लोककाव्य .... अविट शिकवण
लोककाव्य .... अविट शिकवण
लोककला हे लोक आता विसरत चालले. तरी जुन्या पिढीतले लोक लोककला जिवंत रहावी म्हणुन प्रयत्न करत आहेत. टिव्हीवर जय जय महाराष्ट्र माझा - भारतीय संस्कृती इत्यादी कार्यक्रम दाखवले जातात.
ही कला पुरातन आहे, पण भाषेतला गोडवा वाखाणण्याजोगा आहे.
खंडोबाच्या नावांने चांगभलं असं म्हंटले जाते, पण खरा तो शब्द चांगलं भलं असा आहे. जयजयकार करतांना तो चांगभलं असा होतो. तसेच श्रीकृष्णाला किस्ना म्हंटले जाते. संसारात राहुन प्रत्येक गोष्टीचा किस नका काढू, म्हणुन किस्ना. पुर्वी चिपळ्या, टाळ, मृदुंग हे घेऊन देवाच्या नावाचा जयघोष व्हायचा. हातात टाळ चिपळ्या
घेउन बरोबर पायाचा ठेका धरुन भजन रंगायचे. वातावरण भक्तीमय व्हायचे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं आपण जरी हातात टाळ घेउन म्हंटले तरी अनुभव सुखद येतो.
एडका हा शब्द मेंढ्यातील नराला उद्देशुन आहे. पण नाथांनी हा शब्द येडका असा
योजिला आहे. संसारसुखातुन बाहेर ये, भक्तीमार्गाला लाग म्हणुन "येड का?"
गवळण पण मनाला आनंद देणारी. त्याने मारला खडा, फोडीला घडा या ओळीत पाण्याने भिजलेली, कावरीबावरी झालेली गवळण आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते. लोककलेमध्ये पुर्वी तमाशाचा फड असायचा. शृंगारिक लावणी असायची. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन लावणीतुन करायचे. जमलेल्या प्रेक्षकांना ते आवडायचे,
म्हणुन ते फेटे, टोप्या उडवायचे. लोककला ही खतपाणी घालुन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांचे वंशज करत आहेत. जुनी कला असली तरी त्यात नव्याने रंग भरला जात आहे हे खरंच खुप सुंदर व कौतुकास्पद आहे.