STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Drama Romance

3  

शब्दसखी सुनिता

Drama Romance

एका लग्नाची गोष्ट, भाग - एक

एका लग्नाची गोष्ट, भाग - एक

7 mins
209

लग्नसराईचे दिवस सुरू होते... रिहानच्या आईनेही आता रिहानसाठी मुली बघण्याचा कार्यक्रमच सुरू केला. पण हे सगळ रिहानला कळायला नको... म्हणुन आईने रिहानला मला एका लग्नाला तुझ्या गाडीतुन सोड आणि तु उद्या सुट्टि घे म्हटल्यावर... मातोश्रींची आज्ञा कोण मोडणार ?? म्हणुन रिहान आपल्या आईसोबत एका लग्नाला गेला. तिथे गेल्यावर लग्नाची सर्वांचीच धावपळ चालू होती. तयारी सगळी झाली होती. फक्त वधु वरांच्या डोक्यावर अक्षदा पदायच्या बाकी होत्या. पाहुणेमंडळी जमली होती. आई सर्व जवळच्या नातेवाईकांना रिहानला भेटवत होती. त्याला सर्वांना नमस्कार करून कंटाळा आला होता. शेवटी तोच म्हणाला, मी येतो ग आई म्हणुन त्याने तिथुन पळ काढला.


" हे लग्न म्हटल ना जाम बोर होत यार... बघ ना किती उशीर झालाय..." अस तो त्याचा मावस भाऊ श्रेयसला सांगत होता... " चल रे बाहेर थोड फिरून येऊ, अजुन खुप वेळ आहे. लग्न लागायला..." 


हाॅलमध्ये प्रचंड नातेवाईकांची गर्दी त्यात मुली तर इकडून तिकडे तिकडून इकडे मिरवत होत्या... ते दोघे बोलत जात होते... तेवढ्यात ती आली.... आणि चुकुन रिहान त्या समोरून येणार्‍या मुलीला धडकला...


रिहान - साॅरी... साॅरी... खरच साॅरी...माझ लक्ष नव्हत... पण मुद्दाम नाही केल मी ...


ती - इट्स ओके... होत अस कधी कधी... आणि स्माईल करून पुढे निघून गेली...


तिला बघुन पहील्यांदा रिहानचा एका क्षणासाठी काळजाचा ठोकाच चुकला...


रिहान - काय रे ये श्रेयस, सांगायच ना मला पुढे बघ म्हणून...


दादा मी माझ पुढे बघुन चालत होतो.... तु कुठे बघत होतास आणि तुला बघून नाही चालता येत का रे, श्रेयसने अस म्हटल्यावर पुढे रिहान म्हटला चल जाऊ दे मला ना तु एखाद्यादिवशी मार बसवशील...


आभाही त्याला शोधत होती... कोण होता तो... मला ना खरच त्याच ' साॅरी ' म्हणण वगैरे खुप हसायला येत होत... तो काही तिला दिसलाच नाही...


लग्नसमारंभ छान पार पाडला. पाहुणेमंडळी जेवण करून आपापल्या घरी जायला लागली. इकडे रिहानची आई त्याला शोधत होती...


" घरी निघायला हव, उशीर नको व्हायला..." मंदाताई रिहानसाठी एका मुलीच स्थळ सुचवू पाहत होत्या. त्या मुलीकडचे आणि मुलगी त्या लग्नाला उपस्थित होते. पण नेमक्या वेळेला हा रिहान मुलगी दाखवाव म्हटल तर गायब झाला... रिहानची नजर मात्र तिलाच शोधत होती. कोण असेल ती ? ती तिच्या मैत्रिणींमध्ये उभी असलेली त्याला दिसली... तिला क्षणभर पाहून त्याच्या चेहर्‍यावर हसु उमटल... तो तिला पाहत होता... किती सुंदर आहे ही खरच, साडीत तर खुपच सुंदर दिसत होती. जणु.... स्वर्गातील अप्सराच... आणि तिचे केस सारखे मध्ये मध्ये चेहर्‍यावर येत... तेही जणु तिच्या सौंदर्यात अजुनच भर पाडत होते. तिची अदा घायाळ करणारी अशीच होती... पहील्याच नजरेत ती त्याच्या मनाला क्लीक झाली होती...  तो तिच्याकडे पुढे जाणार इतक्यात आईने आवाज दिला...


रिहानसाठी मंदाताईंनी एका मुलीचा फोटो दिला होता... रिहान आईने आवाज देताच....


"काय ग आई, कुठे होतीस तु ... मी तर तुलाच शोधत होतो. आई चल आता निघायला हव. दोघेही ते लग्न ॲटेंड करुन आपल्या घरी येतात.


दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीस होत म्हणून रिहान लवकरच घरून निघाला. काहीही न खाता पिता... आईला त्याची खुप काळजी वाटायची. असा काय करतो हा मुलगा ? म्हणूनच याच त्या मुलीशी जमल पाहीजे. एकदाच रिहानच लग्न झाल की माझी जबाबदारी संपली. मग काय ते त्याची बायकोच बघेल... आई तो संध्याकाळी येण्याची वाट बघत होती... रिहान ऑफीसमध्ये कामात खुप बिझी होता. नंतर रिलॅक्स झाल्यावर तो तिच्या विचारांत हरवून गेला... किती छान होती ती... तिला माझा धक्का लागला तर तिने ओरडण कींवा बोलण अपेक्षित होत. पण ती काहीच रागवली नाही त्याला कालचा हा प्रसंग आठवुन त्याच्या चेहर्‍यावर स्माईल आली.... रितेश त्याचा ऑफीसमधील मित्र... जवळ येऊन फाईल मागत होता... पण तो आपल्याच धुंदीत... रितेशच्या बोलण्याकडे रिहानच लक्षच नाही...


रितेश - चुटकी वाजवत रिहानपुढे... काय रे कुठे हरवलास ? अरे मी तुला कधीची फाईल मागतोय... लक्ष कुठे आहे ? 


रिहान स्वतःला सावरत जस काही झालच नाही, ये देतो थांब .... जरा...


काल कुणीतरी लग्नात तर नाही भेटली ना..


रिहान मुद्दाम, एवढ कुठल आपल नशीब आल... अस कुणी भेटायला....तुमच बरय बाबा तुम्हांला गर्लफ्रेंड तरी आहे...


रितेश आणि तेजस - ये रिहान तुलाही भेटेल रे कुणीतरी... तु आधी बोलायला शिक....


तो - ये गप्प हा.... बरय मी सिंगलच....


का रे तुला लग्नात नाही भेटली का कुणी...


नाही ना भेटली... म्हणुन सगळे त्याच्यावर हसायला लागले... तो मात्र तिला आठवून हसत होता....

            

रिहान ऑफीसमधुन आल्यावर आईने त्याच्यासाठी चहा दिला. त्याचा मुड बघुन तिने विषयाला हात घातला. काल मंदाताईंनी रिहान साठी सुचविलेल स्थळ. माणसही चांगली आहेत आणि मुलगी तर नक्षत्रासारखी आहे. गुणी आणि संस्कारी आहे. चांगल स्थळ आहे जर हातातुन जायला नको म्हणुन आई रिहान मला तुझ्याशी बोलायच आहे जरा... 


रिहान - हो बोल ना... काय म्हणत होतीस...

आई - अरे काल मंदामावशीने तुझ्यासाठी एक स्थळ सुचवल आहे. आता तरी तु लग्नाचा विचार करुन बघ.... स्थळ चांगल आहे, विशेष म्हणजे ती माणसे खुप चांगली आहेत आणि आपल्या सारखीच आहेत. मुलगी म्हणशील तर खुप छान सुंदर, गुणी आणि संस्कारी आहे. तु बघ तिचा फोटो त्यांनी दिला आहे.


रिहान - ये आई, काय ग तु लग्नाच बोलणार होतीस माझ्याशी... थोडा वेळ दे ना मला...


सध्या एक महीना मी खुप बिझी आहे, एक महत्वाच्या प्रोजेक्टच काम सुरू आहे. मला वेळ नाही आहे . आधीच सांगतो... परत तु म्हणशील ते मुलगी पाहण, कांदापोहेचा

कार्यक्रम.... होकार - नकार... किती बोअरींग आहे ग, जुन झाल ते आता...


आई - त्यात काय नाव ठेवण्यासारख... लग्न जुळवण्याची तशी पद्धत आहे.

रिहान - आई , लग्न म्हणजे खेळ नव्हे, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि कुठलाही निर्णय असे घाईत घ्यायचे नसतात. हे तुच शिकवलय. ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही? ते कळायला नको का ? आधी एकमेकांना भेटल, बोलल... थोडी मैत्री झाली... वेळ दिला तर एकमेकांना छान ओळखता येत... तर ते नात पुढे जाऊ शकत... नुसत लग्न करून काय करायच.... मन जुळायला नको का ?? लगेच सगळ ठरवून मोकळ व्हायच... मला नाही करायच अस लग्न ?


आई - अरे राजा मी कुठे तुला उद्याच लग्न कर म्हणते राजा.... तु एकदा त्या मुलीला भेट... तुला जस वाटत तस वेळ घे... तुमची आजकालची पिढीच मला नाही कळत. तु आधी तिला एकदा भेटुन, बोलून मग योग्य वाटल तर ठरव ना !


