Priya Bhambure

Inspirational

3  

Priya Bhambure

Inspirational

आणि सवय लागली

आणि सवय लागली

2 mins
172


आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात नियतीने एक जादुची सतार दडवुन ठेवली आहे.आपल्याला तिचा शोध वेळीच लागायला हवा.त्यात आनंदाचे सूर भरता यायला हवेत.मग सार आयुष्य सुरमयी होऊन जात.खरंच,कोण कधी आपल्या आयुष्यात येईल?आणि आपल्याला काय देऊन?काय शिकवुन कशाची आवड देऊन जाईल.हे सांगता येत नाही.म्हणतात, आपल्या आई-वडिलांसोबत शाळेतल्या शिक्षाकांचा ही तेवढाच आयुष्य घडवण्यात हातभार असतो.मलाही अशाच दोन शिक्षकां कडुन काही शिकायला मिळाल.जळगावच्या प.न.लुकंड.कन्याशाळेत असतांना आम्हाला मराठीला झाडगावकर मॅडम आणि चित्रकलेला देव मॅडम होत्या.झाडगावकर मॅडम ह्या आम्हाला खुप सुंदर पणे मराठी शिकवत असे. उंच बांधा,गोरा रंग,लांब वेणी, निळेशार डोळे, आणि चेह-यावर सतत असलेल ते प्रसन्न हास्य.ह्या कधीही आम्हाला आमच्या मॅडम नाही वाटायच्या आम्हा सगळ्यांवर खुप आईच्या प्रमाणे माया करायच्या त्यामुळेच त्यांचा तास असला की,  त्यांच बोलणं आम्ही वर्गातल्या सर्वजणी तल्लीन होऊन ऐकत असे.त्यांच्या मिळता मला वाचनाची आवड निर्माण होऊन मी कविता करु लागले.आणि त्याचं बरोबर आमच्या देव मॅडम ह्या अप्रतिम चित्र काढीत असे.इतकं सुंदर असायचं ते चित्र की, त्यातला तो जिवंतपणा दिसायचा.त्यामुळेच मला देखील त्यांच्यासारख चित्र काढायची सवय आवड निर्माण झाली.आणि आज व्यंगचित्र छानपैकी मी काढायला लागली आहे.ह्या मॅडमांची मला अजुन एक गोष्ट खुप आवडायची.त्या जेव्हा कधी शाळेत यायच्या तेव्हा अगदी फुल मॅचिंग करुन यायच्या.नुसत त्या ड्रेस/साडी वरची मॅचिंग ज्वेलरी न घालता त्या पर्स आणि चप्पल देखील घालायच्या.अगदी टिप टॉप परफेक्ट तयार होऊन यायच्या.त्यांचा हा गुण मला फार आवडायचा.त्यामुळे तेव्हापासुन माझ्यात देखील नीटनेटकी राहण्याची आवड निर्माण झाली.जश्या इतर गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या प्रमाणे आपल्या दिसण्याकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे हे मला पटलं होत.आणि आज ह्या गोष्टीचा उपयोग ही मला माझ्या आयुष्यात दिसतो.कारण,आपली गोष्ट प्रेझेंट करतांना आपण व्यवस्थित आणि कॉन्फिडन्ट असणं आणि व्यवस्थित दिसणं तितकचं महत्त्वाचं आहे आणि म्हणुनच,मग मी माझ्या आयुष्यात झाडगावकर मॅडमामिळता लिहाणं सुरु करु शकले आणि देव मॅडमांमिळता चित्रा च्या छंदा बरोबर व्यवस्थित रहाणं ही तितकचं गरजेच आहे हे आत्मसात केले.त्यामुळेच ह्या माध्यमातुन मला माझ्या दोघ मॅडमांचे खुप आभार मानायचे आहे.खुप खुप आभारी आहे मी तुमची.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational