Ujwala Rahane

Inspirational

4.0  

Ujwala Rahane

Inspirational

गौराई भाग २

गौराई भाग २

4 mins
188


आणि तिची गौराई हसली!.. भाग (2)


 हिने केलेला फोन वहिनींनी उचलला नाही. गौरीला का बोलावले नाही. कारण काय? 


  हा विचार करत ती घरातील कामे आवरत होती. जाऊ दे विसरली असेल, आपलेच तर जाऊया वहिनी ला एकटीला सगळे गौरीचे सोपस्कार जमणार आहेत का म्हणत तिने आटोपून निघाली. लवकरच पोंहचली.

 

  अगदी गेट पासूनच रोषणाई केलेली. गेट पासून दारा पर्यंत लक्षमीचे पाऊल काढलेली दाराशी छानशी रांगोळी. हे सगळे कामे तिचीच असायची. आज कोणी बरं केली. भराभरा ती दारातून आत शिरली. 


  वहिनीचे सगळे माहेरचे लोक आले होते. मैत्रीनींचा फड पण जमला होता. बरेच लोक हिला अनोळखी होते..


  हि घरात येताच कोण होते माहीत नाही. अंदाजे वहिनीची मैत्रीण असावी, तिने वहिनीला आवाज दिला. बघ दाराशी कोण आले आहे. बाई आहे का तुझी? 


  हे वाक्य तिच्या मनाला खुपच झोंबले. नकळतच डोळ्यातून चार थेंब तिच्या हातावर ओगळले. ती सरळ आत गेली. वहिनीं मस्त तयार होऊन गौरी बरोबर फोटो सेशन करत होती. ती मनाशी म्हणाली, म्हणजे गौरी आणल्या पण? आपल्याला का नाही बोलावले? इतक्यात वहिनीचे लक्ष हिच्याकडे गेले. 


 भुवया उंचावत वहिनी हिच्या समोर आली. ताई तुम्हीं? हो, अहो वहिनी मला वाटलं तुम्हीं विसरला असाल कामाच्या गडबडीत. म्हणून आले लगबगीने. तयारी छानच केली. गौरी पण आणल्या उभ्या पण राहिल्या. मस्तच हं अगदी परफेक्ट. चेहऱ्यावर कोरडे हासू आणत ती बोलली.


 हो ताई आणल्या गौरी यावर्षी सगळे कॉन्ट्रॅक्ट दिले मी गौरी आणण्यापासून ते विसर्जन करेपर्यंत सगळे.


  काय कॉन्ट्रॅक्ट? हो, कारण मला पण आता सगळे जमत नाही. मुले पण मोठी होत आहेत. सारखे तुम्हांला बोलवायचं? अग पण मी कुठे काय म्हणाले? मी तर आवडीने करते. मला मनापासून आवडते.


 सगळे बरोबर आहे. पण तुम्हाला पण घरची कामे असतात. तुमचे धातुरमातुर व्यवसाय. सगळ्यांना सुट्टी घ्यावी लागते ना?


 वहिनीचा एक एक शब्द हिच्या मनाला वेदना करत होता. चला मग मी निघू? हो चालेल. आणि ऊद्या नैवेद्याचा स्वयंपाक पण हिच मंडळी करणार आणि माझी वहिनी सवाष्ण आहे. वहिनीं स्पष्टपणे बोलून गेली.


 हिने डोळ्यातील पाणी आवरलं. गौरीला मनोभावे नमस्कार केला. आणि बाहेर आली. दारात दादाची भेट झाली. तो फक्त म्हणाला. निघालीस? हो एवढे बोलून ती त्याला ओलांडून गेली. मागे वळून पाहिले. तिला वाटलं दादा येईल. मागे बोलेल काहीतरी. पण तो तर केंव्हाच आतल्या गर्दीत दिसेनासा झाला होता.


 मानपान सगळे गिळून ही आपली घरी निघाली. घराच्या वाटेवरच , तुळजाभवानीचे मंदिर होते.नेहमीच तिचे या मंदिरात जाणं येणं व्हायचे. आजही जाता,जाता नमस्कार करावा म्हणून मंदिरात गेली. देवीच्या पायाशी माथा टेकवला, आणि प्रार्थना केली. 


 आई जगदंबे कोण चुकते आहे, मला माहित नाही.माझ्या हातून काय चुक झाली हे पण मला उमजत नाही. पण पण गौराईने मात्र यावर्षी माझ्या हातून सेवा का करून घेतली नाही हे ही मला कळत नाही. काही तरी दृष्टांत दे. चुकले असेल तर, मला चुक तरी कळू दे! आपला नमस्कार करून बाहेर येऊन पायरीवर बसली.