रिहान - ठीक आहे आई.... बघू ते नंतर लग्नाच. तु घाई करू नको आणि त्या मावशीला पण समजुन सांग... ओके...

आई - तु नेहमी असाच करतो. आता विचार नाही करणार लग्नाचा..., तर काय म्हातारा झाल्यावर करणार आहे का ? जाते मी... स्वयंपाकाच बघते... तु निदान त्या मुलीचा फोटो तरी बघशील.

आई किचनमध्ये निघून गेली. रिहानने डोक्याला हात लावला नि टीव्ही चालु करायला रीमोट हातात घेतला... तिथेच तो फोटो होता... त्याने मॅच चालू केली. सहज म्हणुन त्याने फोटो म्हणून बघितला. त्याला तो फोटो पाहुन इतका आनंद झाला की तो जागेवर नाचायला लागला... त्याला खुप आनंद झाला.

अरे काल आपला हिला चुकुन धक्का लागला नि आपल्याला मनाला तर खुप आवडली होती. अन् काल लग्नात शोधल सगळीकडे... पण तेव्हा दिसली नाही. अन् आता तर डोळ्यांपुढे तीच दिसते... काय म्हणायच याला....?? पण आईला कस सांगणार... आता... पण ' मेरा दिल चुरानेवाली ' ती हीच आहे. फोटोमधल्या पेक्षा रियलमध्ये खुपच भारी दिसते. आईला बोलतो म्हणुन तो तिला लाडीगुडी करत, आई मी तुला काही मदत करू का ?


आई - रिहान राहू दे करते मी काम.... तुला खरच माझ्याविषयी एवढ वाटत तर आता तरी लग्नाचा विचार करशील ना ? आता आई म्हटल्यावर... आणि रिहानला तर ती आणि फोटोवाली आवडलीच होती...मग तो नाही तरी कसा म्हणणार ना ?


रिहान - आई , साॅरी ग... मघाशी तुला मी खुप बोललो...

आई - मी समजु शकते रे, तुझ काम वाढलाय ना आफीसच, मिटींग्स असतात त्यामुळे होत अस कधी कधी. जाऊ दे तुला वेळ हवाय ना... मी नाही म्हणुन त्या मंदामावशीला सांगते.

रिहान - आई मी काय म्हणतो... हो म्हण पण आधी मी त्या मुलीला भेटुन ठरवेल ओके...

आई - हो रे बाबा, तु हो म्हटलास आणि तु त्या मुलीला भेटायला तयार झाल... हेच खुप आहे माझ्यासाठी... आई, तुला आवडली ना ती...

रिहान - हो ( लाजतच ) पण... पण..., तु लगेच घाई करू नको... मी आधी तिला भेटेन मग पुढच ठरवेन....

   

रिहान ऑफीसमध्ये कामात खुप बिझी झाला. त्याच्याच ऑफीसमध्ये त्याच्यासोबत काम करण्यासाठी एक नवीन असिस्टंट जाॅइन झाली. कामानिमित्त दोघे एकत्र असायचे... त्यांच्यात फक्त कामाच बोलण व्हायच. तिच नाव मेघना. ऑफीसमधले सगळे तिच्याशी बोलत, पण ती जास्त मुलांना भाव देत नव्हती. दिसायला खुप सुंदर होती. तिच बोलण तर मधासारख गोड होत. ती बोलायला लागली की सर्वांची नजर तिच्यावरून हटत नव्हती. सगळे तिच्याशी मैत्री करु पाहत होते. स्वतःहुन बोलायचे पण ती जास्त बोलत नव्हती... हा पण तिला रिहानचा स्वभाव आवडू लागला होता. तिने त्याला पहील्याच नजरेत आपलस केल होत. रिहानला याची काही कल्पना नव्हती. तो फक्त तिच्याशी कामाचच बोलायचा.... ती मात्र रिहानशी बोलणार होती... तिच्या मनातल सांगणार होती. इकडे रिहान काम पूर्ण करुन रविवार बघुन त्या मुलीला भेटायच ठरवतो...


आईही मुलीच्या घरी तस सांगते... दोघांच्या घरच्यांच्या संमतीने ते रविवारी भेटणार असतात. इकडे मेघना रिहानला मनातल सांगण्यासाठी खुपच excited असते.... बघुया रिहान आणि तिची पहीली भेट होते की नाही..... नक्की रिहानच्या आयुष्यात काय होणार ? हे पुढील भागातुन कळेल...

                                              क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama