STORYMIRROR

Priya Bhambure

Inspirational Others

3  

Priya Bhambure

Inspirational Others

थॅक्यु टिचर

थॅक्यु टिचर

2 mins
204

मनापासून आभार शिक्षकांचे आभार मान्याचा एक विशिष्ट दिवस आपल्या कडे ठरवुन दिला आहे. त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या गुरूंचे आभार मानत असतो. पण,मला वाटतं कि,तो एकच दिवस आपल्या आयुष्यात त्यांना थॅक्स म्हणण्यासाठी नाहीये. जे शिक्षक आपल्याला रोज ज्ञान देतात त्यांना आपण केवळ त्या दिवशीच थॅक्यू न म्हणता रोज देखील म्हटलं तरी सुध्दां कमी आहे. आपल्या शिक्षकांसोबत असे अनेक गुरु असतात ज्यांच्यामुळे आपल्याला जगाची माहिती होत असते. जस आपले आई - वडील . पण,त्याच्या नंतर आपल्याला व्यावहारिक ज्ञान देतात ते असतात आपल्या शाळेतले शिक्षक त्यामुळे आज मी देखील माझ्या आवडत्या शिक्षकांचे खुप मनापासुन आभार मानते. त्याचं नाव आहे श्री. श्रीकांत सोनवणे सर. त्यांची आमची भेट झाली ती मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमाच्या दरम्यान. सदैव प्रसन्न आणि हसमुख व्यक्तित्त्ववामुळे त्यांच्याशी बोलतांना नेहमी पॉझिटिव्ह वाटतं मनाचं समाधान होईपर्यंत आमच्या प्रश्नांच उत्तर छान पैकी मिळाल्यामुळे आम्ही सारे खूप खुश असतो .प्रत्येक विद्यार्थाला त्यांच्या त्यांच्या कला कौशल्या नुसार ते सतत मार्गदर्शन करत असतात. रागावणं,ओरडणं त्यांना कधी माहितीच नाहीये.आमचे सर हे विविध क्षेत्रात खुप उत्तम कामगिरी बजावत आहे. ते चित्रकार महाविद्यालयीन विदयापिठात प्राध्यापक आहेत . अभ्यासकेंद्रसंयोजक,लोकल टी व्ही न्यूजचनेलमध्ये संपादक ,महानगर,महावार्ताफिचर सर्विसमध्ये कार्यकारी संपादक जागतिक बॅंकेच्या अर्थ साहाय्यने चाललेल्या शासनच्या प्रकल्पा मध्ये माहितीशिक्षण संवादतज्ञ, विद्यापिठा मध्ये सहाय्यक प्राद्यापक असा प्रवास ,विद्यार्थी संघट्नेत जिल्हा संघट्क ,झोपडपट्टी संघाचा अधक्ष ,हुंडा विरोधी समितीत कार्याध्यक्ष ,किमान वेतन हक्क संघ -सचिव ,जाणीव पथनाट्य मंडळाचे संघटक,निसर्ग दर्शन हि वृत्ती. इतक्या क्षेत्रात नाव कमवत असुन सुध्दा त्यांनी कधीही गर्व नाही केला.आमच्या सोबत नेहमी एकरुप होऊनच सहभागी होतात असे सर लाभल्या नंतर अभ्यासाचा कधी कंटाळा येतंच नाही . त्यांच्या सानिध्यात असं वाटतं कि , सतत शिकतंच रहावं आणि त्यांच्या कडून भरपुर प्रमाणात ज्ञान गोळा करत राहावं. म्हणूनच आज एवढंच म्हणावसं वाटत कि,प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो.... पण माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो हि माझी धारणा म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा मी काही तरी चागलं घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करीत असते. मनातल्या मनात त्यांना कायम साठी गुरु मानते . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर टप्प्यावर क्षणा क्षणाला भेटलेल्या त्या माझ्या ह्या असंख्य गुरूंना मनापासून वंदन !!!!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational