Shobha Sanjay Bavdhankar

Comedy

3.3  

Shobha Sanjay Bavdhankar

Comedy

गंमत बालवाडीची

गंमत बालवाडीची

2 mins
599


कोवळं निरागस बालपण. किती रम्य.

बालपणी बालवाडीत जाऊन आयुष्यात शिक्षणाचा कळस गाठायचा.

मजबूत, कणखर पाया बालवाडीचा. लहानपणी हे उमजत नसतं.


शाळेत जायचे म्हटले की भोकाड पसरायचे. मग बाबा प्रेमाने कडेवर घेतात,

आजी बटव्यातील एखादी लिमलेटची गोळी द्यायची. आईने पाठीवर रट्टा दिला.

दादाने जवळजवळ फरपटतच शाळेचे फाटक गाठले. रडतरडत टाटा केला.

नाक गळत होतं. फ्रॉकच्या टोकाने ते कसबसं पुसले.

समोर बघते तर काय? जाड भिंगाचा चश्मा लावलेले मास्तर, हातात छडी,

डोळे वटारलेले दिसले. मग तर अजुन मोठं भोकाड पसरले.

माझं हे रडकं रुप बघुन मास्तरांनी छडी बाजुला ठेवली. कडेवर उचलुन घेऊन पापा घेतला.

डोळे मिचकावत मला विचारले काय गं आईने डब्यात काय खाऊ दिला?

हुंदके देत बोबड्या बोलाने लालू दिला हे सांगितलं. माझे बोल ऐकून ते मिशीतच हसले.

ते स्मित अजून विसरता येत नाही.


बडबडगीत शिकवायला मास्तरांचा उत्साह ओसंडत होता.

"पक्षी चिमुकले निळे जांभळे"

हे म्हणताना मुलं मात्र टाळ्या वाजवून "पक्षीच मुतरे - - - -" असं दंगा करत म्हणत होते.

कानावर हात ठेऊन मास्तर खो खो हसत होते. तेव्हा त्यांच्या हसण्याचा अर्थ कळला नाही.

आज मात्र किती वर्षांनी तो अर्थ गवसला. खो खो हसू मला येते. मास्तरांच्या आणि

माझ्या हसण्याचा आवाज आजही कानात घुमतो. तेच निरागस हसू !


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy