकर नाश्ता तयार केला.तेवढयात समीर अंघोळ करून बाहेर आला.तीने समीरला नाश्ता दिला आणि गरम चहा पण दिला.नाश्ता करत असतानाच त्याला कॉल आला आणि तो तसाच पल्लवीला सांगून हॉस्पिटलमध्ये निघून गेला. तेवढयात नेहा पण उठली.पल्लवीने तिला नाश्ता दिला.आज तसा रविवार होता म्हणून नाश्ता संपताच नेहा ने तिला गार्डन मध्ये खेळायला जायचयं असा हट्ट केला. पल्लवीची कामे पण संपली होती.तेव्हा ती तिला घेऊन फिरायला गेली.जवळच एका गार्डन मध्ये त्या दोघी गेल्या.नेहा खेळत होती आणि पल्लवी एका ठिकाणी बसून तिच्या कडे बघत होती.तेवढयात मागून कोणीतरी तिला पल्लवी म्हणून हाक मारली.तिने मागे वळून बघितले.तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच होत नव्हता.


ती हसतच म्हणाली...अंजली तू..! किती दिवसांनी भेटतोय आपण...कुठे गायब होतीस.आणि आज अचानक इथे कशी?...त्यावर अंजली म्हणाली...की मी इथे येत असते माझ्या मुलीला घेऊन... तू सांग तू कशी काय इथे...? त्यावर पल्लवी म्हणाली...काय नाही ...मी पण माझ्या मुलीला घेऊन आली.... ती बघ ती खेळत आहे...ती नेहाकडे बोट दाखवत म्हणाली...येवढ बोलून पल्लवी थांबली आणि पुन्हा म्हणाली...तू सांग...तुझ्या आयुष्यात काय चाललय...?.बस चाललय माझ आयुष्य... नवरा, मी माझा जॉब आणि संसार...त्यावर पल्लवी म्हणाली...माझ पण तुझ्या सारखच...एक मुलगी...नवरा डॉक्टर...फक्त मी हाऊसवाईफ...त्यावर आश्चर्याने अंजलीने विचारलं...हाऊसवाईफ?..का गं...तुला तर जॉब करायचा होता न ?...हो ग...जॉब करायचा होता ...घरच्यांचा कोणाचा ही विरोध नव्हता...पण माझ्या मुली साठी मी जॉब सोडला...कारण त्यावेळेस मला ती हवी होती...तुला सांगते जेव्हा मी गरोदर होते...तेव्हा जॉबला जायाच्या घाईत मी पाय घसरून पडले होते...त्यावेळी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने माझ्या नेहाचे प्राण वाचले जर त्यावेळी तिचे प्राण वाचले नसते तर आज मी आई होऊच शकली नसती आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की मी जॉब सोडून नेहाचा खूप छान सांभाळ करेल...तिचे प्रत्येक स्वप्न पुर्ण करेल...कारण...जेव्हा ती पोटात होती तेव्हा मी तिच्यासाठीच माझे स्वप्न पुर्ण करत होती. पण माझ्या एका चुकीमुळे तिच्या पुर्ण आयुष्याची स्वप्ने संपणार होती...तिने मला नवीन जन्म दिलाय...हे मला कळलच नाही ...हे सांगत असताना पल्लवीचे डोळे पाणावले होते.


अंजलीने तिला समजावल...आणि म्हणाली...पल्लवी मी पण एक आई होणार आहे पण तू मला आज आई होण्याचा खरा अर्थ सांगितला...कारण तू जो त्याग केलाय ना ती एक आईच करू शकते.अंजलीला घरी जायच होत ती निघून गेली...पण पल्लवी स्वतःला नेहात शोधत होती...तिला हसताना पाहून ती पण हसत होती...तेवढ्यात नेहाने धावत येऊन तिला मिठी मारली..पल्लवीला जरी स्वतःच जॉबच स्वप्न पुर्ण करू नाही शकली पण नेहाच्या स्वप्नात ती आनंदी होती....ती तिच्या स्वप्नांच्या अलीकडे राहिली...पण नेहाच्या स्वप्नांसोबत तिला स्वप्नांपलीकडे जायच होतं...


Rate this content
Log in