Sujit Falke

Inspirational

3.9  

Sujit Falke

Inspirational

गडकिल्ले आमचे युगपुरुष

गडकिल्ले आमचे युगपुरुष

2 mins
229


इतिहासालाही ज्यांचा हेवा वाटावा , कली काळाच्या छाताडावर पाय रोउन जे धीरोदात्तपणे आपल्या धन्याची कीर्ती जगाला दाखवतात, ज्यानी पाहिला शौर्याचा काळ, मावळ्यांचा रांगडा बाज, कातालावरील रक्ताचे पाट , एका एका चिरेतील घामाचा वास, शुरवीरांच्या पायधुळीचा अंगार, शत्रूच्या गोटातील धुळधाण , मर्दुमकीची प्रचंड लालसा, गगनचुंबी वीररसाचा ताप आणि अनुभवला जगला एक शिवशंभुचा सुवर्ण काळ. आजही ज्यांच्या प्रत्येक कणा कणात राज्याना पाहून नतमस्तक व्हाव ,ओल्या पापण्यानी अभिषेक घलावा प्रत्येक चट्टानाला आणि बस सार्थकी लागले हे जीवन की या सह्याद्रीच्या कुशीत आपला जन्म झाला. बहुत पुण्यवान देह घडला आणि वाढला याच गडकिल्ल्यांच्या भूमीत आणि जीवनाची धन्यता मानावी.


हे गडकोट नुसते डोंगर दऱ्या नाहीत तर हे आहेत वास्तूपुरुष तुमच्या आमच्या पिढ्यांची अलौकिक पुण्याई आणि शौर्याची गाथा सांगणारे. अरे कसा होता मावळा ? कसे होते स्वराज्य ? आणि कसे होते छत्रपती ? अशा एक नाही अनेक प्रश्नांचे उत्तर या आफाट, आचाट, विराट, उतुंग आणि वैभवशाली गडकोटाना पाहिले कि लक्षात येत. किती वैभवशाली,भाग्यशाली, शौर्यवादी,प्रभावशाली आहोत आम्ही ह्या मराठी मुलखातील आम्ही की आम्हाला हा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि आजही तो वारसा ताठमानेने आम्हाला खुणावतो आहे. सागरी दुर्ग असुद्या की भूईकोट की डोंगरकिल्ले आम्ही आमच्या स्वाभिमानची बिरादरी अशीच आभिमानाने आज तागायत मिरवतो.


आपण जो आज घाट घातलाय ना गडकोट संवर्धनाचा हे काही नुसते काम नाही तर आपले कर्तव्य आहे. किल्ले टिकले तर संस्कृती बहरेल आपल्या पुढील कित्येक पिढ्या आपल्या पुर्वजांच्या शौर्याचे पोवाडे मुखी ठेवतील आणि अजरामर असणारे हेच किल्ले आपल्या संस्कृतीला अमूल्य ,अतुल्य ,अजरामर करतीलच यात शंका नाही.तर चला गडकिल्ल्यांचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन करु या आपला अमुल्य वारसा असाच आपल्या पुढील पिढीला सुपूर्द करु या आणि खेळवु या भिनवुयात मर्द मराठ्यांचे, मावळ्यांचे सळसळते रक्त त्यांच्यात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational