गौरी
गौरी
ती घाम पुसत पुसत नामांकित ऑफिसमध्ये शिरली. शिरस्त्याप्रमाणे टेलिफोनिक इंटरव्यूह पार पाडून एच आर राउंड साठी तिने प्रवेश केला.पण नेहमीप्रमाणे ट्रफिकने गोंधळ घातला.तिला उशीर झालाच .ते तिला मान्य नव्हते.
काहिशी गोंधळलेली त्यामुळे आजचा राउंड तिने पार पाडला.ती सिलेक्ट झाली.आनंदात ती बाहेर पडली.उद्यापासून नवी आयुष्याची सुरुवात होणार होती.
ध्येयशील माणसाला मार्ग गवसला की आजूबाजूचे जसे दिसत नाही तसेच गौरी चे झाले. तिचा बॉस राजेश याचे मनसुबे काय असू शकतात याची तिला कल्पनाही नव्हती.मिळालेल्या कामाचे सोने करायचे. जेव्हडे वर जाता येईल तेव्हडे जायचे.हे मनोमन ठरवूनच ती घरी निघाली.
रात्रभर भविष्याच्या वाटचालीची यशाची ती वाट पहात होती.सकाळ होताच ती लवकर उठली. उशीर नको म्हणून लवकरच निघाली .कामावर वेळेत पोहोचली. हळूहळू कामात रुळू लागली.कामावर तसेच बाहेरून वेगवेगळ्या परिक्षा द्यायच्या.हा तिचा छंद होता.ती पहिली परिक्षा पास झाली तेव्हा राजेश सरांनी फुलांचा गुच्छ मागवला पेढे वाटले.तिचा आंनद गगनात मावेनासा झाला.असेच आणखी यश मिळवून आपण सरांना खूश करायचे ठरवले. पण आपण ठरवतो तसे होतेच असे नाही.तिला जसजशी बक्षिसे मिळू लागली तसतशी राजेश सरच नव्हे तर तिच्याबरोबर काम करणारे पुरूष कर्मचारीच नव्हे तर महिला कर्मचारी ही शुभेच्छा देईनात . त्यावेळी तिला हा बदल का ते कळेना ती खूप नाराज झाली.तिने ही गोष्ट तिच्या बहिणीला सांगितली. कारण हळूहळू तिच्याबरोबर सगळे कमी बोलत . राजेश सर असतील तर तिच्यापासून लांबच पळत.सगळे एकत्र असतील सगळे जण राजेश सरांची ओढूनताणून तारिफ करत .जणू इथे त्यांच्याशिवाय कुणीच श्रेष्ठ नाही. कुणी जाण्याचा प्रयत्न ही करु नये.त्याला वाळीत टाकले जाईल.तिला असह्य झाले. हे सगळे ओझे तिने बहिणीकडे रिते केले. तिला आता मोकळे वाटू लागले.बहिणीने तिची समजूत घातली. पुरुषच नव्हे तर स्रियाही दुसर्या स्रिला समजू शकत नाही .याचे दुंःखच जास्तच . तुझी लढाई तुलाच लढायचीच. आता तर जास्तच परिक्षा दे .खूप मोठी हो. खचू नकोस .त्यापासून जिद्द पकड. बहिणीने सांगितलेले गौरीला पटले. तिने मनाची समजूत काढली.
आता राजेश हि गौरीशी दाखवण्यासाठी गोड बोलत असे पण तिचे मानसिक खच्चीकरण करण्याची एकही गोष्ट तो सोडत नसे.कामात तिला मदत करित नसे अडथळे आणत होता. राजेश बॉस असल्याने सहकारी हि त्याला मदत करीत .
गौरीने मन कठोर केले. जिद्द धरली. त्यानी केलेले मान बासनात गुंडाळले.आता पदर खोचायचाच .तिच्यातील दुर्गा सरस्वती अवतारली. एकामागोमाग ती परिक्षा देऊ लागली. राजेश आतून चरफडत होता. कारण तिने त्याची पर्वा करणे सोडले होते.इतरांचे कुजके बोल,वागणे हे सर्व तिला दिसत नव्हते. राजेश तिला त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नव्हता. इतरांना ते समजत होते पण बोलायचे धाडस कुणाच्यातही नव्हते.गौरीला फक्त दिसत होते ध्येय.पुढे जाण्याचे ध्येय.!!
सच्चाई व प्रामाणिक प्रयत्न याचा विजय झाला राजेश पेक्षा मोठी पोस्ट गौरीला कंपनीकडून बहाल करण्यात आली. कंपनीच्या इतिहासात ही असे प्रथमच घडले होते. आता सगळे गौरीच्या आजूबाजूला फिरकू लागले. पार्टी मागू लागले. गौरीला अचंबा वाटू लागला . कारण जे सगळे तिला यश मिळू लागल्यावर साध्या शुभेच्छा देत नव्हते. आता ते शुभेच्छा देत होते कारण गौरी राजेश पेक्षा मोठी बॉस झाली होती.
गौरीने अॉफीसमध्येच पार्टी ठेवली. तिच्यासाठी भरपूर जण गुच्छ, पेढे ,गिफ्ट्स घेऊन आले होते.
इतक्यात अगदी साध्या वेशात गौरीचे आगमन झाले. एरव्ही तिला गबाळी आणी बरिच विशेषण लागली असती. पण पहा साधी रहाणी उच्च विचारसरणी.असे उवाच निघाले. असो. गुच्छ देणार्यांची गर्दी झाली. तिने सर्वांना थांबण्याचा इशारा केला. माईक हाती घेतला अन् खरी गौरी बोलू लागली.
माझ्या या यशामागे फक्त आणी फक्त माझ्या हितचिंतकाचा व बहिणीचा हाथ आहे. मला इथे कोणीच समजू शकले नाही. नोकरीसाठी घाबरुन किंवा त्रास होईल म्हणून मी घाबरले नाही.आज तुम्ही सर्व माझ्यासाठी हारतुरे घेऊन उभे आहात ही माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वी मला जे यश मिळत होते तेव्हा साध्या तोंडी शुभेच्छांची अपेक्षा करत होते.पण मला ते ही मिळत नव्हते.पण आता यशाबरोबर मला खुर्ची ही मिळाली त्यामुळे तुम्ही माझे कौतुक करत आहात. अशा वेळी लहानपणी आई एका गरीब बहिणीची गोष्ट सांगायची. तेव्हा ती गोष्ट मला नीट समजली नव्हती.गरीब बहीण श्रीमंत झाल्यावर भावाने जेवणाला बोलावले. तसेच मी. मला वाटते आजचा हा आदरसत्कार माझा नसून मला प्राप्त झालेल्या खुर्चीचा आहे. तेव्हा आपण तो मान खुर्चीला द्यावा .
सगळीकडे निंःशब्द शांतता पसरली. जितक्या शांतपणे गौरीने आगमन केले होते तितक्याच शांतपणे तिने प्रस्थान केले. पद पाहून मिळणारा आदरसत्कार तिला नको होता .मानवता व माणुसकीची ती पुजारी होती.