 इतक्यात एक आज्जी दोन काखोटीला दोन पिशव्या लावून चालत असलेल्या तिला दिसल्या. ओझं बरेच होते.हिचा मदतीला धावायचा स्वभाव मग काय! तिने आज्जीला हाक मारली व हाताने थांबायचा इशारा केला.आज्जी थोड्या बावचळून गेल्या. 


  अहो आज्जी किती ओझे ,ते द्या माझ्याकडे मीही याच बाजूला राहते. घेते घरापर्यंत.आज्जी नको नको म्हणत असताना तिने जबरदस्तीनं त्यांच्या हातातून ओझे घेतले.गप्पा मारत दोघी चालू लागल्या.


 आज्जी बोलल्या अग घरी गौरी येतात. त्याची तयारी ग बाजारात गेले होते. सगळी सामग्री आणायला.आता होत नाही ग पण करावे लागते. आज्जी घरी कोणी नाही? आहेत ग 

मी आणि यजमान, मुलं दोघेही परदेशी. छोटया,मोठया सणावाराला नाही जमत त्यांना यायला. मग करत बसावी लागते मलाच सगळी उसनवार.

   

 आज्जी झेपत नाही तर, मुलांकडे सोपवायचे सगळे. कसले करणार ते बाई, रोजचे रोज देवाला हात जोडले तरी खुप आहे.असो होते आहे तोपर्यंतच करायचे. ह्यांना सगळे साग्रसंगीत लागते. बघ करायची तयारी.चल दे आता पिशव्या आलं माझे घर. आज्जी म्हणाल्या.


  अरे वा, आज्जी तुम्ही इथे राहता काय मी त्या शेवटच्या टोकाला. थांबा ठेवते पिशव्या म्हणत ती आत गेली.

  

 तयारी काहीच नव्हती. आज्जी काय हो गौरी आणल्या पण नाहीत?नाही ग आणते आता. इतक्यात आजोबांनी चहा मागितला, कोण आलय ग? कोण नाही गौराई आली. आज्जी हसत, हसत विनोदाने बोलल्या.

  

काय? म्हणत आजोबा बाहेर आले. हिला पाहून म्हणाले गोराई. नाव का हिचं? छानच ग कोण हि? मग आज्जी ने सांगितला सगळा वृत्तांत. 

   

 हिला मात्र आज्जी गौराई म्हणाल्या पासून तर गौरी साठी आज्जीला मदत करायची इच्छा झाली होती. पण कसे विचारणार?

 

  आज्जीने हिलाही चहा दिला. चहा घेता घेता हि म्हणाली.आज्जी तुमची हरकत नसेल तर मी करू का मदत तुम्हांला?

  

 कदाचित विश्वासाचा सवाल आहे.मी पण... म्हणत तीने आज्जीला तिचा वृत्तांत सांगितला.आज्जीने तिचे डोळे पुसले तिच्या पाठीवरून हात फिरवला.

   

 आजोबा ऐकत होतेच ते म्हणाले. बसलात काय लागा तयारीला. हिने पदर खोचून अगदी मनापासून तयारी केली.कारण सगळे हिला माहीत होतेच. 


 लगेच दोघींहीनी गौरी आणून त्याची स्थापना झाली. सगळे मस्त आजोबा बघत राहिले.


  ते आज्जीला म्हणाले,सरकार नेहमी कुरकुर करता मला आता होत नाही. बघा प्रत्यक्षात गौराई तुमच्या मदतीला आली धावून. आता हसा बर!.

  

 हो खरच हो, मग आज्जीने तिला कुंकू लावले आणि दुसऱ्या दिवशी सहकुटुंब सहपरीवार जेवणाचं आमंत्रण दिलं.

   

हि म्हणाली, खरच आज्जी आता मला हक्काची गौर तर मिळाली पण माझे आईबाबाच नव्हे तर माझं माहेर मिळाले.


 आता तुम्ही कधीच कुरकुरणार नाहीत आणि मी देखील कधीच रडणार नाही. कारण तुमच्या हाकेसरशी हि लेक धावत येईल.


 उद्या लवकरच येते. एकटे नका करू सगळे. म्हणत ती बाहेर पडली गौराई तिच्या कडे बघून हसत होती. आणि म्हणाली लब्बाड डोळे पुस बघ सगळे तुला मिळवून दिले.


 आता कोणाच्या आमंत्रणाची वाट नाही पाह्यची. मनापासून गौरीचे तिने आभार मानले. हा सगळा वृत्तांत कधी नवऱ्याला सांगते असे तिला झाले होते.


  शेवटी काय वाचकहो,रक्ताच्या नात्यापलिकडेही काही नाती अवचित गवसतात. आणि नात्याची वीण घट्ट करतात. शेवटी सगळी गौराईचीच कृपा हो ना!..


       समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational