Priya Bhambure

Inspirational Children

4  

Priya Bhambure

Inspirational Children

एक सन्मान तिचा सुध्दा

एक सन्मान तिचा सुध्दा

2 mins
503


म्हणतात एखाद जलाशय सदैव शांत,तृप्त आणि भरघोष दिसत असतो का माहितेय? कारण, त्याच्या तळाशी कधीही न संपणारा एक झरा असतो.ज्यायोगे तो जलाशय कधीच आटत नाही.ज्या व्यक्तीच्या हृद्यात असा प्रेमाचा झरा अहोरात्र वाहत असतो.तिचं व्यक्ती मत्त्व त्या जलाशयासारखं असतं.शांत,तृप्त, आणि समाधानी.आपली प्रत्येकाची आई ही अशीच असते.देवाने निर्माण केलेली एक सुंदर व्यक्ती.ज्यात नुसती मायाच नाही तर सहनशीलता,संयमपणा देखील समाविष्ट केला आहे.माझी आई ही अशीच आहे.इतराप्रमाणे तिच्याही आपल्या जीवनाकडुन सामान्यच अशा अपेक्षा होत्या.खुप प्रेम करणारा नवरा, आणि 'आई ' करत तिच्या भोवती फिरणारे मुल हवी. अश्या तिच्या माफक इच्छा होत्या. त्याप्रमाणे घडल सुध्दा.आम्ही दोन मुली आणि एक मुलगा.पण देवाला बहुतेक तिच जीवन वेगळ्या मार्गावर न्यायचं होत. माझा भाऊ सुरज ह्याला खुप ताप आला होता. पण मेंदुमध्ये ताप गेल्याने तो इतर मुलांच्या मानाने तो मागे पडला.खुप औषधपाणी झाल. पण,मोठा होऊन सुध्दा इतर मुलासारखा शिकु मात्र शला नाही.पण,आईने मात्र हिंम्मत नाही सोडली.खचुन नाही गेली. घरी राहुन तीने त्याच्याकरता मेहनत घ्यायला सुरुवात केली.त्याला अभ्यास शिकवु लागली. त्याच्या जोडीला देवपुजा,त्याचे स्त्रोत शिकवले. तो देखील तिच्या ह्या गोष्टींना प्रतिसाद देऊ लागला. पण त्याला नुसत घरात ठेवण तीला शक्य नव्हतं.कारण नाही म्हटलं तरी त्याची चिडचिड होऊ लागली.म्हणुनच,मग तीने आपण ह्याला प्रबोधीनीत घालावं म्हणुन बाबांच्या मागे लागुन त्यांची समजुत घालुन त्यांना तयार केले.सुरुवातीला त्यांना नाही पटलं.नंतर मग होकार दिला.आधी त्यानेही जरा चिडचिड केली.पण हळुहळु त्यांच्यात तो रुळुन गेला होता.त्यांच्यात होणा-या बदलांमुळे, छोट्या-मोठ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवु लागल्याने पप्पा देखील सुखावुन गेले होते. मात्र परत एकदा तिच्या जीवनात वादळ आलं होत. सुरजच्या शाळेकडुन आम्ही आता जुने मुल काढणार आहोत असा मिळालेल्या निरोपामुळे ती त्याच्या भविष्याकरता पुन्हा एकदा चिंताग्रस्त होऊन गेली.पण,अंबडच्या फॉर्च्युना कंपनीमधल्या उमा मॅडमांनी माझ्या भावाला आणि त्याच्यासोबत त्यांच्यासारख्या मित्रांना त्यांच्या कंपनीत लावुन घेतलं.आणि परत एकदा माझ्या आईची काळजी दुर झाली. तो देखील ह्या बाहेरच्या लोकांमध्ये मिसळुन गेला.आणि त्याबरोबर लाडका देखील झाला. आपण ही आता पैसे कमवु शकतो.ह्या आत्मविश्वासामुळे त्यांच्यात कमालीचा मोठेपणा आला आहे.२ वर्षापुर्वी त्याला बेस्ट वर्कर बद्दल सन्मानित केल्यानंतर वाटलं,आज तिच्या प्रत्येक गोष्टीची सार्थकता ख-या अर्थाने झाली.म्हणुनच,आज तीला खुप सार थॅक्यु. ही आमची आई आहे,याकरताच आणि म्हणुनच आज एक सन्मान तिचासुध्दा.

की,तुच ये परत आमची आई म्हणुन

जुळुन राहु दे अशाच रेशीमगाठी

जेव्हा येऊ तुझी मुलं म्हणुन.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational