गावंठी पवित्र प्रेम
गावंठी पवित्र प्रेम
एका गांवात साधारण मध्यम वर्गीय शेतकरी कुटंब राहत होते. शेतकरी होतकरु असल्यामुळे शेती उत्तम करीत होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिति चांगली बळकट होती. आपल्या घराण्यात कोणी फार शिकला नाही त्याची खंत त्याला होती. समाजात दिसणारे बदल तो सारखा पारखत होता. डॉ. पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज यांच्या सहित अनेक मोठ्या पुढारांचा त्याच्यांवर भक्कम ठसा उमटला होता.आपल्या मुलांना आपण शिकवले पाहिजे असा मनाशी परिवाराने निर्धार केला होता. मोठ्या मुलाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला समोरच्या शिक्षणासाठी जवळच्या शहरात ठेवले होते. मुलाला पण शिक्षणाची फार ओढ होती. त्यामुळे त्याने आपले स्नातकोत्तर पर्यंतचे आणि शिक्षक बनण्या साठी आवश्यक असणारे बी.एड चे शिक्षण पण एकाच दमात पूर्ण केले होते. शहरात राहून असल्यामुळे त्याला आपल्या मुळ्गांवाची तेवढी आसक्ती नव्हती. प्रयत्न केल्यावर त्याला लगेच त्याच शहरात एका नामांकित शाळेत शिक्षकाची नौकरी मिळाली. कर्मठ आणि कर्तव्य पालण करणारा असल्यामुळे त्याच शाळेत पुढे काही काळा नंतर प्रबंधनाने त्याला मुख्याध्यापक बनवले होते.
मुलगा शिकला आणि सरकारी नौकरी व परिवार आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्यामुळे लग्नासाठी मुलींचे बरेच स्थळ चालून येत होते. माणसाचे दिवस पलटाला काही वेळ लागत नाही. लगेच त्यांच्या कडे एका शिकलेल्या सुंदर शिक्षिकेचा प्रस्ताव लग्नासाठी आला. ती त्याच शहरात सरकारी सेवत असल्यामुळे संबंध नाकारण्या सारखे काहिच नव्हते. त्यांचे लग्न झाले आणी मग संसार सुखात सुरु होता.पैशाची आवक चारही दिशाने होत असल्यामुळे लगेच त्यांनी आपला बंगला शहरात बांधून आपला संसार थाटाने राजा-राणी सारखा करित होते. त्यांना एक सुंदर पुत्रीरत्न आणी पुत्ररत्न झाले होते. दोघेही व दोन्हीकडील परिवार हर्षा मुळे भारावून गेले होते.
मुलगी लहान पणा पासूनच अभ्यासात हुशार होती. मुलाचे अभ्यासात फारसे लक्ष नव्हते. मुलगी चंद्रकलने प्रमाने मोठी होत होती आणी शिक्षणात पुढे –पुढे सरकत होती. तीने आई-वडिला प्रमाने स्नातकोत्तरची कला क्षेत्रात पदवी मिळवली होती.मुलाचे बालपणा पासुनच तांत्रिक बाबतित जास्त लक्ष होते. त्याचे पाठय-अभ्यासक्रमात विशेष लक्ष नव्हते. तो कसा तरी मॅट्रिक झाला होता. आई-वडिलांना विश्वास होता कि पुढे त्याला शिक्षणात रुची निर्माण होईल!. पण त्याने आपल्या इच्छेप्रमाने शहरातील औद्योगिक प्रक्षिण संस्था मधे अॅडमिशन घेवुन मोटर यांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. सोबतच घडाळ रिपेरिंग मधे हुनर प्राप्त केले होते. वडिलांच्या धाकामुळे समोर शिक्षन सुरु ठेवले होते. पण त्यात तो फार दिवे लावु शकला नव्हता.
