STORYMIRROR

Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

आजोळ एक आठवण

आजोळ एक आठवण

3 mins
288


माझी आज्जी आम्ही सर्वजण तिला 'आक्का' ह्या नावाने हाक मारायचो. तिचं नाव प्रमिला. प्राजक्ताच्या फुलांसारखी नाजूक. आणि खूप प्रेमळ . आपल्या आईनंतर तिच्या सारखा जीव लावणारी दुसरी व्यक्ती कोणी ह्या जगात असेल तर ती म्हणजे आपली आजी असते. जळगावला तिचं वास्तव्य होत.माझ्या आजोबाच कपड्याचं मोठं दुकान होत. त्यामुळें आम्हांला सुट्टया कधी लागतात.आणि आम्ही आजोळी कधी जाऊ असं आम्हां सर्व नातवंडांना होतं असे. त्याच्याकडे आल्यावर आजोबा (आबा) सर्व नातवंडांना घेऊन दुकानांवर घेऊन जात. मला तर त्याच्या गल्यावर बसायला खूप आवडत असे. इथे आल्यावर फापडा, आणि खारे शेंगदाणे, आणि रात्री मलाई कुल्फी हा आमचा नित्याचा खाऊ ठरलेला असायचा. त्या कुल्फी करीता रात्री आंम्ही सर्वजण निक्षून जागे राहायचो. आणि मग आक्कां कडून छानपैकी गोष्ट ऐकत तिच्या कुशीत झोपून जायचो. आमचे हे सुट्टीचे दिवस अगदी अनमोल असल्यामुळे हि संधी सहसा कोणी सोडतं नसे.


असंच एकदा आम्ही सारेजण दिवाळी मध्ये जमा झालो. यंदाची दिवाळी आजीकडेच जाऊन करायची असं ठरवून जमलो होतो.त्याचबरोबर कलेची आवड प्रत्येकाला असल्यामुळे आम्ही दिवाळीचा आकाश कंदील,पणत्या, किल्ला बनवण्याचं असं ठरवल होतं. त्याप्रमाणे आम्ही बच्चे कंपनी आणि घरातले मोठे कामाला लागलो. माझ्या आईने शंखाच्या आकाराचा आकाशकंदिल बनविला. आणि त्याचबरोबर आईस्क्रीमच्या काड्याचा देखील एक लॅम्प बनविला. मातीचा किल्ला बनविण्याचं काम आम्हां लहानांकडे सोपविलं . स्वतःच्या हाताने हे सर्व बनवण्याचा यंदाचा आनंद काही निराळाच होता. आणि त्यांत आजी -आजोबांकडे म्हटंल्यावर तर काही विचारूच नका! सगळेजणं अगदी मजेत होते. आक्का-आबांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद दिवाळीतील मिळणाऱ्या प्रत्येक दिव्याच्या उजळून टाकणाऱ्या त्या प्रकाशासारखा होता. हे बघून आम्हांला फार वेगळं वाटतं होतं . त्या त्या दिवसांची गंम्मत, तो उत्साह आणि त्या आठवणी आयुष्याला वेगळं वळण देत होते. आणि मोठा सण असल्यामुळें साहजिकच नटणं - थटणं तर आलच. आणि त्यांत प्रत्येक वयोगटातील स्त्री हि आवर्जून भाग घेते. कारण,प्रत्येक स्त्रीला नटणं हे आवडतंच असतं. आणि त्यांत दागिन्यांशी तिचं एक वेगळंच नातं असत.तिला ते सर्वात प्रिय आणि मौलिक वाटतं असतं. दागिना प्रिय नाह

ी अशी जगांत कोणतीचं स्त्री आढळणार नाही. कारण, स्त्रीचं सौदर्य अलंकारा शिवाय अपुर्ण असतं. इतर वेळेस जरी मोजकेचं घालतं असली तरी सुध्दा सणांवाराच्या वेळेस तर हमखास ठेवणीतले दागिने बाहेर काढुन,हवे असल्यासं पॉलिश करुन नक्की घालते.


मला देखील नटण्याची खूप आवड आहे.त्यामुळें तिने मला तन्मणी घेऊन दिला .मी पण छान नऊवार घालूंन माझ्या दागिन्यांसोबत तिने दिलेला दागिना घातला त्यादिवशी मला खूप वेगळं वाटतं होत. तिची हि मिळालेली आठवण माझ्यासाठी खूप अनमोल होती. आज जेव्हा परत सणांच्या निमित्ताने मी तो दागिना काढला. तेव्हा डोळे पाण्याने अलगद भरून आले. कारण,ह्यावेळेस मात्र ती आमच्यासोबत दिवाळीसाजरी करायला नव्हती.आजोबा तर मध्येच अर्धागवायुच्या झटक्याने आजारी पडुन कालांतराने ते आम्हांला सोडुन गेले होते.पण, त्यांच्या मागे आमची आक्का आज्जी आहे म्हणून सुट्टीच्या अगोदर देखील जसा वेळ होतं तसं तीला भेटायला नक्की जात असे.आणि इकडे घरी असल्यावर विशिष्ट वेळेला फोन करुन गप्पा मारण्याचा आमचा नित्यक्रम ठरलेला असायचा.पण, दोन वर्षापुर्वी वार्धक्यामुळे खचलेल्या तब्बेतीमुळे ती खुप आजारी पडली. खुप औषधपाणी करुन सुध्दा तीने २७ ऑगस्ट २०१५ ला तिने ह्या जगाचा निरोप घेतला. आणि आम्ही पोरक झालो. आजोबा गेल्यानंतर ती होती म्हणुन आम्हांला आजोळी येण्यासाठी निमित्त होतं.पण,आता तिचं नाही म्हटल्यावर एक पोकळी निर्माण होऊन गेली.आता कारणाप्रसंगाने आम्ही इथे आल्यावर ते आमचं मंदिरासमान असलेलं घर रिकामं बघुन पटकन डोळे भरुन येतात ती नेहमी म्हणतं असलेले अभंग कानात मात्र घुमायला लागले. आम्हांला मायेने जवळ घेऊन डोक्यावरुन फिरणारा तिचा स्पर्श,ती कुशी मनाला खुप हेलकावणी देऊन जातो.वाटलं,आता बाहेर येईल आणि आंम्हा सगळ्यांना बघुन होणारा तिचा आनंदी चेहरा बघायला मिळेलं.ह्या आशेने कितीवेळ त्या बंद दरवाज्याकडे आमची सर्वाची नजर खिळून राहिलेली असते .पण,सारे व्यर्थ आहे. आता आपलं आजोळ आता नाही.हे स्वीकारायला मन मात्र तयार होतं नाही.तेव्हा वाटतं,


"पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली.

चाळतांना जीवांची झाली होती काहिली

इथे येऊन पूर्ण आयुष्याच्या आठवणीची उजळणी झाली.

आणि माझ्या विश्वात फक्त तुमचीच कमी जाणवली .


Rate this content
Log in