दिवाळी विशेष
दिवाळी विशेष
आणि काळ थांबला.......सध्या सणांचे दिवस. दसऱ्यानंतर दिवाळी दाराशी आकाशकंदील लागेल. सणांचा राजा दिवाळी म्हणजे वाजतगाजत राहणार, प्रकाशमान होणार.
गरीबश्रीमंत, लहानथोर गोडधोड खाऊन मस्त राहणार. लहानग्यांना तर हे खाऊ की ते खाऊ असे होणार. कारण पदार्थ तरी किती! लाडू, पेढे, बर्फी, अनारसे, करंज्या, शंकरपाळी, श्रीखंड, गुलाबजाम, बालुशाही.. असे शाही गोड जिन्नस तोंडीला म्हणून शेव, चिवडा, चकल्या, कडबोळी.हे पदार्थ असतात. कारण,गोडाला तिखटाशिवाय मजा नाही. पहिले घरचे सर्व एकत्र येऊन रात्र रात्र जागून, असे फराळांचे जिन्नस तयार करायचे. प्रत्येक मिठाई, गोडधोड, नमकीन फराळांची दुकाने- हॉटेल दिसायला लागतात. ऐरवीच्या फराळाच्या जिन्नसापेक्षा दिवाळी फराळांचे काही वैशिष्टय़ असते. दिवाळी फराळ एकत्र कुटुंब-मित्रांसमवेत खाणे म्हणजे ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदी तोटा’ असा प्रचिती देणारा प्रसंग ठरतो. सासरी आलेल्या आम्हां मुलींना नकळत आईच्या फराळाची आठवण येणं. काहींना गावाला जायचं असतं, बऱ्याच जणांचे काहीं ना काही बेत ह्या निमित्ताने आखलेले असतात. ह्या साऱ्या गोष्टी स्वाभाविक आहे. मात्र ह्या वेळेस ह्या कशाचीही मज्जा व्यवस्थित घेता येणार नाहीये. आणि त्याला कारण म्हणजे हा करोना .
"आहे काळ परीक्षेचा पास होण्याचा नाही प्रश्न धीर धरून सगळं काही सोडवण्याचा." अचानकपणे आपल्या जीवनात दाखल झाला. कुठून आला? कसा आला? कळण्याच्या आधी जगभर पसरून त्याने थैमान घातलं. एखादा मोठा प्रलय येऊन जो हाहाकार माजवून सगळं नष्ट करून टाकतो, त्याप्रमाणे हा आला.पण,प्रलय ठरावीक वेळ होऊन गेल्यावर सावरून घ्यायला काही कालावधी देतो. मात्र ह्या कोरोनाच्या प्रलयाने मात्र तशी काहीच सवलत दिली नाही. उलट,दिवसेंदिवस टेन्शन, भीती, मरण पावणाऱ्याची संख्या तो वाढवतच आहे. आज तब्बल७ महिन्याच्या वर होऊन सुध्दां परिस्थिती मात्र बदलली नाहीये. सगळेजण ह्या आलेल्या संसर्गजन्य रोगांशी लढा देत आहे. आणि सरकारला नाईलाजस्तव सर्व काही बंद करून लॉक डाऊनचा शिक्का मारावा लागला. बाहेर न पडण्याचे आव्हानं देऊन हि लढाई सगळ्यांना पार पाडा असे सांगितले आहे. परीक्षेचा असलेला हा काळ अतिशय संयमाने सगळ्यांना निभावा लागणार आहे. परंतु ह्या वाईट काळात देखील काही गोष्टी चांगल्या घडत आहे. सगळीकडे स्वच्छतेला बऱ्यापैकी उधाण आले आहे. तोंडावर मास्क लावल्यामुळे आपल्या तोंडाव्दारे निघणारे जंतु हवेत आणि दुसऱ्या माणसांच्या शरीरात दाखल होत नाहीये. गर्दी न करता एक ठरावीक अंतर ठेवून कारभार होत असल्याने आपोआप गोष्टी सरळ घडताय. माणसांना व्यवहारांच्या जगात कसं वागायचं ?शिस्त म्हणजे नक्की काय? हे ह्यांतून समजायला लागलं आहे. हे म्हणायला आता काहीच हरकत नाही. इतर वेळी सुध्दां ह्या गोष्टी पाळणं गरजेचं असते. ह्यांसोबत अजून एक चांगली गोष्ट घडतीये ती म्हणजे ती म्हणजे ह्या जगात पहिल्यांदाच प्रदूषणाचे प्रमाण इतक्या प्रमाणात घटलं असेल. त्यामुळे पृथ्वी खुप छान प्रकारे मोकळा श्वास घेतीये.पशु-पक्षी स्वच्छंद होऊन आकाशात विहार करताये.वाहनांचा,माणसांचा आवाज नसल्याने निसर्गाचा आवाज,त्यांची घालू पावणारी साद मनुष्यच काय निसर्ग देखील कितीतरी वर्षांनी अनुभवतोय. फक्त त्रास होतोय तो घरात बसून राहण्याचा,कशात तरी स्वतःला रमवुन घेण्याचा. ठिकेय.ही पण वेळ जाईल. कारण,रात्री नंतर सकाळ निश्चितच होते. त्याप्रमाणे ही वेळ पण जाईल.आपले दिवस परत येतील. सगळं काही सुरळीत चालू होईल.ही आशा सोडू नका...........