मुलीचे शिक्षण पूर्ण झाले होते. तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. तीला एक वरिष्ठ प्राध्यापकाने पसंद केले होते. मना सारखा जवाई मिळाल्याने ते फार सुखावले होते व त्यांनी मुलीचे लग्न फार धुम-धडाक्याने केले होते.शहरात व नाते-संबंधात त्या लाग्नची कित्येक वर्ष पर्यंत चर्चा होत होती. मुलगी सासरी आनंदाने नांदत होती. मुली सारखेच मुलाचे भविष्य घडविले पाहिजे या प्रयत्नात ते दोघेही होते. त्याने शिक्षनात समोर जावे म्हणुन ते साम,दंड भेद, भाव या सर्वांचा उपयोग करुन त्याला शिक्षणाच्या वठाणीवर आणण्याच्या आटो-काट प्रयत्न करित होते.पण या सर्व कारणामुळे त्याचे आई-वडिलांन विषयी अनेक मतभेद आणी मनभेद उत्पन्न झाले होते. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. शेवटी तो आपल्या वडिलोपार्जित गांवी आजी-आजोबा पाशी जावुन राहिला होता. नाराज नाताला त्यांनी खूप आपल्या परिने समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. शेवटी सर्वांनी हात टेकले होते. तो तीथे उत्तम शेति व आपाले यांत्रिकेचे दुकान चालवत होता.काही काळा नंतर आजी-आजोबा त्याला नेहमी साठी सोडुन आपल्या अंतिम यात्रेला निघुन गेले होते. आता तो एकटाच होता. त्याच्या जीवनात त्याच्याच शेतात काम करणा-या एका अत्यंत गरिब परिवारातील शरिर काठीने उंच ,मजबुत बांधा व सावळ्या वर्णाच्या एका चतुर चंट मुलीने शिरकाव केला होता. खायला कोंडा अन झोपायला धोंडा, अशी तीच्या परिवाराची स्थिति होती. त्याला तीच्याशी पहिल्या नजरेचे प्रेम झाले होते. ते दोघेही प्रेमरोगी होते.त्या दोघांच्या प्रेमाची चर्चा गांवात आजु-बाजुला वा-या सारखी दूर-दूर काणो-कानी पसरत होती. ती आग निश्चितच त्याच्या आई-वडिला पर्यंत निकटच्या नातेवाईकांनी पोहचवली होती. ही बातमी म्हणजे आगेत- तेल टाकण्या सारखी होती. वडिलांची तळ पायची आग आता मस्तकात शिरली होती. प्रेम वैगर त्यांच्या साठी “बंदर क्या जाने अदरक का स्वाद” अशीच होती. त्यांनी या प्रस्तावाचा विरोध आणी निषेध केला होता.पण मुलगा टसचा-मस झाला नव्हता. त्याने हे प्रेम अमर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितिला तोंड देण्यासाठी शिव धनुष्य उचलेले होते. आणी त्या दोघांनी सर्वांचा विरोध पत्करुन दोघेही बाहुलया वर चढले होते. तीकडे आई-वडिलांनी मुलाच्या लग्नाच्या पाहिलेल्यांची स्वप्नांची महाहोळी जळली होती. वडिलांची त्याची आग काही केले शांत होत नव्हती. कुर्हाडीचा दांडा अन गोत्यास काळ. शेवटी त्यांनी मुलगा माझ्यासाठी मरण पावला असे दुःखद भावनेने आपल असिमित राग प्रगट केला होता.व ते त्या आगेतच शेवट पर्यंत जळतच राहिले होते.पुत्र प्रेमा पेक्षा त्यांचा अहंकार मोठा होता.
लग्न झालेले जोडपे आनंदाने नांदत होते. त्यांच्या आनंदाचा संसार बघुन प्रकृतिने त्यांना उपहार म्हणुन दोन गोंडस मुले दिली होती.पण ते नातु आपल्या आजी-आजोबांच्या प्रेमाला वंचित झाले होते. मुले मोठी झाली म्हणुन त्यांनी आजोबांच्या गांवाला जाण्याचा निरधार केला होता. त्यांनी आजी-आजोबा ज्या परिसरात राहत होते तीथेच किरायने मकान घेतले होते.पत्निला प्रथम घड्याळ दुरस्तीच्या कामत निपुन केले होते. व तीचे घड्याळ आणी आपले मोटार रिपेअरिंग चे दुकान शहरात टाकले होते.फाउल्या वेळात शेति वर लक्ष ठेवत होता.धन लक्ष्मी चारही बाजुंनी धनाचा वर्षाव करित होती. लगेच आजु-बाजुलाच स्वःताचे मकान बांधले होते. परिवाराची अधुन-मधुन गावतल्या व नातेवाईकांच्या कार्यप्रसंगात आजी-आजोबांचे दर्शन होत होते. आजी नातवांशी प्रेम व्यक्त करत होती.सुन पण आपल्या परिने आजोबांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करित होती.ती आशावादी होती कि घराण्याचा दिपकाला बघुन कदाचित आजोबा सर्वांना आशीर्वाद देतील !. पण नावडतीच्या हातचे मिठ पण आळणी. हे आजोबांना खटकत व पटत नव्हते. शेवटी आजोबांनी स्वताःला चार भिंतित कोंडुन घेतले होते. व अंहकाराच्या आगेत जळत-जळत शेवटी राख झाले. मुलाने वडिलांचे धर्मशास्त्रा प्रमाने सर्व मनापासुन विधी व संस्कार पार पाडले होते. पण पूर्ण परिवाराला खंत होती की आजोबांनी कमीत-कमी जातांना तरी त्यांना आशिर्वाद द्यायला पाहिजे होता.पण तो मोठेपणा ते दाखवु शकले नाही. याची खंत कदाचित आजोबांना पण झाली असावी !. त्याच्या बहिनीने आईला तीच्याकडे राहण्याचा आग्रह केल होता. आजोबाने जी चुक केली होती. तीला , ती चूक दुरस्त करावयाची होती म्हणुन तीने तीचा प्रस्ताव फेटाळुन लावला होता. आणी उरलेले आयुष्य मुलाच्या सहवासात त्यांच्या आनंदात आनंदाने सहभागी होवुन मुलाच्या संसारची सुखद बातमी कमित-कमी आजोबांना सतीचे वान म्हणुन स्वर्गात घेवुन जायचे होते.

