एका लग्नाची अनोखी गोष्ट
एका लग्नाची अनोखी गोष्ट
लग्न म्हटल की दोन मनांचे, जीवांचे आणि कुटुंबाचे अनोखे मिलन असते. आपल लग्न धुमधडाक्यात, खुप सारे नातेवाईक आणि मित्र मंडळीच्या उपस्थितीत थाटामाटात पार पाडाव अस प्रत्येकाच एक स्वप्न रंगवलेल असत. पण कोरोना आला. त्याने तर मुक्कामच केला. तो काही जाता जायच नाव घेईना, ठाण मांडून बसलाय. कितीतरी लोकांचे प्राण या कोरोनाने घेतले. कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी बदलल्या. लग्नाचही फार अवघड झालय. कोरोनामुळे जास्त लोक एकत्र आले तर कोरोनाची भिती असते. कोरोनामुळे लग्नसोहळ्याचे चित्रच बदलून गेले आहे. कोरोनामुळे पन्नास जणांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने लग्नसोहळा करण्यासाठीच्या सुचना दिल्या होत्या. कोरोनामुळे सगळच ठप्प झालय. लाॅकडाउनमुळे लग्नसमारंभ, रद्द झाले आहेत. साखरपुडा, हळद, लग्नसोहळा सगळ नियोजनच कोलमडल आहे. या परिस्थितीवर मात करुन लग्न पार पाडल. अश्याच एका अनोख्या लग्नाची गोष्टीची कथा.
विनायक आणि संजीवनीच लग्न कोरोना येण्याच्या आधी ठरल होत. दोघेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने कोरोनामुळे ते दोघेही आधी कर्तव्याला प्राधान्य देत कोविडच्या काळात काम करत होते. त्यांच ठरलेल लग्न त्यांनी रद्द केल. खुप मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात नियोजन करण्याच दोन्ही कुटुंबाने ठरविल होत. परंतु कोरोनामुळे दोन्ही कुटुंबाने एकत्र निर्णय घेतला. लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण नेमक लाॅकडाऊनची घोषणा झाली. लग्नसोहळ्याला केलेली सगळी तयारी वायाला गेली. या काळात विनायक आणि संजीवनीने परिस्थिती समजुन घेउन इतरांना, नातेवाईकांना समजुन सांगितल. मग त्यांनी दोन्ही कुटुंबाने एकत्र निर्णय घेतला. ते दोघेही जवळच्याच गावात राहायचे. परंतु लाॅकडाउनमध्ये सरकारच्या नियमाच उल्लंघन न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी ऑनलाईन विवाह करायचा ठरविल. तस नियोजन केल. सोशल मिडीयावरून सर्वांना लग्नपत्रिका पाठवली गेली. घरीच सगळी तयारी करण्यात आली. फक्त दोघांच्या घरचे लोक, संजीवनी आणि विनायक तसेच भटजी होते. बाकी सगळे नातेवाईक त्यांच्या लग्नाला ऑनलाईन सहभागी होणार होते. तस सर्वांना कळवल होत. सर्वांना या लग्नाची खुप उत्सुकता होती. त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांना लग्नाला न येण्याची विनंती केली होती पण लग्नाला प्रत्यक्ष न येता ऑनलाईन लग्नसोहळ्यात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती. आपापल्या घरातुन सर्वांनी या भावी नवरदेव नवरीला तिथुनच अक्षता टाकुन आर्शिवाद द्यायचा. अस पत्रिकेत सांगितल होत. " तुम्ही घरातुन बाहेर न पडता कोविड विरोधात सरकारला मदत करण हेच आमच्यावरच प्रेम समजु " असा संदेश या कुटुंबियांनी दिला.
घरात ऑनलाईन लग्नसोहळ्यातदेखील सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आली होती. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तर तिथे असलेल्या प्रत्येकाने केला होता. अश्यारीतीने ठरलेल्या वेळेत हा ऑनलाईन सोहळा पार पाडला. त्यांचे नातेवाईक , मित्र - मैत्रीणी येऊ शकत नव्हते परंतु ऑनलाईन सोहळ्यात उपस्थित राहून या दोघांना आर्शिवाद दिला. विनायक आणि संजीवनी दोघेही उच्चशिक्षित होते. त्यांनी अत्यंत साध्या पध्दतीने विवाह करून वरखर्चाला फाटा देत लग्नासाठीचा केला जाणारा खर्च त्यांनी गरीब जनतेला, कोरोनाच्या काळात रोजगार गेलेल्या लोकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तुंच वाटप केल. दोघांच्याही गावात त्यांनी हा उपक्रम राबविला. पाच लाख रूपये त्यांनी या सामाजिक कार्याला दिले. आपणही या समाजाचै काहीतरी देणे लागतो. माणुसकीच्या नात्याने त्यांनी ही मदत थेट दोघांच्याही गावातील गरीब लोकांना केली. तसेच गावातील कोरोना सेंटरला त्यांनी दहा ऑक्सीजन सिलेंडर भेट म्हणून दिले. अश्या लग्नाची सर्वांमध्ये चर्चा होती. सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी विनायक आणि संजीवनीच खुप कौतुक करत होते. दोघांच्याही चेहर्यावर आपण मदत केल्याच समाधान झळकत होत.

